दैनंदिन जीवनात मोबाईलधारकांसाठी व्हॉटसअॅप हा जगण्याचा अविभाज्य भाग झाला असला तरी अनेकांना व्हॉटसअॅपचा वापर प्रभावीपणे कसा करायचा याबद्दलची नेमकी माहिती नसते. बहुतेकवेळेला वापरकर्त्यांना व्हॉटसअॅपच्या संपूर्ण वैशिष्ट्यांची माहिती नसते. अँड्रॉईड फोन्ससाठी नुकत्याच आलेल्या व्हॉटसअॅपच्या अपडेटड व्हर्जनमध्ये अशाच काही नव्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे. व्हॉटसअॅपच्या २.१२.२४१ या नव्या व्हर्जनमधील वैशिष्ट्यांमुळे हे अॅप्लिकेशन हाताळायला आणखी सोपे झाले आहे. यामध्ये कस्टम नोटिफिकेशनची सोय देण्यात असून त्यामुळे आता वापरकर्त्याला व्हॉटसअॅपवर नव्याने पाठविलेला चॅट वाचण्यासाठी प्रत्येकवेळी अॅप्लिकेशन उघडावे लागणार नाही.

व्हॉटसअॅपच्या नव्या व्हर्जनमधील काही प्रमुख वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे:

कस्टम नोटिफिकेशन्स– ही सुविधा सुरू करण्यासाठी चॅटमधील वरच्या बाजूस असणाऱ्या व्यक्तीच्या नावावर क्लिक करावे. याशिवाय कस्टम नोटिफिकेशन्समुळे तुम्ही प्रत्येक व्यक्तीकडून पाठविण्यात येणाऱ्या चॅटसाठी वेगवेगळी नोटिफिकेशन टोन किंवा रिंगटोन सेट करू शकता.

 

whatsapp-update1

पॉपअप नोटिफिकेशन्स– व्हॉटसअॅपवर मॅसेज मिळाल्यानंतर तुम्हाला प्रत्येकवेळी अॅप्लिकेशन उघडायला कंटाळा येत असेल. मात्र, कस्टम नोटिफिकेशन्समध्ये देण्यात आलेल्या सुविधेमुळे तुम्ही आता स्क्रीनवर पॉप-अपच्या स्वरूपात मॅसेज बघू शकता आणि अॅप्लिकेशन न उघडता तिथूनच त्याला उत्तर देऊ शकता. ही सुविधा सुरू करण्यासाठी सेटिंगमध्ये जाऊन नोटफिकेशन्स हा पर्याय निवडावा. याठिकाणी तुम्हाला पॉप-अपचे निरनिराळे पर्याय दिसतील. यापैकी एक पर्याय तुम्ही सोयीप्रमाणे निवडून शकता. विशेष म्हणजे, केवळ एखाद्या ग्रुप किंवा व्यक्तीचेच पॉपअप नोटिफिकेशन्स तुम्हाला हवे असतील तर तीही सुविधा यामध्ये देण्यात आली आहे. संबंधित ग्रुप किंवा व्यक्तीच्या व्हॉट्अॅप प्रोफाईलवर क्लिक केल्यास त्याखाली पॉपअप नोटिफिकेशनचा पर्याय देण्यात आला आहे. तो निवडल्यानंतर सरसकट सर्वांचेच नोटिफिकेशन्स मिळण्याऐवजी तुम्ही सुनिश्चित केलेल्या व्यक्ती किंवा ग्रुपचेच नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील.

whatsapp-android-app-updateमार्क अॅज अनरीड– या सुविधेमुळे तुम्ही एखादा वाचलेला चॅट पुन्हा अनरीड करू शकता. समजा, तुम्हाला एखादा चॅट वाचताना अचानक काही काम आले आणि तुम्ही तो चॅट अर्धवटच वाचला असेल तर, नंतर आठवण रहावी म्हणून तुम्ही तो चॅट अनरीड करू शकता. त्यामुळे मोकळ्या वेळेत अॅप्लिकेशन उघडल्यानंतर तुम्हाला तो चॅट अनरीड दिसेल.

म्युट चॅट– तुम्हाला एखाद्याशी चॅट करायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही त्या व्यक्तीला म्युट चॅटद्वारे गप्प करू शकता.

whatsapp2लो डेटा युसेज– तुम्ही व्हॉटसअॅप कॉल करताना वाय-फायवर नसाल तर तुमचा बराच मोबाईल डेटा खर्ची पडतो.  मात्र, आता नव्या व्हर्जनमध्ये तुम्ही कॉल्स टॅब सेटिंगमध्ये जाऊन चॅट आणि कॉल पर्यायावर क्लिक करा. यामधील लो डेटा युसेजच्या पर्यायावर क्लिक करावे. यामुळे मोबाईल डेटाची बचत होत असल्याचा  दावा व्हॉटसअॅपकडून करण्यात आला आहे.

नेटवर्क युसेज– या सुविधेमुळे तुम्ही व्हॉटसअॅपसाठी किती मोबाईल डेटा खर्ची पडत आहे, यावर लक्ष ठेवू शकता. याशिवाय, नव्या व्हर्जनमध्ये कॉन्टॅक्ट लिस्ट आणि कॉल इंटरफेसमध्ये काही बदल करण्यात आले आहेत.

आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे नवीन व्हर्जनमध्ये खास ‘मिडल फिंगर’ भावनादर्शकांचा समावेश करण्यात आला आहे.