गेमिंग हा हल्लीच्या तरुणाईचा श्वास झाला आहे. त्यामुळे अगदी लॅपटॉप विकत घ्यायचा असो किंवा मग घरचा डेस्कटॉप त्यावर उत्तम ग्राफिक्सची सोय आहे किंवा नाही हे तरुणाईकडून सर्वप्रथम पाहिले जाते. अगदी आता सहामाही परीक्षांचा हंगाम नुकताच संपला. अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांनी परीक्षा संपल्यानंतर गेमिंग झोन गाठले होते. असा हा गेिमगचा झपाटा वाढविण्यास मदत करणारे सोनीचे प्ले स्टेशन थ्री आता भारतीय बाजारपेठेतही दाखल झाले आहे.
नवीन प्ले स्टेशन थ्री दिसायला अतिशय सडपातळ आहे. हे दोन वेगवेगळ्या प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. पहिले आहे ते ५००जीबी क्षमतेचे पीएस थ्री. यात दोन महत्त्वाच्या गेम्सचा समावेश आहे. अनचार्टेड थ्री  ड्रेक्स डिसेप्शन आणि ग्रान टुरिस्मो ५. अ‍ॅकेडमी एडिशन. नवीन रचनेमध्ये स्लायिडग डिस्क कव्हर देण्यात आले आहे. ते केवळ स्टाइलिशच नाही तर त्यामुळे त्याचा लूकही पार बदलून गेला आहे. कुठेही घरात ठेवण्यास सोपे आणि दिसायला चांगले असे त्याचे नवीन स्वरूप आहे.
याचा दुसरा प्रकार हा १२ जीबी मॉडेलचा आहे. त्यासोबत प्ले स्टेशन मूव्ह बंडल आणि मूव्ह स्ट्रीट क्रिकेट गेम्स येतात. हे सर्व भारतीय बाजारपेटेत आता उपलब्ध आहे.
भारतीय बाजारपेठेतील किंमत – रु. १९,९९०/- (५०० जीबी)
                                           रु. १८,९९०/- (१२ जीबी)