प्रश्न – माझा मुलगा आयफोनवर इंटरनेटचा वापर करतो. मात्र त्याच्यावर नियंत्रण ठेवणे आम्हाला शक्य होत नाही. तरी त्याने कोणत्याही दुरुपयोगी संकेतस्थळ पाहू नये यासाठी काय करता येईल. एखादा वेगळा ब्राऊजर आहे का? सर्वेश महाजन
उत्तर – आपल्या मुलांनी वाईट विचारांच्या किंवा पोर्नोग्राफीचे संकेतस्थळे पाहू नयेत यासाठी आपण इंटरनेटवर संकेतस्थळे ब्लॉक करून ठवतो. मात्र मोबाइलवर हे आपल्याला करणे शक्य नसते. यामुळे यासाठी ओली सेफ ब्राऊझर तयार करण्यात आले आहे. या ब्राऊझरच्या माध्यमातून आपल्याला सुरक्षित ब्राऊझिंग करता येते. यामध्ये ७०० हून अधिक संकेतस्थळे बंद करण्यात आली आहेत. यातील ब्लॉक लिस्ट आपण आपल्या सोयीने बदलूही शकतो. इतकेच नव्हे तर इंटरनेटचा वापर किती केला याचा हिशेबही या माध्यमातून आपल्याला ठेवता येऊ शकतो. ज्यांना आपल्या ब्राऊझिंगची हिस्ट्री कुणासाठी खुली करावयाची नसेल त्यांनी हिस्ट्रीला पासवर्डही देता येणार आहे. हे ब्राऊजर सध्या आयफोनवरच उपलब्ध असून ते हे अ‍ॅप आयओएस ६.० किंवा त्या पुढच्या ओएसवर काम करते.

प्रश्न – मला स्मार्ट फोन घ्यावयाचा आहे. यासाठी माझे चार ते पाच हजार रुपयांचे बजेट आहे. त्यात मला सध्याच्या सर्व अत्याधुनिक सोयी-सुविधा अपेक्षित आहे. तरी मला चांगला पर्याय सुचवा.     – देवेश डुमरे
उत्तर – तुम्हाला चार ते पाच हजार रुपयांमध्ये मायक्रोमॅक्स या कंपनीचा बोल्ट ए ५८ हा पर्याय चांगला असू शकतो. या फोनमध्ये तुम्हाला अँड्रॉइडची जेली बीन ही ऑपरेटिंग सिस्टिम मिळते. हा ३.५ इंच स्क्रीन असलेला फोन असून याला २ मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय हा फोन ३जी सपोर्टही करतो. याची किंमत ३००० रुपये आहे. याशिवाय तुम्ही मॅक्स या मोबाइल कंपनीचा एएक्स ४११ डय़ुओज या फोनचा पर्यायही स्वीकारू शकता. या फोनमध्ये अँड्रॉइडची जेलीबीन ही ऑपरेटिंग सिस्टिम देण्यात आली आहे. यामध्ये १.२ गीगाहार्टझचा डय़ुएल कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. यामध्ये इंटर्नल मेमरी चार जीबींची देण्यात आली आहे. ही मेमरी आपण आणखी ३२ जीबीनी वाढवू शकतो. तर ५१२ एमबीची रॅम देण्यात आली आहे. यात तीन मेगापिक्सेलचा कॅमेराही देण्यात आला आहे. याशिवाय स्वस्तातील फोनला फ्रंट कॅमेराही देण्यात आला आहे. या फोनची किंमत ३,९९९ रुपये इतकी आहे.

या सदरासाठी प्रश्न lstechit@gmail.com या मेल आयडीवर पाठवा.