ईडन गार्डन्सवरील पाऊस तुर्तास थांबल्यामुळे भारत आणि पाकिस्तानच्या चाहत्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सध्या मैदानावरील कव्हर्स हटविण्यात आली असून मैदान पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सामन्याबाबतचा निर्णय थोड्याचवेळात मैदानाची पाहणी करून घेण्यात येणार आहे. मात्र, सामना सुरू झाल्यानंतर पुन्हा पाऊस पडला तर काय होणार, याचीही सगळ्यांना काळजी लागली आहे.

(Full Coverage|| Fixtures||Photos)

Click Here for India vs Pakistan Match LIVE UPDATE

भारत – पाक सामन्याबाबतच्या शक्यता
* पावसामुळे भारत- पाकिस्तान सामन्याला विलंब झाला आहे. मात्र सामना उशिरा सुरु झाला, तरी तो पूर्ण २०-२० षटकांचा व्हावा, असेच प्रयत्न सुरू आहेत.
* काही वेळापूर्वीच मैदानावरील कव्हर्स हटवण्यात आली होती. मात्र, त्यानंतर सामना सुरु करण्यासाठी क्रिकेट असोसिएशन बंगालला एक तास हवा आहे. खास लंडनहून आणलेल्या कर्व्हसमुळे मैदान कोरडे राहिले आहे. त्यामुळे या सामन्यात काही अडचणी येणार नसल्याचे क्रिकेट असोसिएशनचे म्हणणे आहे.
* मात्र, जर पुन्हा पाऊस आला आणि त्यामध्ये दोन तासांचा खेळ वाया गेला, तर १५-१५ षटकांचा सामना होईल. शेवटचा निर्णय १०.३० वाजता होईल. त्यावेळी हा सामना ५-५ षटकांचाही खेळवला जाऊ शकतो.