मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- सोलापुरात मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी महापालिकेकडून रेल्वेला प्रस्ताव
- विधवा अपंग महिलेच्या घराला महिला सावकाराने ठोकले कुलूप
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
- गैरव्यवहाराच्या भोवऱ्यात नाशिक जिल्हा बँक संचालक मंडळाच्या गटांगळ्या
- कुत्र्यांच्या मदतीने हरणांच्या शिकारीचा संशय
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यास चिरडणारा ट्रक जमावाने पेटवला
- वाढत्या औद्योगिकीकरणामुळे प्रदूषण नियंत्रणाचा बोजवारा
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
पूर्वीच्या पिढीची एक महत्त्वाची सवय होती. ती म्हणजे त्यांची सकाळची सुरुवात ही आकाशवाणीच्या माध्यमातून व्हायची. भारतभरात तुम्ही कुठेही असलात तरी सकाळी साधारणपणे ६ वाजता दिल्ली केंद्रावरून बातम्या सुरू व्हायच्या आणि त्यानंतर सव्वा सहा ते सकाळी सात वाजेपर्यंत स्थानिक भाषेतील गाणी ऐकण्याची संधी मिळायची. त्यानंतर सकाळी सात पाचच्या बातम्या असायच्या. हे सारे करता करता घरातील दैनंदिन काम उकरले जायचे. सकाळच्या त्या छानशा गीतांनी दिवसाची सुरुवात व्हायची आणि मग दिवस चांगला जात असल्याचा अनुभव अनेकांना यायचा. नंतरच्या काळात टेपरेकॉर्डर आले तरीही रेडिओचे अर्थात आकाशवाणीचे महत्त्व काही कमी झाले नव्हते. आता दिवसाची सुरुवात अनेकांच्या बाबतीत एफएमने होते किंवा मग त्यांच्या मोबाईलमध्ये असलेली चांगली गाणी ऐकून होते. एकूणात काय तर संगीताचे आयुष्यात असलेले महत्त्व हे कमी झालेले नाही. त्याचा फॉर्म अर्थात रूप बदलले आहे इतकेच.
सकाळी उठण्यासाठी पूर्वी गजराचे घडय़ाळ होते. त्याची जागा आता संगीतमय अशा अलार्म असलेल्या घडय़ाळांनी घेतली आहे. आता हे सारे इलेक्ट्रॉनिक रूपात येते आहे. या क्षेत्रातील एक प्रसिद्ध कंपनी असलेल्या जेबीएल या कंपनीने अशीच काही चांगली इलेक्ट्रॉनिक अलार्म असलेली घडय़ाळे बाजारात आणली आहेत. पण ही काही केवळ घडय़ाळे नाहीत तर ती बहुपयोगी अशी आयपॅड डॉक्स आहेत. यातील एक नवे बाजारात आलेले उत्पादन म्हणजे 'ऑन बीट अवेक'.
हे तुम्हाला तुमच्या पलंगाजवळ ठेवता येईल. तुम्ही झोपलेले असताना तुमचे आयपॅड चार्ज करण्याचे कामही ते करू शकेल. आणि त्याचवेळेस तुम्ही निश्चित केलेल्या वेळेवर तुम्ही ठरविलेले संगीत किंवा गाणे ऐकवून तुम्हाला उठवण्याचे कामही ते करेल. तुम्ही तुमच्या उपकरणातील म्युझिक लायब्ररी यावर सेट करून ठेवू शकता. शिवाय तुम्हाला वाटलेच की, त्यावर बातम्या पाहायच्या किंवा सिनेमा पाहायचा आहे तर सिस्टिमद्वारे ब्लूटूथच्या मार्फत कनेक्ट करून ती इच्छाही तुम्ही पूर्ण करू शकता.
भारतीय बाजारपेठेतील किंमत : रु. १०,९९०/-
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा



















