अँड्रॉइड ऑपरेटिंग प्रणालीची ५.१ आवृत्ती.. थ्रीजी.. एक जीबी रॅम.. चार इंचाची स्क्रीन.. आठ जीबीची अंतर्गत साठवणूक क्षमता.. अशा अत्याधुनिक सुविधा असलेल्या ‘फ्रीडम २५१’ या स्मार्टफोनच्या विक्रीला गुरूवारी सकाळी सुरूवात झाली. हा फोन बाजारात आल्यामुळे देशातील स्वस्त दरातील स्मार्टफोनच्या बाजारातील स्पर्धेला वेगळेच वळण मिळाले आहे. स्वस्त आणि मस्त स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी लोक ‘फ्रीडम २५१’ च्या संकेतस्थळावर गर्दी करत आहेत.

‘फ्रीडम २५१’ स्मार्टफोन कसा विकत घ्याल..
१. फ्रीडम २५१ स्मार्टफोन विकत घेण्यासाठी http://www.freedom251.com/ या संकेतस्थळाला भेट द्या.

२. संकेतस्थळाच्या दर्शनीस्थळी(होमपेज) फ्रीडम २५१ स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी देण्यात आलेल्या ‘BUY NOW’ या पर्यायावर क्लिक करा.

३. तुमच्या संदर्भातील माहिती नमूद करण्यासाठीच्या रकान्यांत योग्य माहितीची नोंद करा.

४. त्यानंतर ‘PAY NOW’ या पर्यायावर क्लिक करून तुमच्या बँक खात्याची माहिती देऊन ‘फ्रीडम २५१’ स्मार्टफोन खरेदी करता येईल

टीप: ‘फ्रीडम २५१’ या स्मार्टफोनसाठीची नोंदणी केल्यानंतर प्रत्यक्षात तो तुमच्या हातात येण्यासाठी जून महिन्याची वाट पाहावी लागणार आहे. याशिवाय, येत्या रविवारी संध्याकाळी ६ वाजेपर्य़ंतच या स्मार्टफोनच्या खरेदीची नोंदणी प्रक्रिया सुरू राहणार आहे.