आपल्याला माहीतच आहे की पृथ्वीवर ९८ मूलद्रव्ये नसíगकरीत्या आढळतात. आपल्याभोवतालची सर्व सृष्टी ही मूलद्रव्यांच्या अगणित संयुंगांनी निर्माण झाली आहे. रोजच्या व्यवहारात आपल्याला सोने, चांदी, तांबे, लोह, शिसे, पारा, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर, फॉस्फरस यांसारखी मूलद्रव्यांची नावे परिचित आहेत. पण हे मोजके अपवाद सोडल्यास पृथ्वीवर आढळणाऱ्या इतर अनेक मूलद्रव्यांचे नाव आणि चिन्ह याशिवाय आपल्याला त्यांची फारशी माहिती नसते. उदाहरणार्थ फुग्यामध्ये वापरला जाणारा हेलियम द्रवरूप स्थितीत कसा दिसतो हे आपल्याला कोण सांगेल? लॅपटॉप, मोबाइल इत्यादींमधल्या रिचार्जेबल बॅटरीजमध्ये वापरल्या जाणाऱ्या लिथियमबद्दल आपल्याला किती माहिती आहे?

जगातली सर्व मूलद्रव्ये मेंडेलिफ या शास्त्रज्ञाने वर्गीकरण करताना पहिल्यांदा एका तक्त्यात मांडली, ज्याला आपण आवर्तसारणी असे म्हणतो. आवर्तसारणी हा रसायनशास्त्राचा एक अविभाज्य भाग आहे. यात आजमितीस ११८ मूलद्रव्यांचा समावेश आहे. आवर्तसारणीत प्रत्येक मूलद्रव्याला चिन्ह आणि अणुक्रमांक दिलेला असतो. उदाहरणार्थ हायड्रोजन ऌ ह्य़ा चिन्हाने दर्शवलेले असते आणि त्याचा अणुक्रमांक 1 आहे.
<http://www.rsc.org/periodic-table&gt; ही साइट उघडल्यावर संपूर्ण आवर्तसारणी स्क्रीनवर प्रथम दाखवली जाते. मूलद्रव्याच्या बटणावर क्लिक केल्यावर मूलद्रव्याचा शोध कधी लागला? त्याचा जनक कोण? मूलद्रव्याचा इतिहास, त्याचा अणुक्रमांक, उपयोग, गुणधर्म इत्यादी सर्व जाणून घेता येईल. या मूलद्रव्यांची माहिती ऐकता येईल, वाचता येईल आणि डाऊनलोडही करून घेता येईल.
ह्य़ा मूलद्रव्यांची माहिती देणारे तसेच ही मूलद्रव्ये वापरून केलेल्या प्रयोगांचे व्हिडीओजही बघता येतील. उदाहरणादाखल आपण सोडियम या मूलद्रव्याची माहिती कशा प्रकारे दिली आहे ते पाहू. हंफ्री डेव्ही यांनी १८०७ मध्ये या मूलद्रव्याचा शोध लावला. तो Na या चिन्हाने दाखवला जातो. अणुक्रमांक ११ आहे. हा मृदू, चंदेरी रंगाचा अतिक्रियाशील अल्क धातू आहे. हवेच्या संपर्कात आल्यावर हा काही सेकंदात काळा पडतो. तसेच पाण्याबरोबर त्याची अतिशय जलद रासायनिक प्रक्रिया होते.
सोडियमचा उपयोग न्यूक्लियर रिअ‍ॅक्टर्स आणि रासायनिक उद्योगांमध्ये केला जातो. सोडियम क्लोराइड म्हणजेच मीठ हे सोडियमचे संयुग आपल्या अन्नाची चव वाढवते. थंडीच्या दिवसात ज्या प्रदेशात बर्फ जमतो तो वितळवण्यासाठी त्यावर मीठ टाकले जाते. हे मूलद्रव्य सर्व सजीवांना अत्यावश्यक आहे.
पृथ्वीवर सर्वात जास्त आढळणारे हे सहावे मूलद्रव्य आहे. हे अत्यंत क्रियाशील असल्यामुळे निसर्गात ते धातुरूपात आढळत नाही.
धातुरूपातील सोडियम कसे दिसते तसेच ते पाण्यात टाकल्यावर त्याचे काय होते हे व्हिडीओमध्ये पाहायला मिळते.
अशाच प्रकारे ११८ मूलद्रव्यांची संपूर्ण माहिती अतिशय आकर्षक व अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडलेली आहे. ही माहिती अनेक पुस्तकांमध्ये उपलब्ध असली तरी प्रयोगशाळांमध्ये केलेले प्रयोगांचे व्हिडीओ पाहणे हा आनंददायी अनुभव आहे आणि हाच या साइटचा आत्मा आहे. विद्यार्थी, संशोधक, ज्ञान मिळवण्याची उत्सुकता असणाऱ्या सर्वानाच ही साइट उपयुक्त ठरेल अशी खात्री आहे.

forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
how to choose healthy breakfast health expert told
७० टक्क्यांपेक्षा जास्त भारतीयांच्या नाश्त्यात पौष्टिकतेचा अभाव; पौष्टिक नाश्ता कसा निवडावा? आहारतज्ज्ञ सांगतात…
500 Years Later Surya Grahan Collides With Rarest Chaturgrahi Yog
५०० वर्षांनी सूर्य ग्रहणाला अद्भुत दुर्मिळ योग; ८ एप्रिलपासून ‘या’ राशींच्या नशिबात अमाप श्रीमंती, नशीब चमकणार