नुकताच म्हणजे २८ फेब्रुवारी रोजी संपूर्ण भारतात राष्ट्रीय विज्ञानदिन साजरा करण्यात आला. या दिवशी विज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व संस्था आपली दालने सर्वसामान्यांसाठी खुली ठेवतात. त्याचबरोबर हा दिवस लोकांसाठी आणि विशेषत विद्यार्थ्यांसाठी जास्त आकर्षक व्हावा म्हणून काही खास कार्यक्रमही घेण्यात येतात. यात प्रामुख्याने प्रश्नमंजूषा, निबंध आणि चित्र कला सारख्या स्पर्धा घेण्यात येतात.  
अनेक विद्यार्थी खूप चांगले निबंध लिहितात, वक्तृत्व स्पध्रेत अगदी ऐन वेळेला दिलेल्या विषयावर छान बोलू शकतात. तसेच त्यांच्या जवळ माहितीचा साठा पण खूप असतो कित्येकदा शिक्षकांपेक्षाही जास्त.
पण त्याचबरोबर काही चुका अशा बघायला मिळतात की, ज्या जवळ जवळ सर्वच विद्यार्थ्यांनी केलेल्या असतात. याचा अर्थ असा निघू शकतो की, कदाचित या चुका त्यांनी केलेल्या चुका नसून त्यांना तसंच शिकवण्यात आलं आहे.  
आज मुद्दाम एक चूक आपल्या निर्दशनात आणून देत आहे, पण त्याचबरोबर दुसरा प्रश्न असा उपस्थित होतो की, जेव्हा असा प्रश्न परीक्षेत येतो किंवा अशा परीक्षेत येतो की ज्या परीक्षेची तपासणी दुसरीच कोणी व्यक्ती करत असेल, तर मग तेव्हा विद्यार्थ्यांने काय करावे, जे उत्तर बरोबर आहे ते लिहावे की जे आपल्याला सांगितले आहे ते लिहावे.
हा प्रश्न अवघड आहे. कारण आपल्याला माहीत असलेले बरोबर उत्तर लिहिले तर कदाचित मार्क मिळणार नाहीत. हा प्रश्न मी मागे एका प्रसिद्ध शाळेतील मुख्यध्यापकांना विचारला होता. तेव्हा त्यांनी सांगितले की आम्ही विद्यार्थ्यांना दोन्ही उत्तरे लिहिण्याचा सल्ला देतो. मला या वादात पडायचे नाही, पण या माध्यमातून काही गरसमजुती दूर करण्याचा प्रयत्न नक्कीच करत आहे.
दुर्बणिीचा शोध कोणी लावला याचे हमखास उत्तर म्हणजे गॅलिलिओ हेच मिळतं.  खरंतर मध्यंतरी एक काळ असा येऊन गेला होता की, या प्रश्नाचे बरोबर उत्तर विद्यार्थी देत होते. सन २००९ मध्ये आपण आंतरराष्ट्रीय खगोल विज्ञान वर्ष साजर केलं. हे वर्ष साजरं करण्यामागचं कारण की, ४०० वर्षांपूर्वी १६०९ मध्ये गॅलिलिओ गॅलिलीने सर्व प्रथम दुर्बणिीचा उपयोग खगोलशात्रात निरीक्षणासाठी केला होता. त्याने केलेल्या नुसत्या निरीक्षणानेच नाही तर या निरीक्षणांच्या आधारे त्याने जे शोध लावले ते वैज्ञानिक दृष्टिकोन बदलण्यासाठी मार्गदर्शक ठरले. त्याने केलेल्या कारणमीमांसेमुळे वैज्ञानिक विचारधारणेत एक मोठा बदल घडला.
सर्वात मोठा बदल म्हणजे पृथ्वी हे विश्वाचे केंद्र नसून ग्रह हे सूर्याभोवती फिरत आहेत, हे सिद्ध झाले आणि त्या साठी गॅलिलिओची निरीक्षणे ही महत्त्वाची ठरली.
दोन िभग वापरून दुर्बीण तयार करण्यासाठी लागणारे सर्व साहित्य सतराव्या शतकाच्या सुरुवातीला मुबलक प्रमाणात आणि कमी खर्चात उपलब्ध होत असे. पिसातील धर्मगुरू काच आणि मग त्यापासून िभग बनवण्याच्या कलेत पारंगत झाले होते. जर एखाद्याला वाचण्याकरिता िभग किंवा िभगापासून तयार केलेला चष्मा हवा असेल तर ती व्यक्ती असे िभग बनवणाऱ्याकडे जात असे. स्वत वेगवेगळे िभग बघून आपल्याला जे भिंग बरोबर वाटत असेल ते िभग विकत घेत असे. असं म्हणतात की, एका चष्मेवाल्याच्या दुकानात दोन लहान मुलांना िभगांशी खेळता खेळता असं लक्षात आलं की दूरच्या चर्चवर बसलेले दोन पक्षी त्यांना सहज नीट दिसत होते. मग काहींनी अशी िभग एका मागे एक ठेवून दुर्बीण बनवली.  म्हणजे पहिली दुर्बीण नक्की कोणी बनवली सांगण कठीण आहे. पण तरीही हान्स लिपरहॉयला पहिली दुर्बीण बनवण्याचे श्रेय देण्यात येते, कारण त्याने सर्व प्रथम २ ऑक्टोबर १६०८ रोजी दुर्बणिीसाठी पेटंट मागितले होते, पण हे पेटंट त्याला नाकारण्यात आले होते.  मग त्याने दोन दुर्बणिी एकत्र करून दोन्ही डोळ्यांनी बघता येईल अशी दुर्बीण तयार केली आणि त्यासाठी त्याला पेटंट जरी मिळाले नाही तरी त्याला फार मोठय़ा रकमेचं बक्षीस देण्यात आलं.  (हान्स लिपरहॉयलाचे इंग्रजी स्पेिलग वाचता हान्स लिपरशे असा उच्चार होतो आणि प्रश्नमंजूषेत कुठलाही उच्चार चालू शकेल.) तर अशा या दुर्बणिीची माहिती गॅलिलिओला जवळ जवळ ६ महिने उशिरा मिळाली होती. गॅलिलिओची महानता ही की, दुर्बणिीचा खरा उपयोग फक्त त्याला कळला होता. त्या काळी दुर्बीण म्हणजे श्रीमंतांच्या घरचं एक कुतूहल मात्र होती. पण त्याची खरी उपयोगिता फक्त गॅलिलिओच्या लक्षात आली होती.  
अर्थात दुर्बणिीचा आणि गॅलिलिओचा आणखी  एक संबंध म्हणजे त्याने दुर्बणिीचे शास्त्र समजावून घेतले. नेमक्या कशा पद्धतीच्या काचा वापरल्यास काय होते याचा त्याने शोध लावला. नंतर गॅलिलिओने अनेक दुर्बिणी बनवल्या पण त्याची पहिली दुर्बीण शेवटपर्यंत त्याच्याच जवळ होती. एकदा त्याच्याच हातून या दुर्बिणीचे िभग पडून त्याचे तुकडे झाले. गॅलिलिओला दुर्बिणीच्या शोधाचे आणि त्यात त्याने केलेल्या कार्याचे गांभीर्य माहीत होते. त्याने आपल्या दुर्बिणीच्या भिंगाचे तुकडे जपून ठेवले आणि हे जुळवलेले तुकडे आजही आपल्याला बघायला मिळतात, पण सरकारजमा कागदपत्रांच्या आधारे पहिली दुर्बीण बनवण्याचे श्रेय हान्स लिपरहॉयला जाते. अशाच काही इतर चुकीच्या कल्पनांबाबत आपण चर्चा करत राहू.