खूपशा लोकांचे लहानपणी गणिताशी भीतीचे नाते असते. या भीतीचे हळूहळू नावडीत रूपांतर होते. जिथे गणिताशी संबंध आहे त्याच्या आजूबाजूलाही न फिरकण्याची प्रवृत्ती बनते. गंमत म्हणजे याच मंडळींना आपली मुले, नातवंडे मात्र गणितात पटाईत व्हावीत असे वाटत असते. शंभरपकी शंभर मार्क मिळण्यासाठी त्यांना गणिताच्या क्लासला घालण्यात येते, गणिताच्या परीक्षांना बसविण्याचा आटापिटा सुरू होतो.
परंतु मुलांसाठी मात्र गणितात प्रावीण्य मिळवण्यासाठी फक्त त्याची गोडी लागणे एवढेच पुरेसे असते. एकदा गणित हा विषय किती गमतीदार आहे हे कळू लागले की मुले गणिताशी खेळू शकतात आणि भीती, नावड यासारख्या गोष्टींचा संबंधच उरत नाही.
गणिताशी किती मजेदार पद्धतीने खेळता येते हे दाखवणारी श्री. अरिवद गुप्ता यांनी बनवलेली पुढील वेबसाइट आज आपण पाहणार आहोत. http://www.arvindguptatoys.com/math-magic.php
श्री. अरिवद गुप्ता हे ककळ तून इंजिनीयर झालेले एक ध्येयवादी व्यक्तिमत्त्व. त्यांचे मन कारखान्यात रमले नाही. मुलांना गणित आणि विज्ञान यांची आवड निर्माण व्हावी यासाठी खेळणी बनवण्याचा त्यांनी ध्यास घेतला. आणि हळूहळू याचे रूपांतर मोठय़ा प्रकल्पात झाले. ही वैज्ञानिक खेळणी सर्वाच्या खिशाला परवडावी म्हणून सहज उपलब्ध किंवा टाकाऊ वस्तूंपासून बनवण्याचा कटाक्ष ठेवला. अशा या Toys from Trash या प्रकल्पाला श्री. अरिवद गुप्ता यांनी वाहून घेतले आहे.
गंमत म्हणजे ही खेळणी सर्व वयोगटाच्या उत्साही मंडळींना करून बघता येतील आणि त्याद्वारे गणितातल्या कित्येक कठीण संकल्पनांचे आकलनदेखील करून घेता येईल.
उदाहरणार्थ,
१.    वर्तुळाचा परिघ आणि त्याचा व्यास यांचे गुणोत्तर (Ratio)) नेहमी २२/७) येते (Circumference And Diameter Ratio (Pi) = २२/७)  आपण पेय पिण्याच्या स्ट्रॉने कसे पाहू शकतो याचा प्रयोग दाखवण्यात आला आहे.
२.    सििलडर आणि कोन यांच्यातील परस्पर संबंध (Cylinder and Cone) शोधण्याचा प्रयोग येथे दिलेला आहे.
३.    आपल्याला माहीत आहे की, भौतिकशास्त्र हे गणिताशिवाय अपूर्ण आहे. चुंबकांच्या साहाय्याने भूमिती हा असाच एक गमतीदार प्रयोग तुम्हाला http://www.arvindguptatoys.com/toys/geometry.html वर बघायला मिळेल.
असे अनेक प्रयोग त्यांच्या व्हिडिओसहित तुम्हाला या साइटवर बघायला मिळतील.
आपल्या प्रत्येकाच्या घरात कॅलेंडर हे असतेच. कॅलेंडरचे कोणतेही पान किती मनोरंजक पद्धतीने बघता येते हे आपल्याला https://www.youtube.com/watch?v=1XNkypfyywY  या व्हिडिओद्वारे दाखवले आहे. यासंबंधी अधिक माहितीसाठी पुस्तकेसुद्धा इंटरनेटवर उपलब्ध आहेत.
थोडक्यात, उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांबरोबरच मोठय़ांनाही आनंद घेता येईल एवढा मालमसाला या साइटवर तुम्हाला सापडेल.
– मनाली रानडे
manaliranade84@gmail.com