स्कलकँडी नेविगेटर

संगीताच्या प्रेमात असलेल्या मंडळींना सारे काही चांगले लागते म्हणजेच इअरबडस् केवळ कानात घालून काम

प्रतिनिधी | February 9, 2013 01:10 am

संगीताच्या प्रेमात असलेल्या मंडळींना सारे काही चांगले लागते म्हणजेच इअरबडस् केवळ कानात घालून काम करणे त्यांना पसंत नसते. तर चांगल्या संगीताचा अनुभव घेण्यासाठी अधिक पैसे मोजण्याचीही त्यांची तयारी असते. आणि म्हणूनच ही मंडळी समोर आलेल्या पर्यायांचा स्वीकार करताना खूप विचार करताना दिसतात. संगीताच्या अशा जागरूक प्रेमींसाठीच आता स्कलकँडी या प्रसिद्ध कंपनीने नेविगेटर हा हेडफोन बाजारात आणला आहे.
याचे महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे अलीकडे बाजारात आलेल्या अनेक हेडफोन्समध्ये कान पूर्णपणे हेडफोनच्या इअरफोनमुळे झाकले जातील, असे डिझाइन असते. त्यामुळे बाहेरचे आवाज बाहेरच राहतात आणि संगीत चांगले ऐकू येते. मात्र स्कलकँडीच्या या नेविगेटरची रचना त्याप्रमाणे नाही. तरीही संगीत चांगल्या पद्धतीने ऐकण्याचा अनुभव त्यावर घेता येतो.
याचे इअरकप्स हे बंद करता येण्याजोगे आहेत शिवाय त्याची इअर पॅडस् ही सपाट आहेत. या इअर पॅडस्ची रचना मऊसूत वाटावी, अशीत आहे. तर त्याच्या बाह्य़ावरणाचा मूळ भाग हा धातूचा आहे. एव्हिएटर या सनग्लासेसकडून प्रेरणा घेत नेविगेटर हा नवा ब्रँड आकारास आला आहे. यात मायक्रोफोन आणि आय डिव्हाइस सोबत काम करणारा रिमोट यांचाही समावेश आहे. या हेडफोनच्या माध्यमातून संगीताचा आनंद लुटणे हा निश्चितच एक वेगळा आणि चांगला अनुभव ठरू शकतो.
भारतीय बाजारपेठेतील किंमत : रु. ६,९९९/-

First Published on February 9, 2013 1:10 am

Web Title: scalcandey navigater
टॅग: Nevigater,Tech-it