• खालीलपकी कोणते विधान चूक आहे?

अ)     राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती यांच्या निवडीसंदर्भात वाद निर्माण झाल्यास त्यावर निर्णय घेण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाचा आहे हे भारतीय राज्यघटनेच्या ७१ व्या कलमात नमूद केलेले आहे.

ब)     पंतप्रधान केंद्र सरकारच्या कारभाराविषयी माहिती व केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेले निर्णय राष्ट्रपतींना कळवतात. राष्ट्रपतींच्या संदर्भातील पंतप्रधानांचे हे कर्तव्य घटनेच्या ७८व्या कलमात नमूद केले आहे.

Vanchit Bahujan Aghadi, Announces Candidates for 22 Lok Sabha Seats, No Female Candidates, lok sabha 2024, prakash ambedkar,
वंचित आघाडीत महिला‘ वंचित’
Loksatta sanvidhan bhan Equality and protection before the law Articles in the Constitution
संविधानभान: कायद्यासमोर समानता..
Who benefits from the decision announced by Prakash Ambedkar in the Lok Sabha elections
वंचितच्या निर्णयाने लाभ कुणाला? फटका कुणाला? लोकसभा निवडणुकीत समीकरणे बदलणार?
Loksatta sanvidhan bhan Features of Indian Constitution
संविधानभान: भारतीय संविधानाची वैशिष्टय़े

क)     लोकसभा हे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे.

ड)     पंतप्रधान हे राष्ट्रपती व मंत्रिमंडळ यांच्यामधील महत्त्वाचा दुवा असतात.

१) अ   २) ब   ३) क   ४) ड

  • खालीलपकी कोणते विधान योग्य आहे?

अ)     घटनेच्या कलम १२९ मध्ये असे नमूद केले आहे की, सर्वोच्च न्यायालय हे अभिलेखा न्यायालय आहे.

ब)     संसदेच्या दोन्ही गृहांच्या संयुक्त बठकीचे अध्यक्षपद राष्ट्रपती भूषवतात.

क)     लोकसभेच्या सभापतींना राजीनामा द्यायचा झाल्यास तो उपराष्ट्रपतींकडे सादर करणे आवश्यक असते.

ड)     राज्यसभेतील प्रत्येक सदस्याचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो.

१) अ   २) ब   ३) क   ४) ड

 स्पष्टीकरण :

  • संसदेच्या दोन्ही गृहांच्या संयुक्त बठकीचे अध्यक्षपद लोकसभेचे अध्यक्ष भूषवतात.
  • लोकसभेच्या सभापतींना राजीनामा द्यायचा झाल्यास त्यांनी तो उपसभापतीकडे सादर करणे आवश्यक आहे.
  • राज्यसभेतील प्रत्येक सदस्यांचा कार्यकाळ ६ वर्षांचा असतो.
  •  खालीलपकी कोणते विधान योग्य आहे?

अ)     एखाद्या गुन्हेगाराची शिक्षा कमी करणे, तहकूब करणे, रद्द करणे इत्यादी अधिकार घटनेतील कलम ७२ व्या कलमान्वये    राष्ट्रपतींना देण्यात आले आहेत.

ब)     राष्ट्रपतींना त्यांचे लष्करी अधिकार मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने वापरावे लागतात.

क)     राष्ट्रपती संसदेच्या सहमतीशिवाय युद्ध पुकारू शकत नाहीत.

ड)     ४४व्या घटनादुरुस्तीनुसार मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक असतो.

१) अ आणि ब  २) ब आणि ड

३) क आणि अ  ४) अ, ब आणि क स्पष्टीकरण : ४२ व्या घटना दुरुस्तीनुसार मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक असतो.

  •  खालीलपकी कोणते विधान योग्य आहे?

अ)     लोकसभा विसर्जित करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे.

ब)     संसदेने संमत केलेले विधेयक राष्ट्रपतींकडे संमतीसाठी पाठवले गेल्यास राष्ट्रपती ते पुनर्विचारासाठी परत पाठवू शकतात.

क)     लोकसभेतील शून्य प्रहाराचा कालावधी एक तासाचा आहे.

ड)     सरदार वल्लभभाई पटेल यांचा उल्लेख भारताचे पहिले उपपंतप्रधान असा करता येईल.

१) अ आणि ब  २) ब आणि ड

३) अ, ब आणि ड       ४) वरीलपकी सर्व

*     लोकसभेतील शून्य प्रहाराचा कालावधी विहित केलेला नाही.

  • खालीलपकी कोणते विधान योग्य आहे?

अ)     जेव्हा एखाद्या विधेयकासंदर्भात दोन्ही सभागृहांमध्ये मतभेद असतात तेव्हा दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन बोलावले जाऊ शकते, मात्र अर्थविषयक विधेयक याला अपवाद आहे.

ब)     घटनादुरुस्ती विधेयकांवर नकाराधिकार वापरण्याचा राष्ट्रपतींचा विशेष अधिकार २४ वी घटनादुरुस्ती १९७१ अन्वये काढून घेण्यात आला आहे.

क)     यशवंतराव चव्हाण हे वैधानिकरित्या लोकसभेचे पहिले विरोधी पक्षनेते ठरले.

ड)     राष्ट्रपतींच्या वटहुकुमाला कायद्याइतकाच दर्जा असतो. अशा वटहुकुमास संसदचे अधिवेशन सुरू झाल्यानंतर सहा आठवडे     मुदतीच्या आत संसदेची सहमती मिळवावी लागते.

१) अ आणि ब  २) ब आणि ४  ३) अ, ब आणि ड  ४) अ, ब, क आणि ड

लेखन : डॉ. जी. आर. पाटील