scorecardresearch

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (Nationalist Congress Party) हा भारतातील एक राष्ट्रीय पक्ष असून मुख्यत्वे महाराष्ट्रात प्रभावशाली आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांनी इ.स. १९९९ मध्ये या पक्षाची स्थापना केली, त्यानंतर हा पक्ष भारतीय काँग्रेस पक्षाच्या साथीने इ.स. १९९९ ते २०१४ या कालावधीत महाराष्ट्र राज्यात सत्तेवर राहिला. हा पक्ष २००४ ते २०१४ च्या दरम्यान काँग्रेस प्रणीत संपुआ मध्ये राहून केंद्रीय सरकारमध्येही सहभागी झाला होता.


इटलीत जन्मलेल्या सोनिया गांधींना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेतृत्व करण्याचा हक्क आहे काय? असा प्रश्न उपस्थित केल्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून निष्कासित केलेल्या शरद पवार, पी.ए. संगमा व तारिक अन्वर यांनी २५ मे १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. स्थापनेच्या वेळीच पक्षाने समाजवादी भारतीय काँग्रेस पक्षाला आपल्यात सामावून घेतले. १० वाजून १० मिनिटे ही वेळ दाखविणारे, दोन पाय व गजराची कळ असलेले सदृश (अ‍ॅनालॉग) [घड्याळ] हे या पक्षाचे अधिकृत निवडणूक चिन्ह आहे.


शरद पवार हे या पक्षाचे अध्यक्ष आहेत. प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे. नवाब मलिक, हसन मुश्रीफ, जयंत पाटील, अजित पवार, धनंजय मुंढे, जितेंद्र आव्हाड, दिपक साळुंखे पाटील, सुनील तटकरे, राजेश टोपे हे या पक्षाचे महत्वाचे नेते आहेत. २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत पराभव पत्करल्यानंतर राष्ट्रवादीने (NCP) शिवसेना आणि इंडियन नॅशनल काँग्रेससोबत हातमिळवणी करून महाविकास आघाडीची स्थापना केली. सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आहे.


Read More
Jalgaon , sharad pawar group ncp leader, Eknath Khadse, Criticizes BJP, BJP district President, slams, politics, maharashtra, lok sabha 2024,
जळगाव जिल्ह्यात भाजप – शरद पवार गटात वाक्युद्ध

दोन दिवसांपूर्वी आमदार एकनाथ खडसे यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले होते. त्यांनी जळगाव जिल्ह्यात भाजपला कोणी विचारत नव्हते, त्यावेळी मी…

MP Supriya Sule traveled by local to Daund got to know the problems of passengers
खासदार सुप्रिया सुळेंनी दौंडमध्ये केला लोकलने प्रवास, जाणून घेतल्या प्रवाशांच्या समस्या|Supriya Sule

खासदार सुप्रिया सुळेंनी दौंडमध्ये केला लोकलने प्रवास, जाणून घेतल्या प्रवाशांच्या समस्या|Supriya Sule

shiv sena shinde group, nashik lok sabha seat, bjp, ncp ajit pawar group, claming, lok sabha 2024, maharashtra politics,
नाशिकमध्ये भाजप-राष्ट्रवादीकडून शिंदे गटाची कोंडी

महायुतीत नाशिक लोकसभा जागेचा वाद विकोपाला गेला असताना भाजपपाठोपाठ आता राष्ट्रवादी अजित पवार गटानेही या मतदार संघावर हक्क सांगत शिवसेना…

21 year youth arrested under pocso act for molesting 7 year old school girl
“वर्धेची जागा सोडत नाही, तुम्हीच आमच्यातर्फे लढा” राष्ट्रवादीची अमर काळेंना ऑफर; उद्या शरद पवारांसोबत भेट…

काँग्रेसचा हट्ट न धरता राष्ट्रवादीतर्फे निवडणूक लढावी, असा प्रस्ताव प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काळे यांना दिला.

ncp sharad pawar and congress conflict over wardha constituency claim pmd 64 zws 70
काँग्रेस नेते म्हणतात, “वर्धेच्या मोबदल्यात दुसरी जागा द्या, पण वर्धा घ्याच,” राष्ट्रवादी म्हणते, “विदर्भात एक लढणारच…”

पश्चिम महाराष्ट्रातील एक जागा पवार गटास द्यावी व वर्धेची जागा घ्यावी, असा पवित्रा आता स्थानिक नेत्यांनी घेतला आहे.

Srinivas Pawar aggressive against Ajit Pawar over politics
Ajit Pawar:“प्रत्येक नात्याची एक्स्पायरी डेट..”, सख्खे बंधू श्रीनिवास पवार अजित पवारांविरोधात आक्रमक

अजित पवार यांनी जुलै २०२३ या महिन्यात उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि ते सत्तेत सहभागी झाले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट…

baramati shrinivas pawar marathi news
“…यासारखा नालायक माणूस नाही”, अजित पवार यांच्यावर सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांची टीका

श्रीनिवास पवार म्हणाले, की पवार साहेबांचे वय ८३ झाले आहे. या वयात त्यांना सोडणे मला पटले नाही. मला काही व्यक्ती…

ajit pawar thane, anand paranjape, jitendra awhad
आनंद परांजपे यांचा जितेंद्र आव्हाडांना सल्ला, “पवार कुटुंबाच्या नात्यावर राजकीय पोळी भाजू नका”

पवार कुटुंबाच्या नात्यावर राजकीय पोळी भाजू नका, असा सल्ला राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते…

amol mitkari sharad pawar
“लक्षात ठेवा, तुमच्या भ्रमाचा भोपळा…”, मिटकरींची शरद पवारांवर घणाघाती टीका; म्हणाले, “सख्ख्या भावांना एकमेकांविरोधात…”

अमोल मिटकरी म्हणाले, श्रीनिवास पवार आजपर्यंत कधीही राजकीय क्षेत्रात दिसले नाहीत. ते त्यांचे व्यवसाय सांभाळत होते. परंतु, आता त्यांनी राजकीय…

jitendra awhad ajit pawar shriniwas pawar
“त्यांच्या कानाला कोण दोघं लागायचे हे…”, अजित पवारांचा उल्लेख करत जितेंद्र आव्हाडांचं सूचक विधान!

आव्हाड म्हणाले, “शरद पवारांना सोडून जाणारे कशासाठी, कुणासाठी, का गेले, किती वर्षांपासून नियोजन करून गेले हे आम्हाला माहिती आहे!”

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×