घरात संगणक आहे.. इंटरनेटही आहे.. पण एखाद्या महत्त्वाच्या कागदाची किंवा विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांची प्रिंट घेण्यासाठी अनेकदा सायबर कॅफे गाठावे लागते. यामुळे वाया जाणारा वेळ वाचविण्यासाठी तुम्ही घरच्या घरी एक प्रिंटर घेऊ शकता. घरगुती वापरासाठी उपयुक्त असे अनेक पिंट्रर्स बाजारात आले आहेत. यामुळे एखादा छोटेखानी प्रिंटर घरात घेऊन ठेवला तर तुमचे काम अधिक सोपे होऊ शकते. पाहुयात सध्या बाजारात घरगुती वापरासाठी कोणते प्रिंटर्स उपलब्ध आहेत आणि हे खरेदी करत असताना कोणती काळजी घ्यायची.

इंकजेट किंवा लेझर
घरगुती वापरासाठी कंपन्यांनी जे पिंट्रर बाजारात आणले आहेत ते सामान्यत: इंकजेट किंवा लेझर या दोन प्रकारांमध्ये मोडतात. यामुळे आपण प्रिंटर घेतना नेमका कोणता प्रिंटर घ्यायचा हे आधी ठरविले पाहीजे. कलर इंकजेट प्रिंटरमध्ये तुम्हाला जास्त प्रिंटआऊट काढावयाच्या असतील तर त्याचा फायदा होतो. या प्रिंटर्समधून फोटोच्या पिंट्र किंवा ग्लॉसी कागदावरच्या पिंट्र खूप चांगल्या प्रकारे येतात. पण ज्या वेळेस आपण या प्रिंटरमधून मजकूर असलेल्या एखाद्या कागदाची प्रिंटआऊट घेतो त्या वेळेस तो थोडासा अस्पष्ट येतो. यामुळे जर तुम्हाला फोटो किंवा इतर प्रिंटआऊटसाठी प्रिंटर हवा असेल तर इंकजेटचा पर्याय निवडू शकता. या प्रिंटरच्या शाईचा आणि टोनरचा खर्चही तुलनेत कमी असतो. याउलट लेझर प्रिंटर्समध्ये तुम्हाला अक्षरांची छपाई अगदी उत्तम दिसते. याचबरोबर इतर प्रिंटचा दर्जाही खूप छान असतो. पण या प्रिंटरमध्ये टोनरसाठी येणारा खर्च तुलनेत जास्त असतो. जर तुम्ही प्रिंटरचा व्यावसायिक उपयोगही करणार असाल तर तुम्हाला इंकजेटचा पर्याय उपयुक्त ठरू शकतो. सध्या इंकजेट शाईची जास्त क्षमता असलेले प्रिंटर्स बाजारात आले आहेत. यामुळे त्याचा पर्यायही तुम्ही निवडू शकतात. कॉस्ट पर पेजचा जर आपण हिशोब केला तर इंकजेट हे लेझरपेक्षा स्वत: पडते.

कनेक्टिव्हिटी
तुम्ही घेत असलेल्या प्रिंटरमध्ये कोणकोणत्या प्रकारची कनेक्टिव्हिटी उपलब्ध आहे याची माहिती करून घ्या. यामध्ये तुम्हाला वाय-फाय, ब्लूटूथ, यूएसबी अशा प्रकारची कनेक्टिव्हिटी असणे आवश्यक आहे. तसेच हा प्रिंटर मोबाइललाही कनेक्ट करता येतोय का, हेही तपासून पाहणे उपयुक्त ठरेल. तसेच काही प्रिंटरमध्ये एसडीकार्डचा स्लॉटही देण्यात येतो. तोही या मोबाइलमध्ये आहे का, हेही तपासून घेणे योग्य ठरेल.

ऑल इन वनचा पर्याय
सध्या बाजारात इंकजेट, लेझरजेट एकत्र असेलेले प्रिंटर्सही उपलब्ध आहेत. यामध्ये स्कॅनर, प्रिंटर, कॉपीअर, स्कॅनर आणि फॅक्स या सर्व सुविधा मिळतात. घरामध्ये वापरासाठी अनेकांना याचा चांगला उपयोग होऊ शकतो. अर्थात याची किंमत ही साध्या प्रिंटरपेक्षा जास्त असते. अनेकांना प्रिंटरसोबत स्कॅनरही लागतो. यामुळे जर थोडेसे बजेट तुम्ही वाढविले तर ऑल इन वन हा प्रिंटर घेऊ शकता.

सॅमसंग मल्टिलेझर प्रिंटर
* मॉडेल नंबर – एससीएक्स ३४०१
* प्रिंट रिझोल्यूशन – १२०० गुणिले १२०० पीपीआय
* इंटर्नल मेमरी – ६४ एमबी
* प्रिंटिंगचा वेग – २० पाने प्रति मिनिटे
* प्रिंटआऊट बाहेर येण्याचा वेळ – ८.५ सेकंद
* स्कॅन पद्धती – कॉन्टॅक्ट इमेज पद्धती
* ऑप्टिकल स्कॅनिंग रिझोल्यूशन – ६०० गुणिले ६०० पीपीआय
किंमत ८९९० रुपये.

एप्सॉन प्रिंटर
* मॉडेल नंबर – एल ११० कलर इंकजेट प्रिंटर
*  प्रिंटिंगचा वेग – १५ रंगीत पाने प्रति मिनिटे, २७ कृष्णधवल पाने प्रति मिनिटे
* प्रिंट रिझोल्यूशन – ५७६० गुणिले १४४० डीपीआय
किंमत ७९९९ रुपये.

बाजारात उपलब्ध असलेले काही प्रिंटर्सचे पर्याय पाहुयात.
एचपी लेझरजेट मल्टिमीडिया प्रिंटर
*  मॉडेल नंबर – लेझरजेट प्रो एम ११३६
* प्रिंट रिझोल्यूशन – ६०० गुणिले ६०० पीपीआय
* इंटर्नल मेमरी – ८ एमबी ’प्रिंटिंगचा वेग – १८ पाने प्रति मिनिटे
* प्रिंटआऊट बाहेर येण्याचा वेळ – ८.५ सेकंद
* स्कॅन पद्धती – फ्लॅटबेड पद्धती
* ऑप्टिकल स्कॅनिंग रिझोल्यूशन – १२०० गुणिले १२०० पीपीआय
किंमत १०३०० रुपये.

ब्रदर प्रिंटर
* मॉडेल नंबर – एचएल-११११ मानोक्रोम लेझर प्रिंटर
* प्रिंटिंगचा वेग – २० पाने प्रति मिनिटे
* कनेक्टिव्हिटी – यूएसबी २.०  ’प्रोसेसर – २०० एमझेड ’सपोर्ट – विंडोज, मॅक ऑपरेटिंग सिस्टीम
किंमत ५२५० रुपये.

कॅनन लेझर शॉट
* मॉडेल नंबर – एलबीपी ६०१८
* प्रिंट रिझोल्युशन – २४०० गुणिले ६०० पीपीआय
* इंटर्नल मेमरी – २ एमबी ’प्रिंटिंगचा वेग – १८ पाने प्रति मिनिटे
* प्रिंटआऊट बाहेर येण्याचा वेळ  ’७.८ सेकंद
किंमत ६०४० रुपये.

एचपी लेझर जेट १०२०
* मॉडेल नंबर – १०२०प्लस
* प्रिंट रिझोल्यूशन – ६०० गुणिले ६०० पीपीआय
* इंटर्नल मेमरी – २ एमबी
* प्रिंटिंगचा वेग – १४ पाने प्रति मिनिटे
* प्रिंटआऊट बाहेर येण्याचा वेळ – १० सेकंद
किंमत ७२०० रुपये.