• मला गॅलरीमध्ये माझ्या आवडीचे छायाचित्र एकत्र साठवायचे आहेत. त्यासाठी फोल्डर तयार करायचा असेल तर तो कसा करायचा.

राजेश कलंगुडे, जिंतूर, परभणी

  • गॅलरीमध्ये फोल्डर बनविणे तसे सोपे आहे. तुम्ही कोणता फोन वापरता हे सांगितले असते तर उत्तर देणे अधिक सोपे गेले असते. फोनच्या गॅलरीमध्ये गेल्यावर सेटिंग्जमध्ये आपल्याला फोल्डर तयार करा असा पर्याय विचारला जातो. तेव्हा तुम्ही तिथे फोल्डर तयार करू शकता. यानंतर तयार झालेला फोल्डर तुम्हाला गॅलरीमध्ये दिसेल. त्यानंतर तुम्हाला पाहिजे ती छायाचित्र निवडून तुम्ही ती त्या फोल्डरमध्ये मूव्ह करू शकता.
  • संगणकावर आणि मोबाइलवर मराठी टायपिंग कसे करायचे. तसेच युनिकोड म्हणजे काय?

शंतनू पै, अहमदनगर</strong>

Bitcoin Halving
बिटकॉइन हॉल्व्हिंग म्हणजे काय आणि क्रिप्टोसाठी त्याचा अर्थ काय?
Index Sensex falls to 73 thousand level print eco news
नफावसुलीमुळे ‘सेन्सेक्स’ ३५२ अंश माघारी
DRDO will recruit 90 vacancies
DRDOमध्ये अप्रेंटिस पदासाठी ९० जागांची होणार भरती! ही आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख
9th To 12th Standard Exams To Be Open Book Proposed by CBSE Pilot in November 2024 Will This Exam Be Easier will Syllabus Change
नववी ते १२ वी इयत्तेच्या विद्यार्थ्यांची ओपन बुक परीक्षा होणार?CBSE यंदा नोव्हेंबरमध्ये करणार प्रयोग, काय बदलणार?
  • युनिकोड म्हणजे विविध प्रादेशिक भाषांसाठीच्या फॉण्ट आणि कळफलकाची सर्वमान्य प्रणाली. यामध्ये मराठीसह विविध देशांतील काही शे भाषांचा समावेश आहे. संगणकावर युनिकोड इन्स्टॉल करणे अगदी सोपे आहे. यासाठी सर्वप्रथम कंट्रोल पॅनलमध्ये जाऊन ‘रिजनल अँड लँग्वेज’ हा पर्याय स्वीकारा यामध्ये लँग्वेजेस हा पर्याय स्वीकारा. त्यातील पहिल्या पर्यायासमोर अ‍ॅड असा पर्याय असेल तो निवडा. त्यानंतर पुन्हा अ‍ॅड असे म्हणा. मग तुम्हाला तुमची ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल करताना संगणकात आलेल्या विविध भाषांचे पर्याय दिसतील. यामध्ये मराठीचा पर्याय असेल तो निवडा. यानंतर की-बोर्ड निवडा. मग ओके म्हणा. यानंतर तुम्हाला खालच्या टूलबारमध्ये उजव्या बाजूला ‘ईएन’ अशी इंग्रजी आद्याक्षरे दिसतील. त्यावर क्लिक करून तुम्ही मराठीचा पर्याय निवडू शकता. मग तुमचा संगणक मराठी होतो. म्हणजेच त्यामध्ये आपण युनिकोडच्या मदतीने मराठी टाइप करू शकतो. हे मराठी टाइप करण्यासाठी तुम्हाला इनस्क्रिप्ट हा कळफलक शिकावा लागेल. जर तुम्हाला इंग्रजीतून मराठी टाइप करावयाचे असेल तर त्यासाठी गुगल इनपूटसारखे पर्याय तुम्ही संगणकावर डाऊनलोड करून घेऊ शकता. ते केल्यावरही तुम्ही वरीलप्रमाणे सेटिंग करून कळफलक निवडला की तुम्हाला तो पर्याय खालच्या टूलबारमध्ये उपलब्ध होतो. मोबाइलवर मराठी टाइप करण्यासाठी विविध अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. या अ‍ॅप्सच्या माध्यमातून युनिकोडमध्येच म्हणजे मंगल फाँटमध्ये टायपिंग होत असल्यामुळे तो कुणालाही कुठेही वाचता येऊ शकतो.
  • मोबाइलमध्येच टीव्हीचा रिमोट होऊ शकतो का?

– महेश देवरे, बेलापूर

  • घराघरांतील टीव्ही आता स्मार्ट होऊ लागले आहेत. पण टीव्हीचा रिमोट कंट्रोल मात्र काही सुटत नाही. या रिमोट कंट्रोलपासून सुटका हवी असेल तर तुम्ही रिमोट कंट्रोल प्रो हे अ‍ॅप डाऊनलोड करून टीव्हीच्या रिमोटला रामराम ठोकू शकता. या अ‍ॅपच्या माध्यमातून आपण आपल्या मोबाइलमधून टीव्हीचा ताबा मिळवू शकतो. यासाठी टीव्हीच्या कोणत्याही प्रकारच्या सेटिंग्जमध्ये बदल करण्याची गरज नसते. टीव्ही सुरू केला की हे अ‍ॅप सुरू करायचे आणि टीव्हीवर नियंत्रण मिळवायचे. या अ‍ॅपमध्ये टीव्हीच्या रिमोटमध्ये असलेले सर्व पर्याय देण्यात आले आहेत. यामुळे कोणत्याही वेळी आपल्याला अ‍ॅपपेक्षा रिमोट बरे असे वाटत नाही. हे अ‍ॅप अँड्रॉइडच्या २.३ या व्हर्जनपासून पुढच्या व्हर्जनमध्ये काम करू शकते. हे अ‍ॅप शेकडो प्रकारच्या टीव्हीसाठी काम करते. पण जर तुमच्या टीव्हीसाठी करत नसेल तर तुम्ही अ‍ॅप विकासकाला ई-मेल लिहिला तर तो पुढच्या व्हर्जनमध्ये त्याची तरतूद करू शकेल असे विकासकाने अँड्रॉइड प्ले स्टोअरवर नमूद केले आहे. तेथेच ई-मेल आयडीही दिला आहे.