गतवर्षी नोव्हेंबरमध्ये निश्चलनीकरण झाल्यानंतर भारतात डिजिटल पेमेंट किंवा रोकडविरहित व्यवहारांचे प्रमाण निश्चितच वाढले आहे. पण त्याच वेळी तंत्रज्ञान जगाला ‘वेअरेबल्स’ उपकरणांच्या माध्यमातून व्यवहार करण्याचे वेध लागत आहेत. व्यवहारांसाठी कार्डवापराला मिळालेला वेग आणि त्यानंतर स्मार्टफोन वॉलेट्सच्या माध्यमातून सुरू झालेले व्यवहार यांमुळे ग्राहक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नवीन पर्याय उपलब्ध झाला आहे. मनगटावरील स्मार्टवॉच किंवा बोटातल्या अंगठीला ‘टच’ करून खरेदी करण्याचे तंत्रज्ञान भारतीय बाजारपेठेलाही खुणावू लागले आहे.

स्मार्ट वॉचसह शॉपिंग व रेस्टॉरण्टची बिले भरणे किंवा फिटनेस बॅण्डमधील ‘एम्बेडेड चिप’चा वापर करीत बस तिकीट घेणे किंवा भविष्यात कुणास ठाऊक, कार्यक्रमासाठी तिकिटे घेण्याकरिता बोटामधील अंगठीचा वापर अशा गोष्टी भारतात लवकरच सत्यात अवतरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दैनंदिन जीवन सुलभ करण्याच्या हेतूसह, ‘कॉन्टॅक्टलेस’ तंत्रज्ञान आपण प्रवास, मनोरंजन, खाद्यपदार्थ व इतर अनेक गोष्टींसाठी वापरीत असलेल्या पेमेण्ट्स पद्धतीमध्ये परिवर्तन घडवून आणत आहे. स्मार्टवॉचेस् व फिटनेस ट्रकर्स हे सर्वाधिक दिसण्यात येणारे ‘वेअरेबल पेमेण्ट डिवाइसेस’ आहेत. नवीनतम वापराची ही उदाहरणे दर्शवितात की आपले दैनंदिन जीवन अधिक सुलभ व गतिमान करण्याकरिता नवीन तंत्रज्ञाने कशा प्रकारे सहजपणे डिवाइसेसमध्ये रूपांतरित होऊ शकतात.

हे तंत्रज्ञान काय आहे?

‘पेमेण्ट वेअरेबल्स’ हे कोणतेही साधन, म्हणजेच ‘वेअरेबल इलेक्ट्रॉनिक डिवाइस’ म्हणून स्पष्ट करता येऊ शकते. ते ‘ईएमव्ही कॉन्टॅक्टलेस कार्ड’च्या सर्व कार्यक्षमता देण्यासोबतच तुमच्या कोणत्याही पेमेण्ट आवश्यकताना (व्यवहारांना) सुविधा देण्याकरिता पेमेण्ट चिप/नीअर फिल्ड कम्युनिकेशन (एनएफसी) अ‍ॅन्टेनाने युक्त आहे. वापरण्यास सुलभ असलेले आणि स्मार्टवॉच किंवा स्मार्ट बॅण्डने युक्त असलेले ‘कॉन्टॅक्टलेस पेमेण्ट वेअरेबल्स’च्या माध्यमातून जगभरात प्रचंड भरारी घेत आहे. हा तंत्रज्ञानयुक्त प्लॅटफॉर्म दैनंदिन व कमी किमतीच्या पेमेण्ट्ससाठी वापरामधील सुलभता, सोईस्करपणा व स्थिरतेची खात्री देतो. रेस्टॉरण्ट्स, चित्रपटगृहे, वेंडिंग मशीन्स, स्टेडियम्स अशा ठिकाणी कॉन्टॅक्टलेस पेमेण्ट झपाटय़ाने वाढत आहे. ‘गार्टनर’ अहवालानुसार, विकसित अर्थव्यवस्था असलेल्या देशांमधील निम्मे ग्राहक २०१८ पर्यंत मोबाइल पेमेण्ट्ससाठी स्मार्टफोन्स किंवा वेअरेबल्सचा वापर करण्याची अपेक्षा आहे.

याची सुरुवात कुठून झाली?

रोख रक्कम गमावण्याची भीती दूर करण्याच्या आणि रिटेल आऊटलेट्समधील सामान व सेवांसाठी सुलभ पेमेण्ट्स करण्याच्या गरजेसह पेमेण्ट्स क्षेत्रामध्ये क्रांतिकारी बदलाची सुरुवात झाली. कागदी चलनाच्या जागी चुंबकीय स्ट्रिपने युक्त कार्ड्सचा वापर होण्यासह परिवर्तनाला सुरुवात झाली. ग्राहक पॉइण्ट-ऑफ-सेल (पीओएस) टर्मिनल येथे ही कार्ड्स सहजपणे स्वाइप करू शकले, ज्यामधून विक्रेत्याला डिजिटल रूपामध्ये ग्राहकाची माहिती सुलभपणे प्राप्त होऊ शकली. तंत्रज्ञानाने स्वाक्षरी प्रमाणीकरण प्रक्रियेला डिजिटल पिनमध्ये रूपांतरित केले, ज्याला आता उदयोन्मुख एनएफसी तंत्रज्ञानासह आणखी एक उल्लेखनीय परिवर्तन दर्जा मिळाला आहे.

आपण सध्या कुठे आहोत?

व्यापक प्रमाणात पसरलेल्या ‘एनएफसी एनेबलमेण्ट’साठी कॉन्टॅक्टलेस रीडर्स’चा वापर फास्टफूड व पेय उद्योग, रिटेल दुकाने, मनोरंजन

क्षेत्रे येथे सुरू आहे. जगभरातील सार्वजनिकपरिवहन विभागांनी दैनंदिन प्रवाशांसाठी पेमेण्ट व वापरामध्ये सुलभता आणण्याकरिता ‘कॉन्टॅक्टलेस रीडर्स’ स्थापन केले आहेत. एका अहवालानुसार, जागतिक पीओएस टर्मिनल बाजारपेठ २०२० पर्यंत ७३.१२ अब्ज डॉलपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.

‘वेव्ह अ‍ॅण्ड पे’ किंवा ‘टॅप अ‍ॅण्ड गो’ म्हणून प्रचलित असलेल्या कॉन्टॅक्टलेस पेमेण्ट तंत्रज्ञानाने भारतातही अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. प्रदर्शनीय आकर्षण दर्शविण्यास सुरुवात केली आहे. कॉन्टॅक्टलेस कार्ड्स व टोकनच्या दाखलीकरणासह, दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (डीएमआरसी)ने सोईस्कर प्रवासासाठी काही पावले उचलली आहेत. याव्यतिरिक्त, आयसीआयसीआयसारख्या बँकांनी या कार्यक्षमतेला पाठिंबा दर्शविण्याकरिता विविध सार्वजनिक परिवहन युनिट्स व मास्टरकार्डशी हातमिळवणी केली आहे. भारताच्या मेट्रो शहरांमधील प्रवासी आता स्टेशनवर टोकन्स खरेदी करण्याकरिता किंवा त्यांचे स्मार्ट कार्ड बॅलन्स रिचार्ज करण्याकरिता रांगेचा त्रास दूर करीत त्यांचे कॉन्टॅक्टलेस कार्ड्स स्वाइप करू शकतात.

‘कॉन्टॅक्टलेस वेअरेबल्स’चा वापर कुठे होऊ शकतो?

सार्वजनिक वाहतूक यंत्रणा – सिंगापूरमध्ये प्रवासी बसेस, टय़ूब्स व ट्रेन्समधील तिकिटांसाठी ‘कॉन्टॅक्टलेस कार्ड’चा वापर केला जातो. लंडनमध्ये, प्रवासी टय़ूबची सेवा प्राप्त करण्याकरिता प्रवासी त्यांच्या अ‍ॅप्पल वॉचेसवरील अ‍ॅप्पल पे, तसेच बार्कलेकार्ड या पेमेण्ट रिस्टबॅण्ड्सचा वापर करतात. भारतातसुद्धा, दिल्ली, मुंबई, म्हैसूर व बंगळुरूमधील मेट्रो रेल कॉर्पोरेशन्सने कॉन्टॅक्टलेस तिकीटिंग तंत्रज्ञानाला सक्षम करण्याकरिता विविध बँकांशी हातमिळवणी केली आहे.

मोठमोठे कार्यक्रम –  कॉन्टॅक्टलेस वेअरेबल तंत्रज्ञानाने जलद प्रवेश/एक्झिट आणि रांगांच्या व्यवस्थापनाच्या संदर्भात जमावाचे व्यवस्थापन करण्यामध्ये मोठे साहाय्य दिले आहे. रिस्टबॅण्ड्सच्या माध्यमातून स्टेडियममधील प्रवेश व र्मचडाइज पेमेण्ट्सच्या सक्षमीकरणाने तुमचे वॉलेट बाहेर काढून कागदी तिकिटे दर्शविण्याचा किंवा खाद्यपदार्थ व र्मचडाइज खरेदी करण्याकरिता परिवारामधील सदस्यांना रोख रक्कम देण्याचा त्रास दूर केला आहे. या सुलभ व मजेशीर प्रक्रियेसह, तुम्ही तुमच्या रिस्टबॅण्ड्समध्ये क्रेडिटची भर करीत निर्धास्त राहू शकता, जेथे तुम्ही अशा भव्य कार्यक्रमांसाठी कमी रक्कम किंवा विनारक्कम जाऊ शकता. डिस्नेने नुकतेच मॅजिकबॅण्ड्स लाँच केले, हे अनोख्या प्रकाराचे रिस्टबॅण्ड्स आहेत, जे पेमेण्ट्सची सुलभ सुविधा देण्यासोबतच पर्यटकांना हॉटेल रूम्स सुलभपणे उपलब्ध करून देण्याची आणि वॉल्ट डिस्ने वर्ल्ड रिसॉर्ट्सना भेट देताना लांबच लांब रांगांचा त्रास दूर करण्याची सुविधा देतात.

भारतातील ‘कॉन्टॅक्टलेस’ तंत्रज्ञानाचे भवितव्य

भारतातील बँका व इतर भागधारक दाखल करीत असलेल्या कॉन्टॅक्टलेस प्रकल्पांच्या वाढत्या संख्येसह, पेमेण्ट्ससाठी स्मार्ट वेअरेबल्सच्या वापराला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. लघू व मध्यम व्यवसाय संख्येमध्ये झालेल्या वाढीमुळे विकसित पेमेण्ट्स इकोसिस्टमला सुद्धा चालना मिळेल आणि पीओएस/मोबाइल पीओएस टर्मिनल्सच्या संख्येमध्ये झपाटय़ाने वाढ होईल. फिटबिटीसारखे अधिकाधिक डिवाइस निर्मात्या कंपन्या पेमेण्टचा पुढील माध्यम म्हणून वेअरेबल्सच्या दिशेने वाटचाल करीत असताना, आपण निश्चितच या क्षेत्रामध्ये अतिरिक्त उत्पादने दाखल होण्याची अपेक्षा करू शकतो. आणि फक्त टेक कंपन्यांच नव्हे, तर क्रेडिट कार्ड जारीकर्ता कंपन्यासुद्धा जगभरात कॉन्टॅक्टलेस सुविधा देण्याकरिता संस्थांसह कार्य करीत आहेत.

अतुल सिंग

(लेखक ‘जिमाल्टो’ या कंपनीच्या बँकिंग व ट्रान्सपोर्ट सोल्युशन्स (भारतीय उपखंड) विभागाचे प्रादेशिक संचालक आहेत.)