फेंडा ऑडिओ या कंपनीच्या स्पीकर शृंखलेमध्ये ५००० व्हॅट पीएमपीओसह २.१ सराऊंड साऊंड स्पीकर ए५३०यू दाखल झाला आहे. लहान जागेत स्पीकर ठेवून चांगले उत्पादन वापरू इच्छिणाऱ्या मंडळींसाठी हे स्पीकर अत्यंत उपयुक्त आहेत. ए५३०यूमध्ये २ स्पीकर्सची शक्ती आहे. हे स्पष्ट, दमदार आवाज उपलब्ध करून देते. सब-वूफरमध्ये ६.५ इंचांचा फूल-रेंजचा ड्रायव्हर आहे. उच्च परफॉर्मन्सच्या ध्वनी गुणवत्तेसाठी सॅटेलाइट स्पीकर्स ३ इंचांच्या फूल-रेंज ड्रायव्हर्सने सुसज्ज आहेत. ए५३०यूला मजबूत मेटल ग्रिल आणि चमकदार फ्रंट पॅनेल्स अधिक चांगला लुक देतात. यातील वूडन कॅबिनेट याची सक्षमता अधिक वाढवते. यामुळे बासचा अधिक चांगला इफेक्ट आपल्याला एन्जॉय करता येतो.
किंमत ४९९०/- रु.