scorecardresearch

अजिंक्य रहाणे

अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) हा भारतीय क्रिकेटपटू आहे. त्याचा जन्म ६ जून १९८८ रोजी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील एका गावामध्ये झाला. त्याचे कुटूंब चंदनपुरी गावामध्ये वास्तव्याला होते. लहानपणी आपल्या मुलाला क्रिकेटमध्ये रस असल्याचे अजिंक्यच्या वडिलांनी मधुकर रहाणे यांनी हेरले. अजिंक्य सात वर्षांचा असताना ते त्याला डोंबिवलीतील एका छोट्या कोचिंग कॅम्पमध्ये घेऊन गेले. गावच्या ठिकाणी योग्य प्रशिक्षण उपलब्ध नसल्याने त्यांनी अजिंक्यला शहरामध्ये प्रशिक्षणासाठी नेण्याचे ठरवले. अजिंक्य रहाणे वयाच्या सतराव्या वर्षापासून भारताचे माजी क्रिकेटपटू प्रवीण आम्रे यांच्याकडून प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. त्याने डोबिंवलीच्या एस व्ही जोशी हायस्कूल या शाळेतून प्राथमिक शिक्षणही पूर्ण केले.


प्रवीण आम्रे यांच्याकडे प्रशिक्षण घेत असताना लगेचच दोन वर्षांनी अजिंक्यला राज्यस्तरीय पातळीवर क्रिकेट खेळायची संधी मिळाली. २००७ मध्ये अंडर-१९ संघामध्ये त्याचा समावेश करण्यात आला. तेव्हा भारतीय अंडर-१९ संघ न्यूझीलंड दौऱ्यावर गेला होता. त्या दौऱ्यामध्ये अजिंक्यने दोनदा १०० धावा केल्या. त्याचा चांगला खेळ पाहून मुंबईच्या संघाने सप्टेंबर २००७ मध्ये मोहम्मद निसार ट्रॉफीमध्ये समाविष्ट केले. पहिल्याच सामन्यामध्ये त्याने शतकीय कामगिरी केली. पुढे त्याला इराणी ट्रॉफीमध्येही खेळण्याची संधी मिळाली. दुलीप आणि रणजी स्पर्धांमध्येही अजिंक्य रहाणे हे नाव गाजले. अजिंक्य आजही मुंबईच्या संघाकडून क्रिकेट खेळतो.


२०११ मध्ये अजिंक्य रहाणेला भारताच्या कसोटी संघामध्ये सामील करण्यात आले. त्याचदरम्यान टी-२० आणि एकदिवसीय फॉरमॅटमध्ये त्याने पदार्पण केले. पण पहिला कसोटी सामना खेळण्यासाठी २०१३ पर्यंत थांबावे लागले. २२ मार्च २०१३ रोजी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्यामध्ये अजिंक्यने पदार्पण केले. त्याने आत्तापर्यंत ८३ कसोटी सामन्यांमध्ये ५ हजारांपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. ९० एकदिवसीय सामन्यांमध्ये अजिंक्यने २,९६२ धावा केल्या आहेत. तसेच १७४ टी-२० सामन्यामध्ये ६ हजारांपेक्षा जास्त धावा करणारा तो फलंदाज आहे. भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारीही त्याच्याकडे होती. त्याच्या कारकीर्दीमध्ये भारताने २०२०-२१ च्या ऐतिहासिक बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीवर नाव कोरले. सध्या तो कसोटी संघाचा उपकर्णधार आहे. भारताच्या कसोटी संघासाठी महत्त्वपूर्ण खेळाडू आहे. अजिंक्य रहाणे इंडियन प्रीमियर लीगमध्येही खेळतो. २००८-१० या दोन वर्षांमध्ये तो मुंबई इंडियन्स संघात होता. २०११ ते २०१५ या काळात तो राजस्थान रॉयल्सचा भाग होता. गेल्या काही वर्षांमध्ये आयपीएलमध्ये त्याला चांगला खेळ करता आला नव्हता. पण २०२३ मध्ये चैन्नई सुपरकिंग्स या संघामध्ये गेल्यानंतर त्याने तुफान फटकेबाजी करत पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध केले.


 


 


Read More
IPL 2024 Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore Match Updates in Marathi
IPL 2024 CSK vs RCB: अजिंक्य रहाणे आणि रचिन रवींद्रचा अफलातून झेल, दोघांनी झेल घेत विराटला केलं बाद; VIDEO व्हायरल

IPL 2024: विराट कोहली पुनरागमनानंतर मोठी खेळी न खेळता बाद झाला. अजिंक्य रहाणे आणि रचिन रवींद्र यांनी मिळून त्याचा झेल…

How Musheer Khan Tanush Kotian and Tushar Deshpande Delivered Win to Mumbai in Ranji Trophy 2024
Mumbai Ranji Title 2024: मुंबईतल्या मैदानात घाम गाळून तयार झाले रणजी विजेते शिलेदार

Mumbai Wins Ranji Trophy 2024 Title: मुंबईच्या जेतेपदाच्या वाटचालीत संपूर्ण मोसमात नव्या दमाच्या तरूणांनी मोठी भूमिका बजावली. तनुष कोटीयन, तुषार…

What Went Behind Mumbais 42 nd Title of Ranji Trophy 2024
Ranji Trophy 2024: मुंबईच्या रणजी जेतेपदाचं मेकिंग ऑफ: अलूरमधील १५ दिवसांचे शिबिर, सरावसत्र, गाणी-डान्स, ४६ बैठका

Ranji Trophy 2024 Winner Mumbai: मुंबई संघाने विक्रमी ४२व्यांदा रणजीचे विजेतेपद पटकावले, पण हा विजय काही साधासोपा नव्हता. अनेक महिन्यांची…

Dhawal Kulkarni Takes Final Wicket in Last Match Ranji Trophy Final 2024
Ranji Trophy 2024: ‘धवल’ कारकीर्दीची तळपती अखेर

Dhawal Kulkarni Last Wicket in Ranji Final: रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात धवल कुलकर्णीने शेवटची विकेट मिळवली आणि मुंबईने विक्रमी ४२व्यांदा…

Mumbai Beats Vidarbha in Ranji Trophy Final 2024 Marathi News
Ranji Trophy Final 2024: रणजी ट्रॉफी मुंबईचीच! विदर्भला नमवत रहाणेच्या शिलेदारांनी ८ वर्षांनी पटकावले जेतेपद

anji Trophy Mumbai vs Vidarbha Final: अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वाखालील मुंबई संघाने अंतिम सामन्यात विदर्भच्या संघावर दणदणीत विजय मिळवला आहे आणि…

Ranji Trophy 2024 Final Mumbai vs Vidharbha Day 4
Ranji Trophy: मुंबईची जेतेपदाच्या दिशेने वाटचाल, विजयासाठी ५ विकेट्सची प्रतिक्षा

Ranji Trophy 2024 : मुंबई आणि विदर्भमध्ये सुरू असलेला रणजी करंडकाचा अंतिम सामना आता अखेरच्या दिवसापर्यंत पोहोचला आहे. विदर्भने कडवी…

Ranji Trophy 2024 Final, Mumbai Vs Vidarbha Match Updates in marathi
Ranji Trophy 2024 Final : ८ वर्षांच्या खंडानंतर रणजी विजयाकडे मुंबईची वाटचाल

Mumbai Vs Vidarbha Match Updates : रणजी ट्रॉफी २०२३-२४ हंगामातील अंतिम फेरीत मुंबईसमोर विदर्भाचे आव्हान आहे. मुंबई ४८व्यांदा अंतिम सामना…

Mumbai Vs Vidarbha Ajinkya Rahane Musheer Khan hit half centuries
Ranji Trophy 2024 Final : मुंबईची सामन्यावर घट्ट पकड, रहाणेला सूर गवसला

Mumbai Vs Vidarbha : रणजी ट्रॉफीच्या गेल्या काही सामन्यांत खराब फॉर्ममध्ये असलेल्या अजिंक्य रहाणेने अंतिम सामन्यात विदर्भाविरुद्ध अर्धशतक झळकावले. रहाणेने…

Ranji Trophy 2024 Final MUM vs VID Updates in marathi
Ranji Trophy 2024 Final : विदर्भाचा पहिला डाव १०५ धावांवर गारद; मुंबई रणजी विजयाच्या जवळ

MUM vs VID Final : प्रथम फलंदाजी करताना मुंबईने पहिल्या डावात २२४ धावा केल्या. प्रत्युत्तरात विदर्भाचा पहिला डाव दुसऱ्या दिवशी…

Ranji Trophy 2024 Final Sachin Tendulkar Upset on Mumbai Batsmen,
Ranji Trophy 2024 Final : अय्यर-रहाणे पुन्हा ठरले फ्लॉप! मुंबईच्या खराब फलंदाजीवर सचिनने व्यक्त केली नाराजी

Mumbai Vs Vidarbha : रणजी ट्रॉफी २०२४ च्या अंतिम सामन्यात पहिल्या दिवशी मुंबईचे फलंदाज फ्लॉप ठरले. टीम इंडियाचा माजी महान…

shardul thakur
Ranji Trophy 2024: शार्दूल ठाकूरच्या अष्टपैलू कामगिरीमुळे मुंबई अंतिम फेरीत; तामिळनाडूवर डावानं विजय

Ranji Trophy 2024: अष्टपैलू शार्दूल ठाकूरच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर मुंबईने रणजी करंडक स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये तामिळनाडूवर एक डाव आणि ७०…

Mumbai vs Baroda, 2nd Quarter Final Updates in marathi
Ranji Trophy 2024 : मुशीर खानने रणजीत झळकावले पहिले शतक, पुजारा-रहाणे ठरले अपयशी

Musheer Khan’s century : १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या मुशीर खानने या रणजी हंगामातील पहिल्याच सामन्यात शतक झळकावले.…

संबंधित बातम्या