स्‍मार्टफोनधारकांमध्‍ये बहुतांश जणांचा लाडका म्‍हणता येईल असा फोन म्‍हणजे आयफोन. अॅपल दरवर्षी तंत्रप्रेमींसाठी नवी मेजवानी घेऊन येत असते. 2016मध्ये बाजारात कोणती उत्पादने आणायची याबाबतची तयारी कंपनीने सुरू झाली आहे. यामध्‍ये आयफोन 7 चा समोवश असेल असे जाणकारांचे म्‍हणणे आहे. तशी तयारीही सुरू असल्‍याचे सूत्रांचे म्‍हणणे आहे. याशिवाय नुसताच फोन नाही तर त्‍यामध्‍ये वापरले जाणारे तंत्रज्ञानातही नव कल्‍पना वापणारी ही कंपनी पुढीलवर्षी कोणते नवे तंत्रज्ञान जगाला दाखवेल याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
परिसाच्‍या संपर्कात आल्‍यासवर लोखंडाचेही सोने होते अशी एक म्‍हण आहे. याच अर्थ असा नाही की नुसत्‍या लोखंडाला किंमत नाही. पण त्‍याचे सोने झालेले कुणाला नको असेल. अगदी अशीच भावना व्‍यवसाय क्षेत्रातही दिसून येते. संगणकापासून मोबाइलमधील विविध चिप्‍समध्‍ये अधिराज्‍य गाजवणारी इंटेल ही कंपनी अॅपलसोबत काम करण्‍यास मिळण्‍यासाठी धडपडत आहे. सध्‍या अॅपल आणि इंटेलचे कोणतेही करार नाहीत असे नाही. पण आयफोनमध्‍ये इंटेलची चिप यावी यासाठी कंपनीने जैय्यत तयारी सुरू केली आहे. या तयारीचाच एक महत्त्वाचा भाग म्‍हणून आगामी आयफोनध्‍ये अॅपला अपेक्षित असलेली चिप विकसित करण्‍याचे काम इंटलेमध्‍ये सुरू असून यासाठी तब्बल हजार मेंदू काम करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जर हे संशोधन पूर्ण झाले तर इंटेलला तंत्रज्ञान क्षेत्रात एक अनोखे यश मिळणार आहे.

Intel, chips, iPhone

आगामी आयफोनमध्ये ७३६० एलटीई मॉडेम चिप बसविण्यात येणार आहे ही चिप विकसित करण्यासाठी इंटेलने एक हजार कर्मचा-यांची फौज उभी केली आहे. ही चिप विकसित करण्यात इंटेलच्या कर्मचा-यांना यश आले तर मोडेम आणि अॅपलची नवीन प्रणाली एकाच चिपवर येणे शक्य होणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. या चिपच्या विकासामुळे ऑपलला आयफोनच्या एलटीई मोडेमसाठी इंटेल आणि क्वालकॉम या दोन कंपन्यांचे पर्याय खुले होतील असे इंटेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी ब्रेन क्रझनिच यांनी नुकतेच एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीमध्ये स्पष्ट केले होते. सध्या सर्व आयफोनमध्ये क्वलकॉमची एलटीई चिप वापरण्यात येते. इंटेलची ही नवी चिप या वर्षाअखेरपर्यंत निर्यात केली जाईल असेही क्रझनिच यांनी स्पष्ट केले.
इंटेलने ऑपलसाठीच्या या कामासाठी विशेष तज्‍ज्ञांची नेमणूक केली आहे. कारण हा प्रकल्प इंटेलसाठी भविष्यातील मोबाइल बाजारात वर्चस्व गाजवण्यासाठी महत्त्वाचा आहे असे सूत्रांनी स्पष्ट केले. दरम्यान या चिपसाठी अॅपल आणि इंटेलमध्ये अद्याप कोणताही करार झाला नसला तरी इंटेलकडून यासाठी परिपूर्ण प्रयत्न सुरू असल्याचे समजते. एकेकाळी चिप बाजारात अधिराज्य गाजविणा-या इंटेलने मोबाइल चिप बाजाराकडे सुरुवातीला दुर्लक्ष केले यामुळेच स्पर्धक क्वालकॉम या स्पध्ûबत खूप पुढे आहे. जर कंपनीला ऑपलसोबत काम करण्याची संधी मिळाली तर कंपनीच्या दृष्टीने ती महत्त्वाची घटना असेल असेही सूत्रांचे म्हणणे आहे. जर खरोखरच हा व्‍यवहार पूर्ण झाला तर तंत्रज्ञान क्षेत्राला नवी दिशा मिळेल असे म्‍हणणे वावगे ठरणार नाही.

@lsnirajpandit