पूर्वीपासून हुंडाबळी, कौटुंबिक हिंसाचार, छेडछाड, कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ, एकतर्फी प्रेमातून होणारा छळ अशा अनेक पद्धतींचा हिंसाचार स्त्रियांवर होत होता आणि आता तर त्यामध्ये इंटरनेटमुळे होणाऱ्या छळाचाही समावेश झाला आहे.

इंटरनेट सर्वत्र रुजण्याआधी पत्रे पाठवून किंवा फोनवरून महिलांना अश्लील संदेश पाठवण्याचे प्रकार सुरूच होते; पण आता ईमेल हे यासाठी मोठे माध्यम ठरू लागले आहे. विशेषत: तरुणींना ब्लॅकमेल करणे, धमकावणे किंवा त्यांच्याशी अश्लील संवाद साधण्याचा प्रयत्न करणे, असे प्रकार अलीकडे ईमेलवरून सर्रास घडत आहेत. बहुतांश प्रकरणांमध्ये संबंधित महिलेच्या जवळची वा परिचयाची व्यक्तीच यामागे असते. मात्र, बनावट अकाऊंट तयार करून ही मंडळी ‘सायबर स्टॉकिंग’ करत असतात.

businessman was cheated
धक्कादायक! इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचा व्हिडीओ वापरुन व्यावसायिकाची दहा लाखांची फसवणूक
Bitcoin Halving
बिटकॉइन हॉल्व्हिंग म्हणजे काय आणि क्रिप्टोसाठी त्याचा अर्थ काय?
anant ambani and radhika merchant pre wedding food menu
२५०० पदार्थ, ६५ शेफ अन्…; अनंत-राधिकाच्या प्री वेडिंग कार्यक्रमात पाहुण्यांसाठी असणार खास जेवण, मेन्यू आला समोर
Paytm Fastag
Paytm Fastag Deactivate कसं कराल? सहज-सोप्या पद्धती जाणून घ्या!

‘सायबर स्टॉकिंग’ या प्रकारात इंटरनेटच्या माध्यमातून पीडित व्यक्तीला त्रास दिला जातो. त्यामध्ये फोन कॉल्स करणे, व्यक्तीविरुद्ध त्याच्या वस्तूवर घाणेरडे संदेश किंवा वाक्य लिहिणे असे कृत्य केले जाते. बऱ्याचदा या प्रकारामधील गुन्हेगार हा प्रेमभंग झालेला, एकतर्फी प्रेम करणारा असतो, तर काही वेळा अपमानित व्यक्ती सूड उगवण्याच्या भावनेनेही अशी कृती करत असतो. या प्रकारात पीडित व्यक्तीची संपूर्ण वैयक्तिक माहिती, कौटुंबिक माहिती, फोन नंबर आणि पीडित व्यक्तीची दैनंदिनी या सर्वाची माहिती जमा करून त्या माहितीचा वापर करून पीडित व्यक्तीला इजा पोहोचवली जातो. ही वैयक्तिक माहिती इंटरनेटच्या सेक्स सव्‍‌र्हिस किंवा डेटिंग सव्‍‌र्हिसच्या वेबसाइटवरही पोस्ट केली गेल्याचे प्रकारही घडलेले आहे

इंटरनेटच्या छळाचे काही प्रकार

सायबर डिफेमेशन – पीडित व्यक्तीची बदनामी होईल, अशा प्रकारचा मजकूर ई-मेल, सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित करणे.

मॉर्फिग – पीडित व्यक्तीच्या छायाचित्रांमध्ये बदल करून त्यांना अश्लील रूप देणे व अशी खोटी छायाचित्रे विविध माध्यमांतून प्रसारित करणे.

अशा प्रकारे ‘सायबर स्टॉकर्स’ मुली/महिलांना त्रास देत असतात. यामुळे संबंधित महिला मानसिक तणावाखाली येते; परंतु पोलीस किंवा कायदेशीर यंत्रणांकडे तक्रार करायला गेल्यास आपलीच बदनामी होण्याच्या भीतीपोटी त्या पुढे येत नाहीत. प्रसंगी काही पीडित तरुणी आत्महत्येसारखे दुर्दैवी आणि अत्यंत चुकीचे पाऊल उचलताना दिसतात. त्यामुळे महिलांनी इंटरनेट सुरक्षेच्या नियमांच्या बाबतीत अधिक संवेदनशील राहून विशेष सावधगिरी बाळगली पाहिजे. ‘ऑनलाइन स्टॉकिंग’ होत असेल तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. अशा स्टॉकर्सचा तत्काळ बंदोबस्त करणे गरजेचे असते.

सायबर स्टॉकर्सवर वचक ठेवण्यासाठी प्रत्येक मोठय़ा शहरात पोलिसांचे विशेष सायबर क्राइम सेल आहेत. जिथे तक्रार नोंदवल्यावर या स्टॉकर्सच्या आयपी अ‍ॅड्रेसवरून त्यांचा पत्ता शोधून काढला जातो व त्यांचा त्रास कायमचा बंद होऊ  शकतो. तरीही सायबर स्टॉकरकडून दिला जाणारा त्रास बंद करण्याकरिता इंटरनेटवरील सुरक्षा नियमांचे पालन करणे कधीही चांगले. या सुरक्षा उपायांमुळे संबंधित ‘स्टॉकर’ला ‘ब्लॉक’ करणे किंवा त्याच्याबद्दल इंटरनेट यंत्रणेकडे ‘रिपोर्ट’ करणे, हे उपाय अगदी घरबसल्याही करता येतात. हे प्रकार करूनही ‘स्टॉकर’ बधत नसेल तर त्याची पोलिसांकडे नक्कीच तक्रार करायला हवी.

 

‘स्टॉकिंग’ रोखण्यासाठी काय कराल?

*कोणतीही खासगी माहिती कधीही सोशल मीडियावर देऊ नका.

*अतिशय खासगी माहिती किंवा फोटो सोशल साइटवर टाकू नका

*त्रास देणाऱ्या व्यक्तींना ‘ब्लॉक’ करा.

*अकाऊंट्सचे पासवर्ड वारंवार बदलत राहा.

*सोशल मीडिया अकाऊंटला कोणत्या व्यक्ती भेट देतात याची तपासणी करा.

*मित्र-मैत्रिणींच्या तसेच ओळखीच्या व्यक्तीच्या अकाऊंटवरून काही आक्षेपार्ह संदेश येत असतील तर त्यांच्याकडून खातरजमा करून घ्या.

*अनोळखी ई-मेल्स उघडून पाहू नका.

*अनोळख्या व्यक्तींची ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ मंजूर करू नका.

*अनोळख्या व्यक्तीशी ऑनलाइन चॅटिंग टाळा.

सायबर कायदे

सायबर स्टॉकिंगमध्ये छायाचित्रे किंवा व्हिडीओ मिळवून ते पोर्नोग्राफी साइट्सवर वापरले जातात. आपल्याकडे आयटी अ‍ॅक्ट २००० हा सायबर क्राइमसाठी बनवलेला अत्यंत कडक असा कायदा अस्तित्वात आहे. या कायद्यांतर्गत सायबर स्टॉकरला कडक अशी शिक्षा होऊ  शकते. गुन्हा सिद्ध झाल्यास दहा वर्षे तुरुंगवास व मोठा  दंड होऊ  शकतो; पण जर स्टॉकर हा परदेशातील असेल तर त्याला आपल्या कायद्यांतर्गत आपण काहीच प्रतिबंध करू शकत नाही. त्यामुळे इंटरनेटवर सक्रिय राहताना महिलांनी खूप सजग राहणे आवश्यक आहे.

– प्रा योगेश  हांडगे

(लेखक पुणे इन्स्टिटय़ूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कॉम्प्युटर विभागात साहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.)