प्रश्न –  माझा पेन ड्राइव्ह हा राइट टू प्रोटेक्ट झाला आहे. तो मी कसा फॉरमॅट करू? – सुधीर म्हात्रे
उत्तर- काही मेमरी कार्ड किंवा पेन ड्राइव्हमध्ये राइट टू प्रोटेक्ट हा पर्याय असतो. यामुळे तुम्ही तुमची माहिती सुरक्षित ठेवू शकता. पण यामुळे पेन ड्राइव्हच्या वापरावर अनेक मर्यादा येतात. यामुळे राइट टू प्रोटेक्ट काढून टाकणे आवश्यक असते. यासाठी काही पद्धती आहेत. यामध्ये एक म्हणजे तुम्ही िवडोज एक्सपी किंवा त्याच्या वरचे व्हर्जन वापरत असाल तर Regedit.exe   चा वापर करून तुम्ही प्रोटेक्शन काढू शकता. यासाठी तुम्ही ComputerHKEY_LOCAL_MACHINESYSTEM मध्ये जा. त्यानंतर CurrentControlSetControlStorageDevicePolicies मध्ये जा. तिथे तुम्हाला राइट टू प्रोटेक्ट नावाची फाइल दिसेल. यावर डबल क्लिक करा. मग तुम्हाला Regedit.exe  ची िवडो ओपन झालेली दिसेल. यातील व्ह्य़ाल्यू डेटा मध्ये १ च्या ऐवजी ० करा. मग ओके बटणवर क्लिक करा. त्यानंतर तुमचा संगणक रिस्टार्ट करा. आता तुम्ही तुमचा पेन ड्राइव्ह फॉरमॅट करू शकता. जर तुम्हाला स्टोरेज डिवाइस पॉलिसीज नाही मिळाल्या तरComputerHKEY_LOCAL_MACHINESYSTEM मध्ये राइट क्लिक करा. तिथे तुम्हाला की नावाचा पर्याय दिसेल. त्यावर तुम्ही क्लिक करा. मग तुम्ही त्याची व्हॅल्यू बदलू शकता.
प्रश्न – वस्तूंवरील क्यूआर कोड किंवा बार कोड वाचण्यासाठी मोबाइलमध्ये कोणते अ‍ॅप आहे का?     – अमेय तांबे
उत्तर – अनेक जाहिरातींत एखादा बारकोड दिला जातो, जो स्कॅन केल्यावर तुम्हाला त्या प्रोडक्टची माहिती लगेच मिळेल असं म्हटलं जातं. आता प्रश्न हा आहे की, बारकोड म्हणजे नेमकं काय आणि तो स्कॅन कसा करायचा? याचसाठी स्मार्टफोनमध्ये क्यूआर बारकोड अ‍ॅप्लिकेशन आहे. दिलेला बारकोड स्कॅन करून त्याची माहिती काही क्षणांतच हे अ‍ॅप्लिकेशन देतं. नुकताच ब्लॉग्जसाठीही क्यूआर बारकोड सुरू झाला आहे. शॉिपग करताना प्रॉडक्टवर किंमत दिसत नसेल तरी या अ‍ॅप्लिकेशनच्या मदतीने त्या वस्तूची किंमत, संपूर्ण माहिती, ते का नवलंय, त्याची क्वांटिटी, क्वालिटी अशा सगळ्या गोष्टी दिसतात. तुम्ही फसण्याचा धोका कमीत कमी होतो. उदा. पाहायचं असेल तर तुमच्या आधारकार्डावरचा बारकोड स्कॅन करून पाहा. त्यावरची सगळी माहिती दिसेल.
या सदरासाठी प्रश्न lstechit@gmail.com या मेल आयडीवर पाठवा.