scorecardresearch

मुंबई न्यूज

सात बेटांचा समूह असलेलं व हजारो वर्षांचा मानवी वावर असलेलं मुंबई शहर म्हणून खऱ्या अर्थी नावारुपाला आलं इंग्रजांच्या ताब्यात आल्यानंतर. मूळची कोळी, आगरी, भंडारी आदी समाजाची वस्ती असलेलं मुंबई देशातल्याच नव्हे तर विदेशातल्या रहिवाशांनीही गजबजून गेलं. सात बेटं जोडून सलग मुंबई करण्यात आली आणि भराव टाकून समुद्रातील भागही जमिनीला जोडून घेण्यात आला व मुंबईचा विस्तार काहीसा वाढला. कुलाबा ते शीव – माहिम या जुन्या मुंबईचं क्षेत्रफळ अवघं १५७ चौरस किमी आहे, तर आताच्या विस्तारीत बृहन्मुंबईचं क्षेत्र ६०० चौरस किमीच्या जवळपास आहे. महाराष्ट्राची राजधानी तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत देशाच्या कानाकोपऱ्यातून माणसांचा ओघ येत असतो आणि मुंबईत कुणालाही उपाशी रहावं लागत नाही अशी या शहराची ख्याती आहे. जागेच्या अभावी मुंबईच्या परीघाबाहेरील ठाण्याची वाढही प्रचंड झाली असून आता मुंबईचं नियोजन एमएमआर किंवा मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन या अंगाने केलं जातं.Read More
food and drugs police uniform marathi news
अन्न व औषध प्रशासनातही पोलिसांप्रमाणे गणवेश? राज्य शासनाला प्रस्ताव सादर

अन्न व औषध प्रशासनातील अधिकाऱ्यांना पोलिसांप्रमाणे प्रशिक्षण व गणवेश देण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे.

mumbai high court gang rape marathi news
गंभीर स्वरूपाच्या खटल्यांना विलंब हा जामिनाचा आधार नाही, सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला जामीन नाकारताना उच्च न्यायालयाचे निरीक्षण

सामूहिक बलात्काराच्या प्रकरणातील आरोपी असलेल्या सोमनाथ गायकवाड याने जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

mumbai ramabai ambedkar nagar zopu marathi news
रमाबाई आंबेडकर नगर पुर्नविकास : ‘झोपु’चे सर्वेक्षण अंतिम टप्प्यात, पुढील आठवड्यात १६८४ रहिवाशांची प्रारूप यादी प्रसिद्ध करणार

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) पूर्वमुक्त मार्ग विस्तारीकरण प्रकल्पात रमाबाई आंबेडकर नगर येथील १६८४ झोपड्या विस्थापित होणार आहेत.

Syedna Mufaddal Saifuddin dawoodi bohra community
आठ वर्षं सुनावणी, वर्षभराची प्रतीक्षा..अखेर दाऊदी बोहरा उत्तराधिकारी वादावर न्यायालयाचा मोठा निकाल!

मुंबई उच्च न्यायालयाने तब्बल ८ वर्षं प्रदीर्घ सुनावणी घेतल्यानंतर दाऊदी बोहरा समाजाच्या उत्तराधिकारी पदाबाबतच्या प्रकरणात अंतिम निकाल दिला आहे.

bmc swimming pool marathi news
मुंबई महानगरपालिकेचे दहा तरण तलाव प्रशिक्षणासाठी खुले; २४ एप्रिलपासून ऑनलाईन नावनोंदणी, प्रशिक्षण कालावधी २१ दिवसांचा

उन्हाळी सुट्टीदरम्यान महानगरपालिकेच्या दहा जलतरण तलावांत पोहण्याच्या प्रशिक्षणासाठी २१ दिवसांचे प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येणार आहेत.

Abhishek Ghosalkar, murder,
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण : एकापेक्षा जास्त व्यक्तींच्या सहभागाच्या दृष्टीने तपास केला का ? उच्च न्यायालयाची पोलिसांना विचारणा

शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येमागे एकापेक्षा जास्त व्यक्तींचा समावेश असल्याचा त्यांच्या कुटुंबीयांना संशय आहे. त्या…

piyush goyal marathi news
गोयल यांच्याविरोधात घोषणाबाजी; पाच जणांवर गुन्हा

मुंबई काँग्रेसचे फलक लावलेल्या दोन वाहनांतून १० ते १२ जण आले आणि त्यांनी पीयूष गोयल यांच्याविरोधात घोषणाबाजी केली.

mumbai businessman cheated for rupees 22 lakhs, lure of secret gold
गुप्तधनातील सोन्याचे आमिष दाखवून व्यावसायिकाची फसवणूक करणाऱ्याला अटक

शेतात सापडलेल्या गुप्तधनातील सोने स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून व्यावसायिकाची फसवणूक करणाऱ्याला आसाममधून अटक करण्यात सांताक्रूझ पोलिसांना यश आले.

adani electricity Increase fuel surcharge for may
अदानीची वीज महागली; मे महिन्यापासून इंधन अधिभारात वाढ

मे महिन्याच्या बिलापासून निवासी ग्राहकांच्या इंधन अधिभारात प्रति युनिट ७० पैसे ते १.७० रुपये इतकी मोठी वाढ होणार आहे.

bmc 1400 crores cleaning contract case
१४०० कोटींचे कंत्राट प्रकरण: महापालिकेकडून सरकारी धोरणाचे उल्लंघन केले जात असल्यास काय करणार? उच्च न्यायालयाची विचारणा

सर्वसामान्यांकडून कोणत्याही बाबींचे पालन केले जात नसेल तर त्यांच्यावर निर्बंध घातले जातात अथवा कारवाईचा बडगा उगारला जातो.

ltt thivim 3 hour late marathi news
मुंबई: प्रवाशांच्या गोंधळानंतर अखेर रेल्वेगाडी सुटली, एलटीटी-थिवी रेल्वेगाडी तब्बल तीन तास उशिरा

नुकताच डब्याअभावी एलटीटीवरून थिवीकडे जाणारी रेल्वेगाडी सोडण्यास तब्बल तीन तासांचा उशीर झाला. यात लहान मुले, वयोवृद्ध, महिला प्रवाशांचे प्रचंड हाल…

संबंधित बातम्या