अमेरिकेची स्मार्टफोन कंपनी Infocus ने भारतात नवा स्मार्टफोन InFocus M535+ लॉन्च केला. खासकरून सेल्फी लव्हर्सना लक्षात घेऊन या फोनची निर्मिती करण्यात आली आहे. फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा रिअर आणि फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. याचबरोबर कंपनीतर्फे स्पेशल लॉन्च प्रमोशन ऑफरच्याअंतर्गत फोनच्या खरेदीवर १००० रुपये किंमतीची सेल्फी स्टीक मोफत देण्यात येत आहे. InFocus M535+ मध्ये मेटल युनिबॉडी डिझाइन देण्यात आले आहे. या फोनमध्ये ५.५ इंचाचे फूल एचडी डिस्प्ले, अॅण्ड्रॉइड ६.० मार्शमेलो प्रणाली, १.३ गेगाहर्ट्झ ऑक्टा कोअर प्रोसेसर, ३ जीबी रॅम आणि १६ जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. एक्स्टर्नल मेमरी कार्डद्वारे मेमरी ६४ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा यात आहे. रिअर कॅमेरासोबत एलइडी फ्लॅश लाइट देण्यात आला असून, याच्या प्रकाशात फूल एचडी रेकॉर्डिंग करणे शक्य आहे. ४जी सुविधा सपोर्ट करणाऱ्या या फोनमध्ये एचडी व्हॉइस कॉलिंग फिचरदेखील देण्यात आले आहे. फोनमध्ये २६०० एमएएच बॅटरी देण्यात आली असून, कंपनीच्या मते बॅटरी १२ तासापर्यंतचा टॉक टाइम आणि ४८० तासांचा स्टॅण्डबाय टाइम देते. InFocus ने याआधी एम५३५ स्मार्टफोन बाजारात आणला होता. नवीन फोन ५३५चे अपग्रेडेड व्हर्जन आहे. या फोनची किंमत ११९९९ रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. देशभरातील रिटेल स्टोअर्समध्ये हा फोन उपलब्ध करण्यात येईल. InFocus ने अॅण्ड्रॉइडच्या ६.० मार्शमेलो प्रणालीवर चालणारा सर्वात स्वस्त Bingo 10 फोनदेखील सादर केला होता, ज्याची किंमत ४,२९९ इतकी होती. Bingo 10 ऑनलाइन शॉपिंग संकेतस्थळ स्नॅपडीलवरून खरेदी करता येऊ शकतो. हा ४.५ इंचाचा ड्युअल-सीम स्मार्टफोन आहे.