इंडो-सल्फान विवाद : हे कीटकनाशक आहे. भारतात कीटकांच्या नियंत्रणासाठी वनस्पतींवर याची फवारणी केली जाते. इंडो- सल्फान पाण्यात सहजासहजी विरघळत नाही. ज्या वेळी इंडो-सल्फान पिकांवर फवारले जाते त्या वेळी हे हवेत दूर अंतरापर्यंत जाऊन मातीत किंवा पाण्यात जमा होते. हे इंडो-सल्फान पाण्यातील जलचरांच्या शरीरात साठू शकते तसेच इंडो-सल्फानची जी मात्रा वनस्पतींवर फवारलेली असते ती वनस्पतींच्या माध्यमातून शरीरात जाऊन आरोग्यास अपायकारक ठरू शकते. अन्नपदार्थाबरोबर अत्यंत कमी प्रमाणात इंडो-सल्फान शरीरात गेल्यानंतर त्याचा आरोग्यावर किती परिणाम होतो हे निश्चित सांगता येत नाही, मात्र जास्त प्रमाणात इंडो-सल्फानचे सेवन किंवा श्वसन झाल्यास त्याचा विपरित परिणाम मानवी आरोग्यावर होतो. यामुळे इंडो-सल्फानवर बंदी आणण्याचा विचार सुरू झाला. या बंदीवर विचार करण्यासाठी जागतिक स्तरावर जिनिव्हा येथे सदस्य राष्ट्रांच्या (Conference of Parties) एक परिषद भरली. या परिषदेत भारताने आपली भूमिका मांडली. भारतात विविध पिकांवरील किडींच्या नियंत्रणासाठी या कीटकनाशकांचा वापर मोठय़ा प्रमाणात होतो. इंडो-सल्फान हे भारतातील महत्त्वाचे कीटकनाशक असल्याने जोवर पर्यायी कीटकनाशक जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत त्यावर बंदी घालू नये, अशी भारताची भूमिका आहे.
राष्ट्रीय हरित न्यायालये (National Green Tribunal): पर्यावरणाविषयी वाद किंवा दावे हाताळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या तज्ज्ञांचा समावेश या संस्थेत आहे. मात्र, कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर १९०८ यामध्ये नमूद केलेली कार्यपद्धती या न्यायपीठाला लागू असणार नाही. या न्यायालयाची स्थापना राष्ट्रीय हरित न्यायासन कायदा २०१० अंतर्गत १८ ऑक्टोबर २०१० रोजी करण्यात आली. या न्यायालयावर खटले निकालात काढण्यासाठी कालावधीचे कायदेशीर बंधन नसते. मात्र, हे खटले ६ महिन्यांच्या आत निकालात काढण्यासाठी हे न्यायालय सर्वतोपरी प्रयत्न करते. या न्यायालयाचे मुख्यालय नवी दिल्ली येथे असून भोपाळ, पुणे, कोलकाता व चेन्नई या चार ठिकाणी या न्यायालयाची खंडपीठे आहेत.

पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या महत्त्वाच्या संस्था :
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (BNHS)
स्थापना : १८८३. मुंबई. सहा सदस्यांच्या छोटय़ा संस्थेपासून सुरुवात झाली. ही वन्यजीव संशोधनासाठीची सर्वात जुनी स्वयंसेवी संस्था आहे. संस्थेतर्फे हॉर्नबिल, जर्नल ऑफ नॅचरल हिस्ट्री ही मासिके प्रसिद्ध होतात. प्रसिद्ध पक्षितज्ज्ञ डॉ. सलीम अली या संस्थेशी संबंधित होते.

The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
Perfect Brush For Healthy Teeth Why Adults Shall Use Kids Tooth Brush
तोंडाची दुर्गंधी कमी करण्यासह ‘या’ फायद्यांसाठी तुम्हीही वापरायला हवा लहान मुलांचा टूथब्रश; डॉक्टर काय सांगतात?
Using skin lightening cream can cause kidney cancer
सावधान! त्वचा उजळणारे क्रिम वापरताय तर हे नक्की वाचा…
What can you do to reduce back pain
स्त्री आरोग्य : कंबरदुखीने त्रस्त आहात?

बोटॅनिकल सव्‍‌र्हे ऑफ इंडिया (BSI)
स्थापना- १३ फेब्रुवारी १८९०. कोलकाता. ही संस्था १९३९ मध्ये बंद होऊन पुन्हा १९५४ मध्ये सुरू झाली. देशाच्या विविध भागातील वनस्पतींचा अभ्यास व संवर्धनासाठीचे प्रयत्न या संस्थेतर्फे करण्यात येतात. पुणे, देहराडून, कोईमतूर, शिलाँग, अलाहाबाद, जोधपूर, पोर्ट ब्लेअर, इटानगर व गंगटोक येथे या संस्थेची कार्यालये आहेत.