* मला एकाच फोनमध्ये दोन व्हॉट्स अ‍ॅप खाती सुरू करावयाची आहेत यासाठी काय करता येईल.
– दिनेश सप्तर्षी
* जर तुमच्याकडे डय़ुएल सिमचा फोन असेल तर तुम्हाला दोन व्हॉट्स अ‍ॅप खाती वापरणे गरजेचेच होणार आहे. यासाठी अँड्रॉइड फोनमध्ये बहुवापरकर्ते असा पर्याय असतो. ज्याचा वापर करून तुम्ही हे साध्य करू शकता. यासाठी तुम्हाला सर्वप्रथम अँड्रॉइड फोनमध्ये बहु वापरकर्ते पर्याय सुरू करावा लागेल. यासाठी सेटिंग्जमध्ये जाऊन युजरमध्ये अ‍ॅड युजर हा पर्याय निवडा. या पर्यायानंतर वापरकर्त्यांचा सर्व तपशील त्यातध्ये द्या. यानंतर नोटिफिकेशन बार खाली करून तेथे आलेल्या न्यूयुजर आयकॉनवर क्लिक करा. एकदा नवीन वापरकर्त्यांचा पर्याय निवडला की तुम्हाला नवीन फोनसारखा लूक दिसेल. यानंतर त्या वापरकर्त्यांसाठी व्हॉट्स अ‍ॅप डाऊनलोड होईल. ते डाऊनलोड झाल्यावर तुम्हाला दोन व्हॉट्स अ‍ॅप एका फोनवर वापरता येणे शक्य होणार आहे. जर तुम्हाला हा मार्ग किचकट वाटला असेल तर तुम्ही ओजी व्हॉट्स अ‍ॅपच्या साह्यानेही दोन व्हॉट्स अ‍ॅप खाती वापरू शकता. यासाठी सर्वप्रथम व्हॉट्स अ‍ॅपचा बॅक अप घ्या. यानंतर तो रिस्टोअर करा. मग सेटिंग्जमध्ये जाऊन अ‍ॅप्समध्ये व्हॉट्स अ‍ॅपचा पर्याय निवडून क्लिअर डेटा करा. मग एसडीकार्डमध्ये व्हॉट्स अ‍ॅपमध्ये जाऊन व्हॉट्स अ‍ॅपला ‘ओजी व्हॉट्स अ‍ॅप’ हे नाव द्या. यानंतर मूळ व्हॉट्स अ‍ॅप अनइंस्टॉल करा. यानंतर ogwhatsapp.en.uptodown.com/android” \t “_blank” या लिंकवरून अ‍ॅप डाऊनलोड करा. हे अ‍ॅप इंस्टॉल झाल्यावर तुमचा आधीचा व्हॉट्स अ‍ॅप क्रमांक यावर व्हेरीफाय करून घ्या. यानंतर पुन्हा अधिकृत व्हॉट्स अ‍ॅप इंस्टॉल करा. मग तुम्हाला एकाच फोनवर दोन व्हॉट्स अ‍ॅप करता येऊ शकणार आहे.
तंत्रस्वामी