ऑलिम्पसचा ‘मिररलेस’ कॅमेरा
कॅमेऱ्यांच्या उत्पादन निर्मितीमध्ये आघाडीवर असलेल्या ऑलिम्पसने अलीकडेच आपल्या ‘इंटरचेंजेबल लेन्स’ श्रेणीमध्ये ‘ई एम५ मार्क २’ या नव्या कॅमेऱ्याची भर टाकली आहे. १६.१ मेगापिक्सेलच्या या कॅमेऱ्यातून काढलेली छायाचित्रे व व्हिडीओ स्थिर राहावी यासाठी त्यामध्ये ‘सेन्सर शिफ्ट इमेज स्टॅबिलायझेशन’ची सुविधा पुरवण्यात आली आहे. आधीच्या कॅमेऱ्यांच्या तुलनेत ‘ईएम५ मार्क२’ वजनाने हलका असून त्यातून काढलेली छायाचित्रे व व्हिडीओ सुस्पष्ट असल्याचा कंपनीचा दावा आहे.
या कॅमेऱ्याची वैशिष्टय़े-
* धूळ तसेच व्रणप्रतिबंधक बाह्यावरण व लेन्स यंत्रणा
* अतिउच्च वेगाने छायाचित्रे टिपण्यासाठी यंत्रणा
* अचूक छायाचित्रणासाठी १४ आर्ट फिल्टर्स
* प्रकाशाचा मार्गही टिपण्याची क्षमता
* वायफाय आणि ऑलिम्पस इमेज शेअर सुविधा किंमत : ७४९०० रुपये

Untitled-1मिताषीचा ‘वॉट्टअगर्ल’ स्मार्टफोन
गेमिंग आणि एंटरटेन्मेंट क्षेत्रात आघाडीवर राहिलेल्या मिताषीने अलीकडेच मोबाइल क्षेत्रातही पाऊल टाकले आहे. स्मार्टफोनच्या वापरकर्त्यांच्या गरजेनुसार उत्पादने आणण्याच्या हेतूने कंपनीने अलीकडेच खास तरुण मुलींसाठी ‘वॉट्टअगर्ल’ स्मार्टफोन बाजारात आणला आहे. पाच मेगापिक्सेलचा डय़ुअल कॅमेरा असलेल्या या स्मार्टफोनमध्ये एका क्लिकवर फोटो काढता येतात. यामध्ये १.२ गिगाहार्टझचा डय़ुअल कोअर प्रोसेसर बसवण्यात आला असून सोबत ५१२ एमबी रॅमही पुरवण्यात आली आहे. १२.७ सेमीची स्क्रीन असलेल्या या फोनची बॅटरी दीर्घकाळ काम करते, असा कंपनीचा दावा आहे. यामध्ये दोन सिमकार्ड बसवण्याची व्यवस्था देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, तरुण मुलींना केंद्रस्थानी ठेवून बनवण्यात आलेल्या या स्मार्टफोनसोबत दोन रंगीत बॅककव्हर पुरवण्यात आले आहेत. त्यामुळे मुली आपल्या कपडय़ांना ‘मॅचिंग’ बॅककव्हर वापरू शकतात, असे कंपनीचे म्हणणे आहे.
किंमत ४९९९ रुपये.

Untitled-1झेब्रॉनिक्सचे मेटलहेड हेडफोन
संगणकासाठी लागणारी उपसाधने पुरवणाऱ्या टॉप नॉच इन्फोट्रॉनिक्स कंपनीने आपल्या ‘झेब्रॉनिक्स’ या ब्रॅण्डअंतर्गत पाच नवीन हेडफोन बाजारात आणले आहेत. मेटलहेड, स्टनर, फ्यूजन, बोल्ट आणि कोल्ट- २ नावाचे हे मल्टिमीडिया हेडफोन गेमिंग आणि गाणी ऐकण्याचा आनंद द्विगुणित करतील, असा कंपनीचा दावा आहे. यापैकी मेटलहेड हेडफोनला दोन मीटरची वायर पुरवण्यात आली असल्याने सहा फुटांच्या अंतरावरूनही तुम्ही हेडफोनचा आनंद घेऊ शकता, तर स्टनर आणि फ्यूजन या हेडफोनमध्ये असलेल्या मऊ इयरपॅडमुळे आवाज सुस्पष्ट येतो. म्हणून चॅटिंग किंवा व्हॉइस कॉल्ससाठी ते चांगले आहेत. मेटलहेडची किंमत १०६९ रुपये इतकी असून स्टनर, फ्यूजन, बोल्ट आणि कोल्ट- २ अनुक्रमे ६९९, ४६९, ३९९, ३९९ रुपये किमतीला उपलब्ध आहेत. हे सर्व हेडफोन्स कंपनीच्या ६६६.ेल्ली८५ं२’.ूे या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

‘ईबे’ची वर्धापन दिन ऑफर
‘ई-कॉमर्स’ क्षेत्रातील अगदी सुरुवातीचे संकेतस्थळ असलेल्या ईबे इंडियाला २३ मार्च रोजी नऊ वर्षे पूर्ण होत आहेत. दहाव्या वर्षांतील पदार्पण साजरे करण्यासाठी ‘ईबे’ने लाइफस्टाइल आणि टेक्नॉलॉजी विभागातील २०० हून अधिक उत्पादनांवर ८० टक्क्यांपर्यंतची सवलत देऊ केली आहे. ‘ईबे’च्या संकेतस्थळावर २७ मार्चपर्यंत ही सवलत योजना कार्यरत असेल. या योजनेअंतर्गत मायक्रोमॅक्स, लावा, इंटेक्स, झेडटीई या कंपन्यांच्या नव्या स्मार्टफोनची सवलतीत खरेदी करता येणार आहे. त्याचबरोबर व्हर्लपूल, हिताची, आयएफबी या ब्रॅण्डची घरगुती उपकरणेही संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. याशिवाय एक हजार रुपयांपेक्षा जास्त खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आयफोन, सिंगापूर सहल जिंकण्याची संधीही मिळवता येणार आहे.