एका मोबाइलमधून दुसऱ्या मोबाइलमध्ये फाइल शेअर करण्यासाठी ब्लूटूथसारखे फोनमधील इनबिल्ट पर्याय उपलब्ध आहेत. पण एखादी मोठी फाइल पाठविण्यासाठी पारंपरिक पर्यायांना खूप वेळ जातो. यामुळे काही स्मार्ट अ‍ॅप्स तुम्हाला फटाफट फाइल शेअरिंगसाठी विशेष मदत करू शकतात. पाहूयात डेटा शेअरिंग अ‍ॅप्स.
tec1ब्लूटूथ फाइल ट्रान्सफर
फाइल शेअरिंगसाठी हे एक उत्तम मोफत अ‍ॅप असून या माध्यमातून आपण कोणत्याही अँड्रॉइड फोनवर फाइल शेअर करू शकतो. हे अ‍ॅप वापरताना प्रथम आपल्याला ज्या फोनमधून फाइल घ्यावयाची आहे किंवा पाठवायची आहे. ते उपकरण स्कॅन करून सर्च करून घ्यावे लागेल. यानंतर फाइल निवडून ते ‘फाइल ट्रान्सफर प्रोफाइल’ (एफटीपी) आणि ‘ऑब्जेक्ट पुश प्रोफाइल’ (ओपीपी)च्या माध्यमातून या फाइल ट्रान्सफर केली जाते. यामध्ये फाइल्ससोबतच काँटॅक्ट्सही ट्रान्सफर केले जाऊ शकतात.

tec2वाय-फाय शूट
या अ‍ॅपच्या माध्यमातून मोठय़ा फाइल्स कमी वेळात ट्रान्सफर करणे सोपे जाते.
यामध्ये दोन अँड्रॉइड उपकरणे वाय-फाय डायरेक्टच्या साहय्याने एका मिनिटाच्या
अवधीत जोडले जातात. हे अ‍ॅप फोटो, व्हिडीओज आणि इतर जास्त एमबीच्या फाइल्स पाठवण्यिासाठी चांगली मदत करते. या अ‍ॅपचे प्रो व्हर्जन तुम्हाला एकाच वेळी विविध फॉरमॅटमध्ये उपलब्ध असलेल्या फाइल्स पाठविण्यासाठी मदत करतात. पण हे प्रो व्हर्जन वापरण्यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागतात.

tec3सुपरबीम
हेही वाय-फाय डायरेक्टच्या साहय्याने दोन उपकरण जोडणार शेअरिंग अ‍ॅप आहे. यामध्ये आपल्याला एकापेक्षा अनेक फाइल्स एका वेळी पाठविणे शक्य होते. हे अ‍ॅप दुसऱ्या उपकरणाला जोडण्यासाठी क्यूआर कोडक, एनएफसी किंवा मॅन्युअर शेअरिंग कीचा वापर करते. याचबरोबर हे अ‍ॅप तुमचे फोल्डर मॅनेज करण्यासाठीही तुम्हाला मदत करू शकते.

tec4हिचरनेट
हे अ‍ॅपही एकापेक्षा अनेक उपकरणे वायफाय डायरेक्टच्या साहय्याने जोडण्यास आपल्याला मदत करत असते. यामध्ये आपण एकापेक्षा अनेक उपकरणांमध्ये एकाच वेळी अनेक फाइल्स शेअर करू शकतो. यामुळे समूह शेअरिंगसाठी हे अ‍ॅप अगदीच उपयुक्त ठरते. या अ‍ॅपमध्ये आपल्याला फाइल शेअर करण्यासाठीचा वेग ५० एमबीपीएस इतका मिळतो.

tec5ईएस फाइल एक्सप्लोरर
हे अ‍ॅप १८ भाषांमध्ये उपलब्ध आहे. या अ‍ॅपच्या माध्यामातून आपण संगणकावरून फोनवर आणि उलट फाइल ट्रान्सफर करू शकतो. तेच हे अ‍ॅप आपले फाइल्स आणि फोल्डर्स मॅनेज करण्यासाठीही मदत करते. हे अ‍ॅप वापरण्यासाठी इतर अ‍ॅपच्या तुलनेत सोपे असल्यामुळे कुणीही त्याचा सहज वापर करू शकते. यामध्ये आपण नेटवर्क सव्‍‌र्हर आणि ऑनलाइन एफटीपीचाही वापर करू शकतो.

tec6वायफाय शेअर
हे अ‍ॅपही एकापेक्षा अनेक उपकरणे वायफाय डायरेक्टच्या साहय्याने जोडण्यास आपल्याला मदत करत असते. यामध्ये आपण एकापेक्षा अनेक उपकरणांमध्ये एकाच वेळी अनेक फाइल्स शेअर करू शकतो. यामुळे समूह शेअरिंगसाठी हे अ‍ॅप अगदीच उपयुक्त ठरते. हे अ‍ॅप पेअरिंग करण्यासाठी आणि आपल्या जवळचे उपकरण शोधून काढण्यासाठी अधिक जलद काम करते. यामध्ये आपण जास्त एमबीच्या फाइल्स अगदी कमी वेळात शेअर करू शकतो. हे अ‍ॅप अँड्रॉइडच्या जुन्या म्हणजेच १.६ या व्हर्जनवरही काम करते.

– नीरज पंडित
niraj.pandit@expressindia.com