scorecardresearch

सर्वोच्च न्यायालय

‘लोकसत्ता’च्या या सदरामध्ये तुम्हाला भारतीय सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित सर्व बातम्या वाचता येतील. भारताचे सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) ही भारताची सर्वोच्च आणि स्वायत्त न्यायिक संस्था आहे. भारतीय राज्यघटनेने एकत्रित न्यायप्रणालीचा स्वीकार केला आहे. प्रामुख्याने विविध राज्यांतील उच्च न्यायालये आणि इतर न्यायालये, तसेच न्यायाधिकरणांच्या निकालांविरुद्ध भारतातील सर्वोच्च घटनात्मक न्यायालयात अपील करता येते. नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे रक्षण करणे हे भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे काम आहे. तसेच विविध सरकारी प्राधिकरणे, केंद्र सरकार विरुद्ध विविध राज्यांची सरकारे किंवा एका राज्याच्या सरकार विरुद्ध देशातील अन्य राज्यांची सरकारे यांच्यातील वाद मिटवणे हेदेखील भारतीय सर्वोच्च न्यायालयाचेच काम आहे.


भारताच्या राष्ट्रपतींद्वारे राज्यघटनेच्या अंतर्गत विशेषतः संदर्भित केलेल्या प्रकरणांची सुनावणी एक सल्लागार म्हणून हे न्यायालय पार पाडते. सर्वोच्च न्यायालयाने घोषित केलेला कायदा भारतातील सर्व न्यायालयांसाठी आणि केंद्र व राज्य सरकारांना पालन करणे बंधनकारक असते. घटनेच्या कलम १४२ नुसार, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी करणे हे भारताच्या राष्ट्रपतींचे कर्तव्य आहे आणि न्यायाच्या हितासाठी आवश्यक वाटणारे कोणतेही आदेश पारित करण्याचे मूळ अधिकार या न्यायालयाला दिलेले आहेत. २८ जानेवारी १९५० पासून आधीच्या प्रिव्ही कौन्सिलच्या न्यायिक समितीची जागा सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. भारतीय संविधानातील अनुच्छेद १२४ हे सर्वोच्च न्यायालयाची रचना व स्थापनेशी संबंधित आहे. अनुच्छेद १२४ नुसार मुख्य न्यायमूर्ती आणि अन्य न्यायाधीश मिळून भारताचे एक सर्वोच्च न्यायालय आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपतींच्या सहीनिशी आणि मुद्रांकित अधिपत्राद्वारे करण्यात येते. त्यासाठी आवश्यकता वाटल्यास राष्ट्रपतींना ज्यांच्यासोबत विचारविनिमय करणे आवश्यक वाटेल, अशा न्यायाधीशांशी ते विचारविनिमय करू शकतात. सद्य:स्थितीत सर्वोच्च न्यायालयात एक मुख्य न्यायाधीश व ३३ इतर न्यायाधीश अशी एकूण ३४ सदस्यसंख्या आहे. २०१९ मध्ये केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या वाढवीत ३१ वरून ३४ केली.


महत्त्वाचे म्हणजे अगदी सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायधीशांची संख्या केवळ आठ एवढी निश्चित करण्यात आली होती. मात्र, गरजेनुसार संसदेद्वारे ही संख्या वाढवण्यात आली. भारतीय न्यायालयांतील महत्त्वाची प्रकरणे, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय यांबाबत सर्व अपडेट्स तुम्हाला येथे वाचायला मिळतील.


Read More
Supreme Court, noted observation, Maharashtra Law, Acquire Buildings , Cessed Property, Mumbai, Tenant Owner Disputes, Redevelopment, mumbai news, buildings news,
उपकरप्राप्त इमारतींसाठीच महाराष्ट्राचा कायदा! सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण

या कायद्याविरोधात प्रॉपर्टी ओनर्स असोसिएशनने १९९२ मध्ये पहिल्यांदा याचिका दाखल केली होती. त्यानंतर या प्रकरणी १६ याचिका दाखल झाल्या होत्या.

The Supreme Court asked the central government why it stopped the action against fraudulent advertisements
फसव्या जाहिरातींवरील कारवाई का रोखली? सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सवाल

पतंजली आयुर्वेद लिमिटेडच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींशी संबंधित खटल्याची सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी केंद्र सरकार आणि राज्य परवाना प्राधिकरणांना फटकारले.

India abortion law
गर्भधारणेनंतर ३० आठवड्यांपर्यंत गर्भपातास परवानगी, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; भारतीय गर्भपात कायदा काय आहे?

चौदा वर्षीय बलात्कार पीडितेला गर्भधारणेनंतर ३० आठवड्यांच्या आत गर्भपात करण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. पीडितेच्या संरक्षणासाठी हा निर्णय घ्यावा…

Supreme Court verdict on minor abortion
तिसाव्या आठवडयात गर्भपातास परवानगी; अल्पवयीन बलात्कार पीडितेच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

गर्भपाताची परवानगी मागणाऱ्या या अल्पवयीन मुलीची तातडीने वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने दिले होते.

article review pm narendra modi defends electoral bond scheme
मोदी प्रतिमा आणि मानसिक दुविधांचा ताण प्रीमियम स्टोरी

सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोखे हे घटनाबाह्य आहेत असे म्हणून ते रद्द केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडणूक रोखे प्रकरणावर पुन्हा एकदा…

SC orders medical examination of minor rape survivor
अल्पवयीन बलात्कारपीडितेची गर्भपातासाठी याचिका; सर्वोच्च न्यायालयाचे तातडीने, वैद्यकीय तपासणीचे निर्देश

सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला अल्पवयीन मुलगी आणि तिच्या याचिकाकर्ती आईच्या रुग्णालयापर्यंत प्रवासाची सोय करण्यास सांगितले आहे.

west bengal governor cv ananda bose
अन्वयार्थ : राज्यपालांना ‘अपवादात्मक’ सल्ला

विधानसभेने मंजूर केलेल्या विधेयकांना राज्यपालांकडून संमती देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने तमिळनाडू, केरळ आदी राज्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

Supreme Court Asks If Voters Can Get VVPAT Slip
निवडणुकीचे पावित्र्य टिकावे; सर्वोच्च न्यायालयाचे मत, सर्व व्हीव्हीपॅट पावत्यांच्या पडताळणीचा निर्णय राखीव

सुनावणीदरम्यान खंडपीठाने मतदानयंत्र आणि व्हीव्हीपॅट यंत्राच्या कार्यपद्धतीची बारीकसारीक माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाच्या उपायुक्तांकडून घेतली.

Election duty staff starts distribution of EVM and VVPAT machines
EVM मुळे भाजपाला अतिरिक्त मते? निवडणूक आयोगाचे अधिकारी म्हणाले, “कोणत्या पक्षाला कोणतं चिन्ह जाणार हे…”

Election Commission of India on EVM : ईव्हीएमवरून केलेल्या मतदारांचं क्रॉस व्हेरिकेशन व्हीव्हीपीएटीच्या स्लिपवरून करण्याच्या मागणीच्या याचिकेवर आज न्यायमूर्ती संजीव…

EVM
“निवडणूक प्रक्रियेचं पावित्र्य राखा”, EVM वरून सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला फटकारलं!

Sanctity to be maintained in the electoral process : ईव्हीएमवरून केलेल्या मतदारांचं क्रॉस व्हेरिकेशन व्हीव्हीपीएटीच्या स्लिपवरून करण्याच्या मागणीच्या याचिकेवर आज…

Advocates Black Coat is Optional in Summer Marathi News
Too Much Heat: प्रचंड उकाड्यामुळे वकिलांना ड्रेसकोडमधून सवलत; काय आहेत नियम?

Dress Code of Advocate: १९६१ च्या ‘अ‍ॅडव्होकेट्स अ‍ॅक्ट’नुसार, भारतातील कोणत्याही न्यायालयामध्ये अथवा न्यायाधीकरणासमोर हजर राहताना ड्रेस कोडबाबत काही काटोकोर सूचना…

sleep fundamental right
Right to Sleep : भारतात झोप हा खरंच मूलभूत अधिकार आहे का? प्रीमियम स्टोरी

आपल्या आयुष्य अन् आरोग्यावर एकूणच आपल्या दिनचर्येवर झोपेचा परिणाम होतो. त्यामुळे झोप ही अन्न, पाण्याइतकीच महत्त्वाची आहे. परंतु, झोप हा…

संबंधित बातम्या