झिओमी या कंपनीने चांगल्या दर्जाचे डिव्हाईस बाजारात आणत ग्राहकांमध्ये स्वत:ची एक पत तयार केली आहे. झिओमीने नव्याने बाजारात आणलेला ‘एमआय ३’ हा मोबाईल देखील याला अपवाद नाही. फ्लिपकार्टवर या फोनने विक्रीचा तर उच्चांक नोंदवला आहे. चीनमधील अॅपल अशी ओऴख असणाऱ्या झिओमी कंपनीच्या ‘एमआय ३’ या अफलातून स्मार्टफोनचे दहा हजार हॅडसेट फ्लिपकार्टवर अवघ्या पाच सेकंदात विकले गेले. त्यामुळे इतर नावाजलेल्या देशी-विदेशी स्मार्टफोन कंपन्यांनी याचा धसका घेतला आहे. मात्र, असे असले तरी फ्लिपकार्टवर हा मोबाईल खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला या फोन विषय सर्व बाबी माहित असणे आवश्यक आहे त्याच साठीच हा लिखान प्रपंच.
*कसा आहे झिओमी ‘एमआय ३’
डिझाईन: दिसायला हा स्मार्टफोन भन्नाट आहे. याची बॉडी अल्यूमिनीअम आणि मॅग्नेशिअम पासून बनवण्यात आली असल्यामुळे याचा लुक फ्रेश आहे. सुंदर असा ५ इंची फुल एचडी डिस्प्ले गोरिल्ला ग्लास ३ चे आवरण असलेला आहे. प्लासिटीक बॉडी असलेल्या इतर बजेट फोनच्या तुलनेत ‘एमआय ३’ मोठा रूबाबदार आणि महागडा वाटतो. उच्चदर्जाचे तंत्रज्ञान देखील बजेटमधे मिळू शकते अशी झिओमीच्या निर्मात्यांची धारणा आहे. माझ्यावर विश्वास ठेवा जेव्हा तुम्ही हा स्मार्टफोन हाताळाल तेव्हाच तुम्हाला याच्या निर्मितीमध्ये किती बारकावे लक्षात घेण्यातआले आहेत याची जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही. केवळ १४३ ग्रॅम वजन असलेल्या झिओमीची पकड अतिशय सुलभ आहे.
याचा सांऊंड आणि मायक्रो यूएसबी पोर्ट फोनच्या खालच्या बाजूला आहे. उजव्याबाजूला पॉवर बटन आणि त्याच्या थोडे वरच्या बाजूला आवाज कमी जास्त करण्याची की देण्यातआल्यामुळे तो हाताळण्यास सोपा जातो. वरच्या बाजूला सिपकर जॅक आणि सिम कार्ड स्लॉट देण्यात आला आहे.
डिस्प्ले: ‘एमआय ३’ ची ५ इंची स्क्रीन फुल एचडी आणि १०८० पिक्सेल आयपीएसची असल्याने आश्चर्यकारक व्हीवींग अँगल्स मिळतात. स्क्रीनच्या खाली नेहमीच्या ठिकाणी तुम्हाला टच सेन्सिटीव्ह मेनू बटन देण्यात आले आहे. याची स्क्रीन १९२० एक्स १,०८० पिक्सेल असल्याने फुल एचडी व्हीडिओ पाहण्याचा आनंद काही वेगळाच आहे. मी युट्युबवरचे आणि कॅमेऱ्यातून शूट केलेले काही व्हीडिओ प्ले करून पाहीले असता हा अनोखा अनुभव आला.काम कसा कतो: यामध्ये २.३ गीगाहार्टझचा क्वाड कोअर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८०० प्रोसेसर वापरण्यात आला आहे. त्याचबरोबर २ जीबी रॅम आणि १६ जीबी ऑन बोर्ड स्टोरेज देण्यात आले आहे. त्यामुळे कितीही डेटा स्टोअर करणे सहजरीत्या शक्य होते. हा स्मार्टफोन वापरण्यास अगदी सहज आणि खूपच रिस्पॉन्सिव्ह आहे. मलातरी यात कोणता अडथळा जाणवला नाही. फोन कॉल्स देखील अगदी सुलभ आणि क्लिअर वाटले. त्यामुळी या फोन विषयी माझी काहीच तक्रार नाही.
स्टोरेज: स्मार्टफोन खरेदी करताना सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय म्हणजे यामध्ये स्टोरेज किती आहे. ‘एमआय ३’ ची संपूर्ण स्टोरेज कपॅसिटी १६ जीबी असून, वापरण्यासाठी १३.२२ इतकी उपलब्ध स्टोरेज कपॅसिटी आहे. उर्वरीत स्पेस प्री इन्सटॉल्ड सिस्टीम आणि सॉफ्टवेअरने व्यापली आहे.
कनेक्टीविटी: हा स्मार्टफोन तुम्हाला ३ जी जीएसएम नेटवर्कच्या माध्यमातून इतर जगाशी जोडतो. यामध्ये ब्ल्यूटूथ आणि वाय फाय कनेक्टीविटी आहे हे काही वेगळ सांगायला नको.
कोणते सॉफ्टवेअर आहेत: यामध्ये असलेल्या अड्रॉइडवर आधारीत एमआयय़ूआय ऑपरेटींग सिस्टीममुळे सॉफ्टवेअर सतत अपडेट होत राहतात. त्यामुळे वेगवेगळे अॅप्स डाऊनलोड करणे अगदी सोपे जाते.कॅमेरा: झिओमी ‘एमआय ३’ चा कॅमेरा अफलातून आहे. इतर स्मार्टफोनशी स्परर्धाकरत यामध्ये १३ मेगापिक्स्लचा कॅमेरा देण्यात आला आहे. इमेज क्वालिटी खूपच छान आहे. याच शटरस्पिड देखील तुफान आहे. यामध्ये तुम्हाला उच्च दर्जाचे पनोरमा, एचडीआर आणि फिल्टर इफेक्ट मिळतात.                     
बॅटरी: या स्मार्टफोनमध्ये ३०५० एमएएच ची जास्त क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. माझ्या असे लक्षात आले की ठिक ठाक वापर केल्यास ती दिवसभर पुरते. यामध्ये वेगवेगळे पॉवर मोड असल्यामुळे ती कशीवापरायची हेसर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे.
स्पष्ट मत: माझ्यामते  ‘एमआय ३’ हा स्मार्टफोन म्हणजे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल असा उत्तम आणि सुंदर पर्याय आहे.
फोन विषयीच्या महत्त्वाच्या बाबी थोडक्यात

डिस्प्ले: ५ इंच फुल एचडी १०८० पिक्सेल आयपीएस
प्रोसेसर: २.३ गीगाहर्टझ क्वालकॉम स्नॅपडॉग ८०० एबी
ऑपरेटींग सिस्टीम: एमआययुआय व्हर्जन ५ सह अन्ड्रॉईड ४.४.२ ऑप्टीमाईझड
कॅमेरा: १३ मेगा पिक्सेल (रिअर); २ मेगा पिक्सेल (फ्रंट)
स्टोरेज: २ जीबी रॅम, १६ जीबी प्लॅश मेमरी
कनेक्टीविटी: ३जी/२जी, जीपीएस, ब्ल्युटूथ, वाय फाय
वजन: १४५ ग्रॅम
किंमत: रू. १३,९९९