ऑनलाइन खरेदी जत्रेला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. या खरेदीजत्रेत मोठय़ा प्रमाणावर सवलती आणि एकापेक्षा एक आकर्षक ऑफर्स देण्यात आल्या आहेत. पण त्या ऑफर्सच्या जोडीला आणखीही सवलत मिळवण्याची आपल्याला संधी असते. इतकेच नव्हे तर ही सवलतींची भेट आपल्या प्रिय व्यक्तींना देण्याचीही मुभा आपल्याला आहे. यासाठी मायाजालात विविध ई-व्यापार संकेतस्थळांचे कूपन्स उपलब्ध करून देणारी संकेतस्थळं उपलब्ध आहेत. याचा फायदा घेत आपण आणखी कमी पैशांत खरेदी करू शकतो. पाहुयात आपल्याला कूपन ‘भेट’ देणाऱ्या विविध संकेतस्थळांचे पर्याय.

कूपनकॅनी

rain Mumbai,
मुंबईसह ठाण्यात पावसाच्या हलक्या सरींची शक्यता
Big falls in Sensex and Nifty
सेन्सेक्स अन् निफ्टीत मोठ्या प्रमाणात पडझड; शेअर बाजाराच्या घसरणीला ‘या’ तीन गोष्टी ठरल्या कारणीभूत
Security guards have fake police character verification certificates
पिंपरी : धक्कादायक! सुरक्षारक्षकांकडे बनावट पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्रे
Indiscriminate firing in nagpur by criminal over money of MD
नागपुरात एमडीच्या पैशावरून गुन्हेगाराचा अंधाधुंद गोळीबार, कुख्यात टोळ्या पुन्हा…

CouponCanny.in हे ऑनलाइन कूपन्स उपलब्ध करून देणारे सर्वाधिक वापराचे संकेतस्थळ मानले जाते. बाजारात उपलब्ध असलेल्या ई-संकेतस्थळांवरील विविध ऑफर्सच्या कूपन्ससोबत ऑफलाइन बाजारातील विविध ब्रँड्स, फर्निचर. इलेक्ट्रॉनिक्स. खाद्यपदार्थाचे ब्रँड्स, किरकोळ विक्रेते यांसोबत कंपनीने सहकार्य करार केला असून त्याद्वारे संबंधित दुकानांच्या वा संकेतस्थळांच्या ऑफर्स या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्या जातात. यात प्रवास, कपडे, भेटवस्तू, क्रीडा, घरे आदी प्रकारांतील दुकानांचे कूपन्स उपलब्ध आहेत. या कंपनीचे अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील, मयंत्रा, जबाँग, ई-बेसारख्या ब्रँडसोबत सहकार्य करार केलेले आहेत. हे संकेतस्थळ अगदी नव्या वापरकर्त्यांसाठीही वापरास सोपे आहे. या संकेतस्थळावर आपल्याला विविध ई-दुकाने दिसतील. ही दुकाने इंग्रजी अद्याक्षरांच्या क्रमानुसार रचलेली असल्यामुळे आपल्याला पाहिजे तो ब्रँड शोधण्यास सोपा जातो. आपण या संकेतस्थळावरील ज्या सवलतींचे पर्याय निवडतो त्याचा इतर वापरकर्त्यांना कसा फायदा झाला. त्या सवलतीला इतर वापरकर्त्यांनी कसे सहकार्य केले याबाबतची मते आणि मुल्यांकनही केलेले असते. याचा फायदाही आपल्याला पर्याय निवडताना होतो. या संकेतस्थळावर आपण नोंदणी केल्यानंतर त्यावरील विविध सवलतींचा फायदा आपण घेऊ शकतो. यामध्ये आज कोणत्या सवलती उपलब्ध आहेत याचा तपशीलही समोर झळकविला जात असल्यामुळे अनेक आकर्षक सवलतींचा लाभ आपल्याला होऊ शकतो.

मायडेला

वापरकर्त्यांसाठी अगदी सोपे असे संकेतस्थळ म्हणून MyDala.com ची विशेष ओळख आहे. यामध्ये तुम्हाला ई-व्यापार संकेतस्थळांवरील विविध सवलतींची माहिती आणि कूपन्स उपलब्ध आहेतच. याचबरोबर वेगवेगळय़ा शहरांमधील किरकोळ किंवा ब्रँडेड दुकानांच्या सवलतीच्या कूपन्सचा तपशीलही उपलब्ध करून देण्यात आला आहे. यात विविध गृहोपयोगी वस्तूंपासून ते अगदी हॉटेल्स किंवा आपल्या आसपासच्या कॅफेजमधील ऑफर्सचाही तपशील देण्यात आलेला असतो. या कंपनीचे अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील, मयंत्रा, जबाँग, ई-बेसारख्या ब्रँडसोबत सहकार्य करार केलेले आहेत. यामुळे या संकेतस्थळावरील सवलतींचे कूपन्स येथे उपलब्ध आहेत.

कूपनदुनिया

नानाविध भारतीय आणि आंतरराष्ट्रीय ब्रँड्सच्या सवलती कूपन्समध्ये रमविणारे संकेतस्थळ म्हणून CouponDunia.in या संकेतस्थळाची ओळख आहे. या संकेतस्थळाची खासियत म्हणजे आपण ज्या भागात आहोत त्या भागातील सर्वोत्तम ऑफर्सचा तपशील या संकेतस्थळावर आपल्याला मिळू शकतो. यामध्ये कूपन ऑनलाइन किंवा ऑफलाइन खर्च करण्याची मुभा देण्यात आलेली आहे. हे संकेतस्थळ वापरकर्त्यांसाठी अगदी सोपे असून यावर नोंदणी केल्यानंतर आपण संकेतस्थळाच्या पहिल्या पानावर सर्व ई-व्यापार संकेतस्थळांची माहिती मिळवू शकतो.

कॅशकरो

ऑनलाइन उत्पादनांची खरेदी करताना CashKaro.com या संकेतस्थळाला नक्की भेट द्यावी. या संकेतस्थळावर आपल्याला पाहिजे ते उत्पादन शोधले की विविध ई-व्यापर संकेतस्थळांवर त्या उत्पादनाची काय किंमत आहे. त्याची उप्लब्धता. याबाबतचा तुलनात्मक तपशील आपल्यासमोर उभा राहतो. यातील एक पर्याय आपण निवडल्यानंतर त्यासाठी उपलब्ध असलेल्या सवलती आपल्याला दाखल्या जातात. या सवलतींचा फायदा घेत आपण याच संकेतस्थळाच्या माध्यमातून खरेदी करू शकतो. इतकेच नव्हे तर आपल्याला जर पैसे परतावा मिळणार असले तर तोही बँक खात्यामध्ये पोहचवण्याची सोय या संकेतस्थळामध्ये उपलब्ध आहे. याचबरोबर आपल्याला पैसे परतावा बँकेत नको असेल तर तो कूपनच्या स्वरूपातही उपलब्ध करून दिला जातो.

देसीडाइम

ई-व्यापार संकेतस्थळांमध्ये उपलब्ध असलेल्या विविध सवलती आणि तेथील कूपन कोड्सविषयीची माहिती उपलब्ध करून देणारे पहिले संकेतस्थळ म्हणून DesiDime.com या संकेतस्थळाची ओळख आहे. आपण शोधत असलेल्या उत्पादनावर कोणत्या संकेतस्थळाच्या माध्यमातून अथवा कोणत्या विक्रेत्याच्या माध्यमातून किती सवलत आहे याचा तपशील देण्यात येतो. याचबरोबर यामध्ये कोणत्या विक्रेत्याकडून कोणत्या सवलती आहेत याचा तपशील विक्रेत्यांच्या नावानुसार उपलब्ध करून देण्यात आला आहे. म्हणजे आपल्याला एका विशिष्ट विक्रेत्याच्या उत्पादनाची खरेदी करावयाची असेल तर त्यानुसारही आपण सवलती घेऊन त्याचा फायदा घेऊ शकतो. याचबरोबर या संकेतस्थळावर ‘शोध’ पर्याय देण्यात आला आहे. यामुळे एखाद्या उत्पादनावर किती सवलत उपलब्ध आहे याचा तपशील आपल्याला या ‘शोध’ पर्यायाच्या माध्यमातून समजू शकतो.

फ्लिप्ट

हे एक जागतिक पातळीवरील उत्पादनांवर कूपन्स पुरविणारे संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळाचे नाव भारतात flipit.com/in असे आहे. या संकेतस्थळाचे वैशिष्टय़ म्हणजे यावर विविध ऑफर्सच्या ओझ्याखाली ग्राहकांना ठेवले जात नाही. या संकेतस्थळाच्या पहिल्या पानावर ऑफर्सच्या ऐवजी केवळ ब्रँड्सची नावे देण्यात आली आहेत. तुम्ही तुम्हाला पाहिजे त्या ब्रँडचा पर्याय निवडून तुम्हाला पाहिजे ती सवलत घेऊ शकता.

याशिवाय कूपन्स उपलब्ध करून देणारी इतर संकेतस्थळं

+ MaddyCoupons.in

+ Buy1Get1.in

+ Couponhaat.in

+ Indiafreestuff.in

+ CouponZClub.com

+ Taazacoupons.in

+ Upto75.com

+ CouponMachine.in

+ Freeclues.com

+ ShopPirate.in

नीरज पंडित – niraj.pandit@expressindia.com