आपल्या कॉम्प्युटरमधील किंवा मोबाइलवरील एखादी फाइल (डॉक्युमेंट, प्रोग्रॅम, फोटो, गाणी, चित्रपट) दुसऱ्याला द्यायची तर पूर्वी फारच द्राविडी प्राणायाम करायला लागत होता. त्यासाठी एखाद्या माध्यमाची गरज पडायची. उदाहरणार्थ फ्लॉपी, सीडी, डिव्हीडी इत्यादी. परंतु या सर्व माध्यमांद्वारे आपली फाइल दुसऱ्याला देताना त्याच्या कॉम्प्युटरवर वाचली जाईलच याची खात्री नसे. आजही आपण त्यासाठी पेन ड्राइव्हचा वापर करतो. पेन ड्राइव्हवरून डेटा देताना त्यावरील इतर माहिती दुसऱ्याकडे जाण्याचा धोका असतो. शिवाय पेन ड्राइव्ह काढता घालताना बरीच काळजी घ्यावी लागते अन्यथा फाइल्स खराब होण्याची शक्यता असते. आपण ई-मेलवर अ‍ॅटचमेंट म्हणूनही फाइल पाठवू शकतो. (पण ई-मेलसाठी इंटरनेट कनेक्शनची म्हणजेच वेगळ्या प्रकारच्या माध्यमाची आवश्यकता असतेच.) या सर्व प्रकारांत बऱ्याच वेळा फाइलच्या साइझचे बंधन येते.

जसजसे नवे तंत्रज्ञान विकसित होऊ  लागले, फाइल दुसऱ्याबरोबर शेअर करण्याच्या पद्धती प्रगत  झाल्या. पेनड्राइव्हजच्या जोडीने ब्लूटुथद्वारेही आपल्याला फाइल्स दुसऱ्याला देता येऊ लागल्या. ब्लूटुथद्वारे फाइल शेअर करायला दुसऱ्या कुठल्या माध्यमाची गरज नसते. परंतु ब्लूटुथचा ट्रान्सफर स्पीड बराच कमी असतो. माध्यमाची गरज नसणारे अद्ययावत तंत्रज्ञानातील पुढची पायरी म्हणजे वायफाय. ब्लूटुथद्वारे एखादे गाणे किंवा व्हिडीओ क्लिप शेयर करण्यासाठी जेवढा वेळ लागतो तेवढय़ा वेळात वायफायने एखादा पूर्ण सिनेमा दुसऱ्या डिव्हाइसवर टाकता येतो.

Sale of pistol by prisoner
पुणे : जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्याकडून पिस्तूल विक्री; पिस्तुलासह तीन काडतुसे जप्त
pune crime news, pune fake gst officer fraud marathi news
पुणे : ‘जीएसटी’ अधिकारी असल्याच्या बतावणीने व्यापाऱ्याची लूट
try these five amazing use of eggshells tips
आज अंड्याचा नव्हे, तर त्याच्या ‘कवचांचा’ फंडा पाहू! कचऱ्यात फेकून देण्याआधी या पाच टिप्स पाहा
OBC
ओबीसींचा खरा शत्रू कोण?

आज आपण शेअर इट (SHAREit ) या अ‍ॅपबद्दल जाणून घेणार आहोत, जे वायफाय कंपॅटिबल असलेल्या कुठल्याही डिव्हाइसवरून तशाच प्रकारच्या दुसऱ्या डिव्हाइसवर फाइल ट्रान्सफर करते. हे अ‍ॅप वापरण्यासाठी इंटरनेट किंवा मोबाइल डेटा वापरला जात नाही. म्हणजेच हे अ‍ॅप वापरून शेअर केलेला डेटा एका डिव्हाइसमधून दुसऱ्या डिव्हाइसमध्ये विनामूल्य पाठवला जातो. याच्या साहाय्याने आपण फोटो, व्हिडीओ, गाणी, काँटॅक्टस्, अ‍ॅप्स आणि इतर फाइल्स ट्रान्सफर करता येते. हे कसे होते ते थोडक्यात पाहू.

ज्या डिव्हाइसवरून फाइल ट्रान्सफर करायची आहे आणि ज्या डिव्हाइसवर तुम्ही फाइल ट्रान्सफर करणार आहात त्या दोन्हीवर हे अ‍ॅप इन्स्टॉल असणे गरजेचे आहे. अ‍ॅपमध्ये सेंड आणि रिसीव्ह अशी दोन बटणे दिसतात. तुम्हाला फाइल/अ‍ॅप शेयर करायचे असल्यास प्रथम सेंड बटण दाबावे लागते. नंतर जी फाइल शेयर करायची आहे ती डिव्हाइसवर निवडायची असते. तुम्ही एकावेळी एकापेक्षा जास्त फाइल्स निवडू शकता. नंतर पुन्हा सेंड बटण दाबल्यावर तुमच्या डिव्हाइसच्या वायफाय रेंजमध्ये जी डिव्हाइसेस फाइल स्वीकृत करण्यासाठी तयार असतील त्यांची यादी दिसते. अर्थात फाइल स्वीकारणाऱ्या व्यक्तींनी रिसीव्ह हे बटण दाबून डिव्हाइस तयार ठेवणे आवश्यक आहे. ज्याच्याकडे फाइल पाठवायची आहे त्याचे डिव्हाइस निवडून क्लिक केल्यावर तुम्ही त्या डिव्हाइसशी जोडले जाता आणि निवडलेल्या फाइल्स ट्रान्सफर होतात.

या अ‍ॅपने तुमच्या डिव्हाइसच्या (स्मार्टफोन, लॅपटॉप) टप्प्यात असणाऱ्या तत्सम दुसऱ्या डिव्हाइसवर फाइल शेयर करता येते. घरगुती डिव्हाइसेसच्या वायफायची रेंज सामान्यत: १० ते १५ मीटपर्यंत असते, जी डिव्हाइसेसच्या क्षमतेनुसार कमी-जास्त होऊ  शकते.

या अ‍ॅपचा वापर करून आपल्या मित्रमंडळींसोबत फाइल शेअरिंगचा आनंद लुटा!

manaliranade84@gmail.com