सध्या सरकारी पातळीवर सर्वच गोष्टी ऑनलाइन होत आहे. यामुळे जर एखादे सरकारी काम करायचे असेल तर गुगल सर्च करून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र तसे होत असताना अनेकदा इतर संकेतस्थळांचा तपशील आधी येतो. यामुळे मला सर्व सरकारी अधिकृत संकेतस्थळांची माहिती कोठे उपलब्ध होऊ  शकेल याबाबत माहिती हवी आहे.    

– सुरेश संपत, नंदुरबार

देशात ई-गव्हर्नन्सचा प्रभाव वाढत आहे. यामुळे सर्वच सरकारी विभागांची संकेतस्थळं उपलब्ध झाली आहेत. यामध्ये केंद्र सरकारच्या तसेच विविध राज्य सरकारच्या संकेतस्थळांचाही समावेश आहे. इतकेच नव्हे तर रेल्वे तिकिटापासून इतर अनेक सेवा पुरविण्यासाठीही संकेतस्थळे सुरू करण्यात आली आहेत. या सर्व संकेतस्थळांची लिंक तुम्हाला एकत्रित हवी असेल तर ँ३३स्र्://ॠ्र्िर१ीू३१८.ल्ल्रू.्रल्ल/्रल्लीि७.स्र्ँस्र् या संकेतस्थळाला भेट द्या. यावर तुम्हाला केंद्र सरकारच्या तसेच विविध राज्य सरकारांच्या विविध विभागांत सेवांची माहिती उपलब्ध होणार आहे. याशिवाय देशांतील विविध न्यायालयांची माहितीही या संकेतस्थळावर तुम्हाला मिळू शकेल. राज्यनिहाय किंवा विभागनिहाय विभागणी केल्यामुळे पाहिजे ते संकेतस्थळ शोधणेही सोपे होणार आहे.

माझ्या मोबाइलमध्ये आठ जीबीअंतर्गत साठवणूक क्षमता आहे. शिवाय मी १६ जीबीचे कार्डही वापरत आहे. असे असतानाही मला सतत मेमरी संपली असे सांगितले जाते. जर मला माहिती साठवायची असेल तर इतर कोणता पर्याय आहे का

–  जयंत दाणी, कल्याण</strong>

मोबाइल फोन असो किंवा संगणक, आपल्याकडील माहितीसाठा प्रचंड वाढू लागला आहे. यामुळेच साठवणुकीसाठी क्लाऊडचा पर्याय समोर आला. या क्लाऊड तंत्रज्ञानामुळेच आपण आपल्या विविध उपकरणांमधील माहिती आपल्या हातात असलेल्या उपकरणातही पाहू शकतो, तसेच माहिती साठवण्यासाठीही मुबलक जागा मिळवू शकतो. यासाठी ड्रॉपबॉक्स, गुगल ड्राइव्ह, वन ड्राइव्ह, बॉक्स असे विविध अ‍ॅप्स बाजारात उपलब्ध आहेत. या अ‍ॅपवर लॉगइन करून तुम्ही तुमची माहिती साठवून ठेवू शकता.

या सदरात प्रश्न पाठविण्यासाठी lstechit@gmail.com वर लॉगइन करा.