scorecardresearch

मराठी चित्रपट

‘लोकसत्ता’च्या या सदरामध्ये तुम्हाला मराठी चित्रपटांशी (Marathi Movie) सबंधित सर्व माहिती मिळेल. पारतंत्र्याच्या काळात मूकपटांच्या माध्यमातून भारतीयांपर्यंत चित्रपट पोहोचला होता. १८९५ मध्ये लुमिअर बंधूंनी चित्रपटाचा पहिला शो मुंबईतील वॉटसन हॉटेलमध्ये प्रदर्शित केला. १९१२ मध्ये पहिला मराठी चित्रपट ‘पुंडलिक’चे चित्रीकरण या शहरात झाले. त्यानंतर अथक प्रयत्नांनंतर १९१३ साली दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय चित्रपट (मूकपट) तयार केला. मुंबईच्या कॉरोनेशन चित्रपटगृहात ३ मे १९१३ या दिवशी प्रेक्षकांना तो पहिल्यांदा दाखवण्यात आला. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपट (Indian Cinema) तयार केले. दादासाहेब फाळके यांना भारतीय चित्रपटांचे जनक म्हटले जाते. फाळके यांच्याकडून प्रेरणा घेत भारतामधील प्रत्येक प्रांतामध्ये चित्रपटाचे वेड पसरले. थोड्याच कालावधीमध्ये चित्रपटांमध्ये सुधारणा झाली. १९३१ नंतर बोलके चित्रपट प्रदर्शित होऊ लागले.


बोलपटांमुळे भाषानुरूप चित्रपटांची निर्मिती व्हायला सुरुवात झाली. आलम आरा हा पहिला हिंदी बोलपट प्रदर्शित झाल्याच्या एक वर्षानंतर म्हणजे १९३२ मध्ये अयोध्येचा राजा हा पहिला मराठी बोलपट प्रदर्शित झाला. ‘प्रभात’चा संत तुकाराम हा चित्रपट १९३७ साली व्हेनिस चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपट हा बहुमान मिळवणारा पहिला भारतीय चित्रपट ठरला. १९५४ साली पहिल्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये ‘श्यामची आई’ या आचार्य अत्रे दिग्दर्शित चित्रपटाने राष्ट्रपती पदक मिळवले होते. सिंहासन, अशी ही बनवाबनवी, एक डाव भुताचा, माहेरची साडी, नवरी मिळे नवऱ्याला, जैत रे जैत, माझा पती करोडपती, पिंजरा, झपाटलेला, आम्ही जातो आमुच्या गावा, जगाच्या पाठीवर, मधुचंद्र, पाठलाग, सामना, हा खेळ सावल्यांचा, कळत नकळत, उंबरठा हे काही गाजलेले मराठी चित्रपट आहेत. मराठी चित्रपटसृष्टीने अनेक दिग्गज कलाकार दिले आहेत. श्रीराम लागू, निळू फुले, अरुण सरनाईक, रीमा लागू, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन, सुप्रिया, अशोक सराफ, प्रिया अरुण, निवेदिता जोशी, सुधीर जोशी, दिलीप प्रभावळ्कर, अलका कुबल, रमेश भाटकर, अजिंक्य देव, विक्रम गोखले, किशोरी शहाणे, सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, स्मिता पाटील, मोहन आगाशे, संध्या, रंजना, महेश कोठारे, सीमा देव, रमेश देव, काशिनाथ घाणेकर, विक्रम गोखले, सविता प्रभुणे, अश्विनी भावे, गिरीश कर्नाड अशा अनेक नामवंत कलाकारांनी मराठी चित्रपटसृष्टीचा एक काळ गाजवला आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वांत प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांपैकी एक म्हणजे दादा कोंडके; ज्यांनी अनेक विनोदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. मराठी चित्रपटसृष्टीत एक काळ असा होता,


जेव्हा विनोदी चित्रपट फार गाजत होते. पण सध्या मराठी चित्रपटसृष्टीत ऐतिहासिक चित्रपटांना खूप पसंती मिळते. ‘सरसेनापती हंबीरराव’, ‘हर हर महादेव’, ‘पावनखिंड’ यांसारख्या ऐतिहासिक मराठी चित्रपटांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. मराठी चित्रपट आणि कलाकारांसंबंधित सर्व अपडेट्स तुम्ही येथे वाचू शकता.


Read More
zapatlela mi tatya vinchu movie poster first look revealed by Adinath Kothare
“तात्या विंचू पुन्हा येतोय!”, आदिनाथ कोठारेने शेअर केलं नव्या सिनेमाचं पोस्टर, अभिनेता म्हणाला…

आता पुन्हा एकदा तात्या विंचू एका वेगळ्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Vijay Kondke movie Lek Asavi Tar Ashi trailer released
‘माहेरची साडी’नंतर विजय कोंडकेंचा ‘लेक असावी तर अशी’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, पाहा जबरदस्त ट्रेलर

नात्यांचे महत्त्व पटवून देणारा आणि लेकीची माया दाखवून देणारा ‘लेक असावी तर अशी’ चित्रपट…

albatya galbatya 3d movie coming soon vaibhav mangle play Chinchi Chetkin Role
रंगभूमी गाजवल्यानंतर रुपेरी पडद्यावर 3D मध्ये पाहायला मिळणार ‘अलबत्या गलबत्या’ चित्रपट, ‘हा’ अभिनेता दिसणार चेटकिणीच्या भूमिकेत

किती गं बाई मी हुश्शार.. किती गं बाई मी हुश्शार…; पुन्हा येणार चिंची चेटकिणी प्रेक्षकांच्या भेटीला

Pooja sawant husband siddhesh chavan pre birthday celebration photo viral
अभिनेत्री पूजा सावंतने पतीच्या वाढदिवसाची सुरू केली तयारी; लग्नानंतरचा पहिला वाढदिवस ठरणार खास, अभिनेत्रीने केले फोटो शेअर

सिद्धेशच्या प्री-बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो चर्चेत आहेत.

Pooja Sawant husband siddhesh Chavan enjoyed weekend marry go round
पूजा सावंत आणि पती सिद्धेशने ‘असा’ घालवला वीकेंड; अभिनेत्रीने आकाशपाळण्यातील फोटो केले शेअर

पूजा आणि सिद्धेश त्यांचा वीकेंड चांगलाच एन्जॉय करताना दिसतायत.

Amruta khanvilkar denim skirt and jacket look photos viral on social media
9 Photos
PHOTOS: डेनिम स्कर्ट आणि जॅकेटवर अमृता खानविलकर मारतेय पार्किंगमध्ये फेरफटका; अभिनेत्रीचा स्टायलिश लूक चर्चेत

अमृताचा डेनिम ऑन डेनिम लूक सध्या चर्चेत आहे.

rajkaran gela Mishit marathi movie on April 19 in theaters
‘राजकारण गेलं मिशीत’ १९ एप्रिलला चित्रपटगृहात

सध्या सुरू असलेल्या राजकारणावर मार्मिक आणि खुसखुशीत भाष्य करणाऱ्या ज्येष्ठ ग्रामीण लेखक रा. रं. बोराडे यांच्या ‘अगं अगं मिशी’ या कथेवर…

First glimpse of Kiran Gaikwad movie Dev manus released
‘देवमाणूस’ किरण गायकवाडच्या चित्रपटाची पहिली झलक प्रकाशित

‘देवमाणूस’ यामालिकेतील शीर्षक भूमिकेमुळे घराघरात लोकप्रिय झालेला अभिनेता किरण गायकवाड लवकरच मुख्य भूमिकेतून रुपेरी पडद्यावर येणार आहे.

Juna Furniture trailer
Video: स्वतःच्या मुलाला कोर्टात खेचणाऱ्या बाबाची गोष्ट, ‘जुनं फर्निचर’चा विचार करायला भाग पाडणारा ट्रेलर प्रदर्शित

या म्हाताऱ्याला अडवून दाखवाच! पाहा महेश मांजरेकरांच्या चित्रपटाचा ट्रेलर

Swapnil joshi visited ayodhya ram mandir temple for blessings shared video
स्वप्नील जोशीने घेतलं रामलल्लाचं दर्शन; व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “याची देही याची डोळा…”

याबद्दल स्वप्नीलने आपल्या भावना व्यक्त करत त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

Rohini Hattangadi got surprise birthday wish in flight during Chaar Choughi Natak
रोहिणी हट्टंगडी यांना मिळालं वाढदिवसाचं खास सरप्राईज! अमेरिकेत विमान प्रवासादरम्यान मिळाल्या शुभेच्छा

“चारचौघी” नाटकाच्या प्रयोगासाठी विमानातून प्रवास करताना रोहिणी हट्टंगडी यांच्यासाठी एक स्पेशल घोषणा झाली.

संबंधित बातम्या