* मी एक जीबी मोबाइल डेटा प्लॅन घेतला आहे; पण अनेकदा अवघ्या १५ दिवसांमध्ये हा सर्व डेटा संपतो. इतर तरुण मुलांच्या तुलनेत माझा वापर कमी आहे असे मला वाटते. तरीही असे का होते हे मला समजत नाही. तर यावर काय उपाय आहेत?
– दिगंबर तेंडोलकर, विलेपार्ले
* डेटा वाचविण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे अ‍ॅप्सचा बॅकग्राऊंड डेटा बंद करणे. यामुळे अनेकदा आपण काहीही काम करत नसताना इंटरनेट खर्च होत राहते. यामुळे अनेकदा आपले एमबी संपतात आणि आपल्याला प्रत्यक्षात ते समजतही नाहीत. बॅकग्राऊंड डेटामध्ये ई-मेल सिंकिंग, फीड्स अपडेटिंग, वेदर विडगेट्स अशा गोष्टींचा समावेश होतो. हे बंद करणे अगदी सोपे आहे. ते बंद करण्यासाठी सेटिंग्जमध्ये जा. तेथे डेटा युसेजचा पर्याय निवडा. यानंतर तुम्हाला खाली कोणते अ‍ॅप किती डेटा वापरतो याची माहिती येईल. तेथे प्रत्येक अ‍ॅपमध्ये जाऊन ते सुरू केल्यावर तेथे खालच्या बाजूस ‘रिस्ट्रिक्ट बॅकग्राऊंड डेटा’ असा पर्याय येतो, तो निवडावा. यामुळे अ‍ॅप बंद असताना खर्च होणारा डेटा खर्च होणार नाही. याचबरोबर तुम्ही गुगल सव्‍‌र्हिसेसच्या सेटिंग्जमध्ये जाऊन तुम्हाला ज्या सेवांचे सिंकिंग नको असेल त्या सेवांचे सिंक बंद करू शकता. यामुळेही तुमचा डेटा कमीत कमी खर्च होण्यास मदत होऊ शकेल.
याचबरोबर तुमच्या फोनचा सर्वाधिक डेटा खर्च होण्याचा आणखी एक स्रोत म्हणजे गुगल प्लेमध्ये होणारे अ‍ॅप अपडेशन. जर तुम्ही प्ले स्टोअरमध्ये ‘सेट टू ऑटो अपडेट्स अ‍ॅप्स’ असा पर्याय निवडला असेल तर तुमच्या मोबाइलमधील अ‍ॅप्सचे अपडेटेड व्हर्जन बजारात दाखल झाले, की तातडीने तुमचे अ‍ॅप अपडेट होते आणि तुमचा डेटा खर्च होतो. जर हा डेटा खर्च वाचवायचा असेल तर प्ले स्टोअरमध्ये जाऊन ऑटो अपडेट अ‍ॅप्सऐवजी ‘डू नॉट ऑटो अपडेट अ‍ॅप्स’ किंवा ‘ओन्ली ओव्हर वाय-फाय’ हा पर्याय निवडावा. म्हणजे अ‍ॅप आपोआप अपडेट होणार नाही. याशिवाय व्हॉट्सअ‍ॅपमध्ये येणारे फोटो आणि व्हिडीओ आपोआप डाऊनलोड होत असतात. यामुळे तुमचा डेटा प्रमाणापेक्षा जास्त खर्च होतो. यामुळे व्हॉट्सअ‍ॅपच्या सेटिंग्जमध्ये जाऊन तुम्ही सर्वप्रथम मीडिया ऑटो डाऊनलोड बंद करा, जेणेकरून तुमचा डेटा खर्च होणार नाही. जो फोटो किंवा व्हिडीओ तुम्हाला आवश्यक वाटेल तोच डाऊनलोड केल्यास खूप डेटा वाचू शकतो. तसेच गाणी किंवा व्हिडीओ यूटय़ूबसारख्या अ‍ॅप्सवरून पाहणे किंवा ऐकणे कमी केले तरीही डेटा वाचू शकतो. अनेकदा हे व्हिडीओ पाहण्यासाठी खूप डेटा खर्च होतो. याचबरोबर अ‍ॅपमध्ये येणाऱ्या जाहिरातींमुळेही आपला डेटा खर्च होत असतो. यामुळे एकदा का तुम्ही अ‍ॅप सुरू केले, की फोनचा मोबाइल डेटा बंद करा आणि ते अ‍ॅप वापरा, जेणेकरून जाहिराती येणार नाहीत आणि तुमचा डेटा खर्च होण्याचे प्रमाण कमी होईल. याशिवाय तुम्ही अ‍ॅड ब्लॉकर अ‍ॅप्स डाऊनलोड करून अ‍ॅपमध्ये येणाऱ्या जाहिरातींच्या जाचापासून वाचू शकाल आणि डेटाही वाचवू शकाल.

Height of Your Shadow Tells How Much Vitamin D Is Absorbed In Body
तुमच्या सावलीची उंची सांगते शरीराविषयी खूप महत्त्वाची ‘ही’ बाब; तज्ज्ञ सांगतात, उन्हाळ्यात कसा घ्यावा अंदाज?
Rahu Shukra Yuti in meen rashi
विपरीत राजयोगामुळे दहा दिवसांमध्ये ‘या’ तीन राशींचे बदलणार नशीब , मिळणार गडगंज पैसा
glacier outburst uttarakhand
केदारनाथमध्ये पुन्हा प्रलय येऊ शकतो का? हिमनदी तलावफुटीच्या दुर्घटनांमध्ये होतेय वाढ; कारण काय?
Xiaomi SU7 EV Launch
बाकी कंपन्यांची उडाली झोप, २४ तासांत धडाधड विकली गेली ‘ही’ इलेक्ट्रिक कार, किंमत…