scorecardresearch

मनसे

९ मार्च २००६ रोजी ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ (मनसे) (Maharashtra Navnirman Sena) या पक्षाची स्थापना झाली. हा महाराष्ट्र राज्यातील प्रमुख राज्यस्तरीय पक्षांपैकी एक पक्ष आहे. राज ठाकरे हे या पक्षाचे प्रमुख आहेत. रेल्वे इंजिन हे या पक्षाचे चिन्ह आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाचे नेतृत्त्व उद्धव ठाकरे यांच्याकडे दिले. तेव्हा राज ठाकरे आणि त्यांना समर्थन करणारा शिवसेनेतील गट नाराज झाला. तेव्हा जानेवारी २००६ मध्ये राज यांनी शिवसेना पक्ष सोडला.


पुढे दोन महिन्यांनी मार्च २००६ मध्ये त्यांनी नव्या पक्षाची घोषणा केली. महाराष्ट्र राज्य, मराठी भाषा आणि महाराष्ट्रातील मराठी माणूस यांना वैभव प्राप्त करुन देणे हे या पक्षाचे प्रमुख ध्येय आहे. काही वर्षांपूर्वी या पक्षाने हिंदुत्त्वाची विचारसरणी स्विकारली. २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये या पक्षाचे १३ उमेदवार निवडून आले. त्यानंतर २०१२ च्या महानगरपालिका निवडणुकांमध्येही महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाने चांगली कामगिरी केली. तेव्हा नाशिक महानगरपालिकेमध्ये त्यांचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले होते. सुरुवातीच्या काळात हा पक्ष खूप चर्चेत होता. राज ठाकरे यांचे भाषण आणि नेतृत्त्व यांमुळे तरुण या पक्षामध्ये सहभाग घेत होते. अनेक वादग्रस्त प्रकरणांमध्येही या पक्षाचे नाव जोडले गेले होते. हळूहळू महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मनसेचा प्रभाव कमी होऊ लागला. पक्षाला निवडणुकांमध्ये अपयश मिळू लागले. बरेचसे नेते, प्रवक्ते पक्ष सोडून जाऊ लागले.


२०१९ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra Navnirman Sena) पक्षाच्या केवळ एका उमेदवाराला बहुमत मिळाले. पुढे २०२० मध्ये या पक्षांने आपल्या नव्या विचारसरणीबाबतची घोषणा करत नवा झेंडा स्वीकारला.


Read More
vasant more chandrakant patil (1)
“ज्या दिवशी मी निवडणूक रिंगणात उतरेन…”, वसंत मोरेंचं सूचक विधान; भाजपाचा उल्लेख करत म्हणाले, “पुणेकर त्यांना…”

वसंत मोरे म्हणाले, “माझ्या उमेदवारीमुळे भारतीय जनता पक्षाला जर फरक पडत नसता तर २०२२ मध्ये…”

Sandeep Deshpande on Raj Thackeray: राज ठाकरेंचा दिल्ली दौरा, संदीप देशपांडेंची सूचक प्रतिक्रिया
Sandeep Deshpande on Raj Thackeray: राज ठाकरेंचा दिल्ली दौरा, संदीप देशपांडेंची सूचक प्रतिक्रिया

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे काल दिल्ली दाखल झाले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मनसे आणि भाजपा युतीच्या चर्चांना पुन्हा एकदा…

cm eknath shinde raj thackeray mns
राज ठाकरे महायुतीत सामील होणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं सूचक विधान; म्हणाले, “योग्य निर्णय…”

पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना राज ठाकरे महायुतीमध्ये सहभागी होणार का? असा प्रश्न विचारला असता मुख्यमंत्र्यांनी त्यावर सूचक विधान केलं.

sharad pawar vasant more
वसंत मोरे राष्ट्रवादीची तुतारी फुंकणार? शरद पवार म्हणाले…

वसंत मोरे यांनी गेल्या काही दिवसांत दोन वेळा शरद पवारांची भेट घेतली आहे. त्यामुळे मोरे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून पुणे लोकसभेचं…

manse office close
पिंपरी: राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या मनसेच्या कार्यालयाला टाळे

दोन वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करत राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) पिंपरीतील मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयाला टाळे…

Pramod Patil, Kalyan Lok Sabha
कल्याण लोकसभेचा उमेदवार काठावरच पास होणार, मनसे आमदार प्रमोद पाटील यांची माहिती

कल्याण ग्रामीणमधील विविध भागांतील सुमारे २६ कोटी ५० लाखाच्या विकास कामांचा शुभारंभ मनसे आमदार पाटील यांनी केला आहे. त्यानंतर त्यांनी…

Vasant Mores resignation and discussion of Amit Thackerays that phone call
Vasant More on MNS Resignation: वसंत मोरेंचा राजीनामा अन् अमित ठाकरेंच्या ‘त्या’ फोनची चर्चा!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्यातील फायर ब्रँड नेते म्हणून वसंत मोरे यांची ओळख होती. माजी नगरसेवक असलेल्या वसंत मोरे यांनी आपल्या…

Vasant More on Raj Thackeray
“त्यादिवशी राज ठाकरे पुण्यातून रागावून गेले…”, वसंत मोरेंचा पत्रकार परिषदेतून मोठा आरोप

मनसे पक्ष संपविण्याचे प्रयत्न केले जात आहेत, असा गंभीर आरोप वसंत मोरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केला.

Vasant More Raj Thackeray
“राजीनाम्यानंतर राज साहेबांचा फोन आला, मी म्हणालो…”, वसंत मोरे स्पष्ट बोलले

वसंत मोरे यांनी मनसेचा राजीनामा दिल्यानंतर पुण्यातील पक्ष संघटनेत खळबळ माजली आहे. मनसेकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नसली तरी…

Avinash jadhav Vasant More
“त्याला कळत नव्हतं, ही सगळी राजाची…”, वसंत मोरेंच्या राजीनाम्यानंतर अविनाश जाधवांची पोस्ट चर्चेत

वसंत मोरे यांनी पक्ष सोडल्यानंतर मनसेकडून यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×