स्वाइप टेक्नोलॉजीतर्फे आज ‘स्वाइप सेन्स’ या भारतातील पहिल्या अल्ट्राथीन ५.५” फॅबलेटचे अनावरण करण्यात आले. या फॅबलेटमध्ये फिजिकल बायोमॅट्रिक्सची सुविधा पुरविण्यात आली आहे. ‘दी सेन्स’ फॅब्लेटमध्ये कलात्मकता आणि तंत्रज्ञानाचा उत्तम मिलाफ पाहायला मिळतो. या फॅब्लेटची जाडी केवळ ७.८ एमएम इतकी आहे. त्याशिवाय जलद कार्यशैली असलेला भारतातील अशा प्रकारातील हा पहिलाच फोन आहे. केवळ ९९९९ रुपये इतकी किंमत असलेल्या या फॅब्लेटमध्ये अनेक वैशिष्ट्ये सामावलेली आहेत. सेन्स हा एकमेव असा फॅब्लेट आहे ज्यामध्ये जास्तीच्या सुरक्षिततेसाठी फिंगरप्रिंट सेन्सरची सुविधा पुरविण्यात आली आहे. यात असलेल्या एक्स्ट्रा सेन्सेटिव्ह रिसेप्टर्समुळे बोटांच्या ठशातील सुक्ष्म बदलदेखील नोंदविले जातात. ज्यामुळे तुमचा स्मार्ट फोन सुरक्षित राहण्यास मदत होते. फोनमधील वेगवेगळ्या कार्यपध्दती सुरू करण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या बोटांच्या ठशांची नोंदणी करू शकता. यात असलेल्या अनोख्या जेश्चर कंट्रोल सुविधेचा वापर करून वापरकर्ता फोनचे स्क्रिन बंद करण्यापासून अनेक गोष्टी करू शकतो. त्याचप्रमाणे अवश्यकतेनुसार स्वत:ची जेश्चर्स डिझाइन करण्याची यात सुविधा देण्यात आली आहे. यात असलेले सुपर सेन्सर तंत्रज्ञान काही सेकंदात जेश्चरची ओळख पटवते. ज्यामुळे वापरकर्त्याला फोनमधील सुविधांचा वापर चुटकीसरशी आणि सुटसुटीतरित्या करता येतो.
सेन्समध्ये ५.५ इंचाचे क्युएचडी स्क्रिन असून, त्याचे रेझोल्युशन ५४०x९६० इतके आहे. स्क्रिनवरील चित्र, अक्षरे, आकडे इत्यादी सुस्पष्ट दिसावेत यासाठी यात हायडेफिनेशनचा वापर करण्यात आला आहे. १.३ गेगाहर्टस क्वाड कोर प्रोसेसर असलेल्या या फोनमध्ये १ जीबी रॅम देण्यात आला असून, यात अॅण्ड्रॉइडची ४.४.२ कीटकॅट प्रणाली पुरविण्यात आली आहे. अनेक तासाच्या वापरासाठी यात ए२२५०एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर आणखी एक ए२२५०एमएएच बॅटरी फोनसोबत विनामुल्य पुरविण्यात येते. उत्कृष्ट अशा छायाचित्रणासाठी मागील बाजूस ८ मेगापिक्सल, तर पुढील बाजूस चांगल्यादर्जाच्या सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ३.२ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये असलेल्या पॉवर फ्लॅशमुळे रात्रीच्यावेळी काढलेली छायाचित्रेदेखील उत्कृष्ट येतात. ८ जबी अंतर्गत मेमरी असलेल्या या फोनची मेमरी ३२ जीबीपर्यंत वाढविता येते. ३जी, २जी, वाय-फाय, ब्लुटूथ, जीपीएस/एजीपीएस असे कनेक्टिव्हिटीचे पर्याय असून यात ओटीजी सपोर्टसुध्दा आहे.
अनोख्या वैशिष्ट्यांनीयुक्त असा केवळ ९९९९ रुपये किंमतीचा ‘स्वाइप सेन्स ५.५’ फॅब्लेट खरेदी करणे, इज सेन्सिबल!

वैशिष्ट्ये –

स्क्रिन – ५.५” क्युएचडी
रेझोल्युशन – ५४०x९६०
प्रोसेसर – १.३ गेगाहर्टस क्वाड कोर
रॅम – १ जीबी
अॅण्ड्रॉइड – ४.४.२ कीटकॅट
पॉवर – ए२२५०एमएएच बॅटरी (फोनसोबत एक जास्तीची बॅटरी)*
कॅमेरा – मागील बाजूस ८ मेगापिक्सल, पुढील बाजूस ३.२ मेगापिक्सल
मेमरी – अंतर्गत ८ जीबी, ३२ जीबीपर्यंत वाढविण्याची सोय
कनेक्टिव्हिटी – ३जी, २जी, वाय-फाय, ब्लुटूथ, जीपीएस/एजीपीएस आणि ओटीजी सपोर्ट (पेनड्राईव्ह कनेक्ट करण्याची सोय)*
याशिवाय या फॅब्लेटमध्ये फिजीकल बायोमॅट्रिक्सची आणि जेश्चर कंट्रोलची सुविधा पुरविण्यात आली आहे