प्रश्न –  मेमरी कार्डमधून डिलिट झालेल्या फाइल्स कशा रिकव्हर करायचे.  – योगेश महाली  
उत्तर- डिजिटल कॅमेरा असो किंवा फोन एक चुकीचे बटण दाबले गेले की तुमची माहिती डिलिट होते. पण ही माहिती रिकव्हर करण्याची सोयही उपलब्ध आहे. मेमरी कार्डमधील डिलिट झोलेले फोटो रिकव्हर करण्यासाठी सर्वप्रथम ते कार्ड कार्डरिडरच्या साहय्याने संगणकाला कनेक्ट करा. कार्ड कनेक्ट झाले की, http://www.cardrecovery.com /download.asp   कार्ड रिकव्‍‌र्हीसाठी उपलब्ध असलेले हे सॉफ्टवेअर डाऊनलोड करा आणि त्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या कार्डमधील डिलिट झालेले फोटो पुन्हा मिळवू शकता. हे सॉफ्टवेअर डाऊनलोड करणे आणि त्याच्यामदतीले माहिती पुन्हा  रिकव्हर करुन दिला जातो. पण यासाठी तुम्हाला पसे मोजावे लागतात.
प्रश्न –  मला माझे व्हॉट्स अ‍ॅपचे संदेश ई-मेल करायचे आहे. कसे करता येतील.    – देवेश डुंबरे
उत्तर- व्हॉट्स अ‍ॅपचे संदेश ईमेलवर पाठविणे सोपे आहे. तुम्हाला ज्या व्यक्तीचे किंवा ज्या ग्रुपवरचे संदेश ई-मेल करावयाचे आहेत त्या व्यक्तीचे किंवा ग्रुपचे नाव तुमच्या व्हॉट्स अ‍ॅप वर शोधा. त्यानंतर ते ओपन करून पर्यायामध्ये जा. तेथे मोअरमध्ये जा. मग तुम्हाला ’क्लिअर कन्व्हस्रेशन’, ’ई-मेल कन्व्हस्रेशन’ आणि अ‍ॅट शॉर्टकट असे पर्याय येतील. यातील ’ई-मेल कन्व्हस्रेशन’ हा पर्याय निवडून तुम्ही सर्व संवाद ई-मेल करू शकता.