akinator-450मानवाची निर्मिती असलेला संगणक मानवाप्रमाणेच बुध्दिमान असल्याचे प्रमाण बऱ्याच वेळा अनुभवायला मिळते. इतकेच नव्हे तर अनेक संगणकीय किमया आपल्याला थक्क करणाऱ्या असताता. ‘अकिनेटर – दी वेब जीनी’सुध्दा असाच आहे. एक निर्जीव वस्तू जेव्हा तुमच्या मनाचा ठाव घेते, तेव्हा तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्या शिवाय राहाणार नाही. यासाठी तुम्हाला ‘अकिनेटर दी वेब जीनी’च्या http://en.akinator.mobi/ किंवा http://en.akinator.com संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. या बाबतची पोस्ट सोशलमिडियावर सर्वत्र पसरत आहे. तुम्ही मनात धरलेल्या एखाद्या जगप्रसिध्द व्यक्तिचे नाव हा अद्भूत ‘वेब जिनी’ बिनचूक ओळखतो. यासाठी संबंधीत व्यक्तिबाबतचे काही प्रश्न ‘वेब जिनी’द्वारे तुम्हाला विचारण्यात येतात. त्यांची नेमकी उत्तरे दिल्यावर थोड्याच वेळात तुम्ही मनात धरलेल्या जगप्रसिध्द व्यक्तीचे छायाचित्र आणि नाव संगणकावर बिनचूक अवतरते. प्रत्येक प्रश्नाच्यावेळचे ‘वेब जिनी’च्या चेहऱ्यावरील प्रश्नार्थक, उत्तर सापडल्याचे अथवा उत्तर शोधत असल्याचे सतत बदलणारे हावभाव उत्तमरीत्या दर्शविण्यात आले आहेत. या जादुई किमयेचा अनुभव घेण्यासाठी क्षणाचा ही विलंब न लावता अनोख्या ‘बेव जिनी’ची भेट घ्या!