फेसबुकवर एखादा फोटो आवडला नाही तर यापूर्वी केवळ कमेंट करण्याची सोय होती, परंतू आता तुम्हाला न आवडलेला फोटो नापसंतही (डिसलाईक) करता येणार आहे. सोशल मिडियामध्ये क्रांती घडवणा-या फेसबुकच्या या नव्या पर्यायामुळे फेसबुकजन आनंदीत झाले आहेत.
फेसबुकने ‘लाईक’ प्रमाणे ‘डिसलाईक’ हा पर्यायही द्यायला हवा, अशी मागणी ब-याच काळापासून होत होती. त्यानंतर फेसबुकने ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. हा पर्याय आजच सुरू करून देण्यात आला असल्यामुळे सर्व फेसबुक वापरकर्त्यांच्या प्रोफाईलमध्ये त्याची अंमलबजावणी होण्यास काळी काळ जाणार आहे.

आता एखादा फोटो तुम्ह्लाला आवडला नाही तर तुम्हाला फोटोखाली असणा-या पर्याय (ऑप्शन) या बटणावर क्लिक करायचे आहे. तिथे तुम्हाला ‘I don’t like this photo’ (मला हा फोटो आवडला नाही) असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करायचे आहे.

नापसंतीचे (डिसलाईक) बटन नव्हे पर्याय
हा पर्याय वापरल्यानंतर आणखी एक डायलॉग बॉक्स समोर येईल. त्यामध्ये तुम्हाला हा फोटो का आवडला नाही याचे कारण विचारलेले असेल. त्यानंतर तुमचे मत हे फोटो टाकणा-याला खासगी संदेशाद्वारे (मेसेज बॉक्समध्ये) कळवले जाईल. एवढेच नव्हे तर जर तुम्हाला तो फोटो आवडला नाही तर तुम्हाला त्या व्यक्तीला तेथेच अनफ्रेंडही करता येणार आहे.