scorecardresearch

नाशिक

लोकसत्ता च्या या सदरामध्ये तुम्ही नाशिक शहरातील सर्व महत्त्वाच्या बातम्या येथे वाचू शकता. महाराष्ट्राच्या उत्तर भागात असलेले नाशिक (Nashik)हे शहर भारतातील प्रसिद्ध हिंदू तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. भारतातील सर्वांत वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी ते एक शहर आहे. सह्याद्रीच्या पठारावर आणि गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या नाशिक शहरात मराठी भाषा बोलली जाते. नाशिक शहराच्या आसपास अनेक धार्मिक स्थळ आहे. त्यापैकी दक्षिण दिशेला त्रिरश्मी बौद्ध लेणी आहेत; उत्तर दिशेला चांभार लेणी व रामशेज किल्ला आहे. पश्चिम दिशेला त्र्यंबकेश्वर आहे. नाशिक शहराच्या नावाबाबत विविध मतप्रवाह आहेत.


नऊ शिखरांचे शहर म्हणून ‘नवशिख’ आणि नंतर त्याचा अपभ्रंश होऊन नाशिक, असे झाले असावे, असाही एक मतप्रवाह आहे. त्याशिवाय नाशिक नावाचा संबंध रामायण या महाकाव्याशी जोडला जातो. पौराणिक संदर्भांनुसार याच ठिकाणी लक्ष्मणाने रावणाची बहीण शूर्पणखा हिचे नाक (संस्कृत भाषेमध्ये ‘नासिका’) कापले होते. म्हणून या ठिकाणाचे नाव ‘नाशिक’ असे पडले असावे, असे मानले जाते. पौराणिक संदर्भांनुसार, नाशिकमधील पंचवटी या ठिकाणी वनवासाच्या काळात रामाने वास्तव्य केले होते. येथे सध्या सीता गुंफा व पेशव्यांनी बांधलेले काळाराम मंदिर हे प्रेक्षणीय स्थळ आहे. भारतातल्या चार कुंभमेळ्यांपैकी सिंहस्थ कुंभमेळा नाशिक येथे भरतो. नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात द्राक्ष आणि कांद्याचे उत्पादन होते. तसेच वाइननिर्मिती आणि तांब्या-पितळेच्या भांड्यांसाठी नाशिक शहर विशेष प्रसिद्ध आहे.


महाराष्ट्रातल्या शेती आणि औद्योगिक केंद्रांपैकी नाशिक एक महत्त्वाचे केंद्र झाले आहे. नाशिक हे मुंबई, पुणे या शहरांखालोखाल महाराष्ट्रातले सर्वाधिक औद्योगिकीकरण झालेले शहर आहे. नाशिक शहरातील स्थानिक घडामोडींपासून राजकीय घडामोडींपर्यंत सर्व महत्त्वाच्या बातम्या येथे तुम्ही वाचू शकता.


Read More
Pankaja Munde, Chhagan Bhujbal,
पंकजा मुंडे यांनी नाशिकऐवजी बीडमध्ये लक्ष द्यावे, छगन भुजबळ यांचा सल्ला

भाजपने बीडमधून विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांना उमेदवारी नाकारून पंकजा मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी दिली आहे. बुधवारी बीड येथील जाहीर…

Chhagan Bhujbal On Pankaja Munde
पंकजा मुंडेंच्या नाशिकबाबतच्या विधानावरुन छगन भुजबळांचा सल्ला; म्हणाले, “बीडकडे लक्ष द्या..”

भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी बीडमधील एका सभेत बोलताना प्रीतम मुंडे यांच्याबाबत एक विधान केले होते. त्यांच्या या विधानावर आता…

Ozar, Air Force Chief,
ओझरस्थित देखभाल-दुरुस्ती केंद्राचा हवाई दल प्रमुखांकडून गौरव

भारतीय हवाई दलाचे प्रमुख चौधरी हे नाशिक दौऱ्यावर आले होते. त्यांनी हवाई दलाच्या ओझरस्थित ११ व्या देखभाल-दुरुस्ती केंद्रास भेट दिली.

Pankaja Munde Pritam Munde
आता प्रीतम मुंडेंना नाशिकमधून उमेदवारी मिळण्याची चर्चा; पंकजा मुंडेंच्या ‘त्या’ विधानामुळे तर्क-वितर्कांना उधाण!

भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी खासदार प्रीतम मुंडे यांच्याबाबत मोठं विधान केलं. त्या बीडच्या सभेत बोलत होत्या.

builder mastermind behind robbery on college road
कॉलेज रोडवरील दरोड्यामागे बांधकाम व्यावसायिक सूत्रधार; गुंडांकडून वृध्द दाम्पत्यास मारहाण

शहरातील कॉलेज रोड हा उच्चभ्रु वस्तीचा भाग आहे. या रस्त्यावरील तपस्वी या बंगल्यात काही दिवसांपूर्वी दरोडा टाकण्यात आला होता

nashik, police, complainants
नाशिक : जप्त एक कोटीचा मुद्देमाल पोलिसांकडून तक्रारदारांना परत

चोरीस गेलेला मुद्देमाल परत मिळाल्याने तक्रारदारांनी पोलिसांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. बुधवारी नाशिकरोड पोलीस ठाण्यात मुद्देमाल प्रदान करण्याचा कार्यक्रम पार पडला.

future of the Nashik Lok Sabha seat depends on Thane the rift remains
नाशिकच्या जागेचे भवितव्य ठाण्यावर अवलंबून, तिढा कायम

महायुतीत नाशिक लोकसभेच्या जागेचा तिढा महिनाभराचा कालावधी उलटूनही सुटत नसल्याने इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे.

NCP politician Chhagan Bhujbal pulled out of Nashik LS race
भुजबळ यांच्या माघारीमुळे समता परिषदेचे राज्य नेतृत्वावर प्रश्नचिन्ह -बैठकीत उमेदवारी करण्याचा आग्रह

खिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने मंगळवारी आयोजित बैठकीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यात आली.

Chhagan Bhujbals statement from Nashik Lok Sabha seat in discussion
नाशिक लोकसभेच्या जागेवरून छगन भुजबळांनी केलेलं वक्तव्य चर्चेत! | Chhagan Bhujbal on Nashik Loksabha

नाशिक लोकसभेच्या जागेवरून छगन भुजबळांनी केलेलं वक्तव्य चर्चेत! | Chhagan Bhujbal on Nashik Loksabha

Chhagan Bhujbal Nashik Lok Sabha
महायुतीत नाशिकचा तिढा सुटेना, आता छगन भुजबळांचं मोठं विधान; म्हणाले, “आमचा दावा…”

नाशिक लोकसभेची जागा छगन भुजबळ यांनी लढवावी, यासाठी समता परिषदेने ठराव केला. यानंतर प्रतिक्रिया देताना छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभेच्या…

nashik municipal schools semi english marathi news
नाशिक महानगरपालिकेला मातृभाषेतील शिक्षणाचे वावडे, प्रत्येक शाळेत सेमी इंग्रजी वर्ग सुरू करण्याची सूचना

महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी बी. टी. पाटील यांनी शिक्षकांना उन्हाळी सुट्टीत २१ कलमी मार्गदर्शक सूचना केल्या आहेत.

संबंधित बातम्या