एखाद्या ५०० जीबीच्या हार्ड डिस्कला पर्याय ठरू शकणारे ५१२ जीबीचे मेमरी कार्ड बाजारात आले आहे. हे कार्ड एचडी व ४ के अल्ट्रा व्हिडीओज सेव्ह करण्यासाठी उपयुक्त ठरू शकणार आहे.
फ्लॅश मेमरी इनोव्हेशनमध्ये काम करणाऱ्या व एसडी कार्डची निर्मिती करणाऱ्या सॅन्डिस्क या कंपनीने हे मेमरी कार्ड बाजारात आणले असून या मेमरी कार्डमध्ये ४८ तासांचे एचडी व्हिडीओ रेकॉर्डिग सेव्ह करता येणार आहे.
सध्या सर्वत्र एचडी आणि ४ के तंत्रज्ञानाच्या साह्याने व्हिडीओ रेकॉर्डिग केले जाते. हे व्हिडीओ सेव्ह करण्यासाठी स्पेस खूप जास्त लागते. यामुळे हे कार्ड उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास कंपनीचे भातातील व्यवस्थापक राजेश गुप्ता यांनी स्पष्ट केले.
*फोटोग्राफीसाठी विकसित
*माहिती सेव्ह होण्याचा वेगही जास्त
*कॅमेरावा व्हिडीओमध्ये सेव्ह होण्याचा वेग वाढतो.
*कार्ड टेम्प्रेचर, वॉटर, शॉक, एक्स रे प्रूफ
*कार्डसोबत डेटा रिकव्हरी सॉफ्टवेअर
*किंमत ५१ हजार ९०० रुपये