मोबाईल फोन क्षेत्रातील बलाढ्य कंपनी सॅमसंगने भारतात ‘गॅलेस्की एस ५’ या स्मार्टफोनचे मिनी व्हर्जन लॉन्च केले. ‘गॅलेक्सी एस ५ मिनी’ नावाच्या या फोनची किंमत २६,४९९ असून, ‘फ्लिपकार्ट’ या ऑनलाईन वस्तू खरेदी-विक्रीच्या संकेतस्थळावर तो आजपासून उपलब्ध करून देण्यात आला आहे. करडा, पांढरा, निळा आणि सोनेरी अशा चार रंगात तो उपलब्ध आहे. ४.५ इंचाचे एचडी सुपर अॅमोलेड स्क्रिन असलेल्या या फोनमध्ये क्वाड-कोर १.४ गेगाहर्ट्स प्रोसेसर, १.५ जीबी रॅम, १६ जीबी मेमरी जी ६४ जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते, मागच्या बाजूस ८ मेगापिक्सल आणि पुढच्या बाजूस २.१ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. ‘अॅण्ड्रॉईड ४.४ किटकॅट’ प्रणालीवर चालणाऱ्या या फोनमध्ये ‘हार्ट रेट मॉनिटर’ उपलब्ध करून देण्यात आला आहे. पाणी आणि धुळीचा या फोनवर काहीही परिणाम होत नाही. सॅमसंगच्या फोनमधील सुपर अॅमोलेड डिस्प्ले तंत्रज्ञानामुळे उर्जेची बचत होऊन फोनमधील बॅटरी अधिक काळ चालते. शिवाय, एचडी स्क्रिनमुळे छायाचित्रे आणि व्हिडिओ अधिक स्पष्ट दिसतात. फोनच्या मागील बाजूस असलेल्या मेटॅलिक लेदर सदृष्य आवरणामुळे फोन हातातून निसटण्याची शक्यता कमी होते. अल्ट्रा पॉवर सेव्हिंग मोडच्या सुविधेमुळे यात देण्यात आलेली २१०० एमएएच बॅटरी अधिक काळ चालण्यास मदत होते. अल्ट्रा पॉवर सेव्हिंग मोडद्वारे फोनमधील टेक्स्ट मेसेजेस, फोन कॉल किंवा इंटरनेटसारख्या अतिशय गरजेच्या सुविधाच सुरू राहतात. फोनच्या डिस्प्लेला ब्लॅक अॅण्ड व्हाईट रंगात परिवर्तीत करण्याची अनोखी सुविधा या फोनमध्ये देण्यात आली आहे. ज्याच्या वापराने फोनच्या बॅटरी लाईफमध्ये सुधारणा होते.

ठळक वैशिष्ट्ये –

  • स्क्रिन- ४.५ इंच एचडी सुपर अॅमोलेड (७२० x १२८०), ३२८ पीपीआय
  • प्रोसेसर – एमएसएम८२२८ (कोरटेक्स-ओ७ क्वाड कोर १.४ गेगाहर्टस्)
  • अॅण्ड्रॉईड – किटकॅट ४.४
  • रॅम – १.५ जीबी
  • मेमरी – १६ जीबी (अंतर्गत), मायक्रोएसडी कार्डद्वारे ६४ जीबीपर्यंत वाढविण्याची सुवीधा
  • कॅमेरा – मागील बाजूस ८ एमपी एएफ एलईडी फ्लॅशसह आणि पुढील बाजूस २.१ एमपी (एफएचडी)
  • व्हिडिओ – १०८० एचडी (१९२० x १०८०) प्लेबॅक आणि रेकॉर्डिंग (@३० एफपीएस)
  • कनेक्टिव्हिटी – वायफाय, ब्ल्युटूथ
  • वजन – १२० ग्रॅम
  • आकारमान – १३१.१ x ६४.८ x ९.१ एमएम
  • बॅटेरी – २१०० एमएएच

हा फोन डस्ट आणि वॉटर प्रुफ आहे.