साहित्य –

lp41r *      दोन वाटय़ा घट्ट दही (बांधून ठेवून पाणी काढलेले),

*      पाव कप क्रीमी पीनट बटर,

*      एक टेबल स्पून मध,

*      व्हेनिला इसेन्स.

कृती – 

सर्व एकत्र करून रेफ्रिजरेटर करा. वा फळांबरोबर खा. केळी, सफरचंद, स्ट्रॉबेरी हे सर्व कापून डीपबरोबर खाण्याचा आनंद घ्या.

कोकोनट पाइनॅपल बनाना स्मुदी

lp40rसाहित्य –

*      २०० मिली नारळाचे दूध,

*      १२५ ग्रॅम अननसाचे तुकडे,

*      १०० मिली अननसाचा ज्यूस,

*      दोन केळी.

कृती –

सर्व साहित्य ब्लेन्डरमध्ये टाकून ब्लेन्ड करा व एकदम थंडगार सव्‍‌र्ह करा.

ओट्स बार

साहित्य –

lp39r*      अर्धा कप बटर,

*      पाव कप मध,

*      अर्धा कप ब्राऊन शुगर,

*      पाव कप पीनट बटर,

*      दोन कप ओट्स,

*      एक-दोन काळ्या मनुका,

*      एक कप जवस.

कृती –

आठ बाय आठ आकाराचा बेकिंग ट्रे घ्या. त्याला आतून अ‍ॅल्युमिनियम फॉइल लावा.

सॉस पॅनमध्ये बटर, मध, ब्राऊन शुगर आणि पीनट बटर घालून दोन-तीन  मिनिटं  उकळी द्या. गॅसवरून खाली उतरून थंड होऊ द्या. त्यात ओट्स  व जवस घाला. चांगले हलवून बेकिंग ट्रेमध्ये दाबून बसवा आणि गार झाल्यावर सुरीने तुकडे करून बरणीमध्ये भरून ठेवा.

बेक्ड् झुकीनी

साहित्य –

*      तीन-चार झुकीनी,

*      अर्धा कप मैदा,

*      चवीप्रमाणे मीठ,

*      एक कप ब्रेडचा चुरा (क्रम्बल्स),

*      इटालियन सीझनिंग (कुठल्याही सुपर मार्केटमध्ये उपलब्ध)

*      एक अंडे.

कृती – 

lp43झुकीनीचे लांब लांब  तुकडे करा.  त्याच्यावर मैदा व मीठ भुरभुरा. दुसऱ्या बाऊलमध्ये चीझ, इटालियन सीझनिंग आणि ब्रेड क्रम्बस एकत्र करून त्यात झुकीनी  घालून  अंडय़ामध्ये  घोळून बेकिंग ट्रेमध्ये ठेवा.

४२५ सें.  प्री हीट ओव्हनमध्ये १५ ते २० मिनिटं बेक करा.

समाप्त

सीमा नाईक response.lokprabha@expressindia.com