प्रश्न – संगणकावर आणि मोबाइलवर मराठी टायपिंग कसे करायचे. तसेच युनिकोड म्हणजे काय?      – दत्तात्रय मुळे

उत्तर – युनिकोड म्हणजे विविध प्रादेषिक भाषांसाठीच्या फॉण्ट आणि कळफलकाची सर्वमान्य प्रणाली. यामध्ये मराठीसह विविध देशांतील काहीशे भाषांचा समावेश आहे. संगणकावर युनिकोड इन्स्टॉल करणे अगदी सोपे आहे. यासाठी सर्वप्रथम कंट्रोल पॅनलमध्ये जाऊन ‘रिजनल अँड लँग्वेज’ हा पर्याय स्वीकारा यामध्ये लँग्वेजेस हा पर्याय स्वीकारा. त्यातील पहिल्या पर्यायासमोर अ‍ॅड असा पर्याय असेल तो निवडा. त्यानंतर पुन्हा अ‍ॅड असे म्हणा. मग तुम्हाला तुमची ऑपरेटिंग सिस्टम इन्स्टॉल करताना संगणकात आलेल्या विविध भाषांचे पर्याय दिसतील. यामध्ये मराठीचा पर्याय असेत तो निवडा. यानंतर की-बोर्ड निवडा. मग ओके म्हणा. यानंतर तुम्हाला खालच्या टूलबारमध्ये उजव्या बाजूला ‘ईएन’ अशी इंगजी अद्याक्षरे दितसतील. त्यावर क्लिक करून तुम्ही मराठीचा पर्याय निवडू शकता. मग तुमचा संगणक मराठी होतो. म्हणजेच त्यामध्ये आपण युनिकोडच्या मदतीने मराठी टाइप करू शकतो. हे मराठी टाइप करण्यासाठी तुम्हाला इनस्क्रिप्ट हा कळफलक शिकावा लागेल. जर तुम्हाला इंग्रजीतून मराठी टाइप करावयाचे असेल तर त्यासाठी गुगल इनपुटसारखे पर्याय तुम्ही संगणकावर डाऊनलोड करून घेऊ शकता. ते केल्यावरही तुम्ही वरीलप्रमाणे सेटिंग करून कळफलक निवडला की तुम्हाला तो पर्याय खालच्या टूलबारमध्ये उपलब्ध होतो. मोबाइलवर मराठी टाइप करण्यसाठी विविध अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. या अ‍ॅप्सच्या माध्यमातून युनिकोडमध्येच म्हणजे मंगल फाँटमध्ये टायपिंग होत असल्यामुळे तो कुणालाही कुठेही वाचता येऊ शकतो.

How useful was the Green Revolution really
हरितक्रांती खरंच कितपत उपयुक्त ठरली?
What is Microsoft warning to India about China regarding AI
‘एआय’च्या माध्यमातून निवडणुकांमध्ये गोंधळ उडवणे शक्य? चीनबाबत मायक्रोसॉफ्टचा भारताला कोणता इशारा?
Google maps using AI new updates
आत Google map सुद्धा वापरणार AI! पाहा अॅपमधील ३ बदल; जाणून घ्या काय आहेत नवीन फीचर्स….
talathi bharti
तलाठी भरतीच्या सुधारित गुणवत्ता यादीत अनेक अपात्र; ७० संशयितांचा निकालही थांबवला