आयफोन ५ हे अ‍ॅपलने बाजारात आणलेले अत्याधुनिक मॉडेल तुमच्या हातात असणे हे सध्याचे स्टेटस सिम्बॉल ठरले आहे. पण केवळ एवढय़ानेच अनेकांचे भागत नाही. मग अशी उपकरणे सोन्यामध्ये मढविण्याची खासियत असलेल्या काही लक्झरी कंपन्या त्यावर चार चाँद लावण्याचे काम करतात. अशा कंपन्यांमध्ये आघाडीवर असलेली कंपनी म्हणजे स्वरोवस्की.  असाच आयफोन ५ सोन्याने मढलेला आता स्वरोवस्की अमोसू गोल्ड या नावे बाजारात आला आहे. त्याच्या चारही बाजू  २४ कॅरट सोन्यामध्ये मढवलेल्या तर आहेतच पण त्याचबरोबर त्याचे होम बटन  हे आकाराने लहान असलेल्या महागडय़ा अशा तब्बल ६०० मौल्यवान खडय़ांनी नटविण्यात आले आहे. या फोनला ६४ जीबीची इंटर्नल मेमरी आहे. त्याच्या संरक्षणासाठी, काळजीसाठी सोबत एक चामडी कव्हरही देण्यात येते.
भारतीय बाजारपेठेतील किंमत : रु. ३.१७ लाख