सोशल मीडिया आणि सोशल नेटवर्किंग साइट्सच्या धबडग्यात स्वत:चं वेगळेपण यशस्वीरित्या टिकवून ठेवणारी कोणती वेबसाइट असेल तर ती म्हणजे लिंक्डइन. फेसबुक, मायस्पेस, हायफाय, वायपो, गुगल प्लससारख्या सोशल नेटवर्किंग साइट्स या मैत्री आणि त्याभोवती फिरणाऱ्या व्याख्यांपुरत्या मर्यादित आहेत. मात्र लिंक्डइन हे वेब पोर्टल सोशल नेटवर्किंग या वर्गात मोडत असलं तरी उद्योगधंद्यांमधील व्यावसायिक भेटीगाठींपुरतंच ते मर्यादित ठेवण्यात आलं आहे.

मित्र आणि जनसंपर्क ही सोशल नेटवर्किंग साइट्सची ताकद आणि हाच त्यांचा गाभा. सध्याच्या घडीला जगभरात ३०० पेक्षा जास्त सोशल नेटवर्किंग वेबसाइट्स अस्तित्वात आहेत. यामध्ये व्हिडीओ शेअरिंग, फोटो शेअरिंग, म्युझिक शेअरिंग, ब्लॉगिंग, मायक्रोब्लॉगिंग अशा सगळ्याच प्रकारांचा समावेश होतो. मात्र शुद्ध आणि फक्त व्यावसायिक जनसंपर्क तसंच भेटीगाठींसाठी अस्तित्वात असणारी लिंक्डइन ही एकमात्र वेबसाइट आहे. मागच्या दशकात जेव्हा माध्यमांचं रूपडं बदलत होतं आणि समाज माध्यमांचा विस्तार होत होता त्याच काळात लिंक्डइनचा जन्म झाला. व्यावसायिक जगतात ह्य़ा वेबसाइटवरची अपटूडेट प्रोफाइल महत्त्वाची ठरते.

ipl 2024 gujarat titans beautiful mystery girl compared with hollywood actress ana de armas shubman gill reaction viral
VIDEO : पृथ्वी शॉच्या गर्लफ्रेंडवर शुबमन गिलचा डोळा? नेटिझन्स म्हणाले, “ओहह भावा…”
Mary Kom, Olympic, Olympic team captain,
विश्लेषण : मेरी कोमने ऑलिम्पिक पथकप्रमुखपद का सोडले?
Big falls in Sensex and Nifty
सेन्सेक्स अन् निफ्टीत मोठ्या प्रमाणात पडझड; शेअर बाजाराच्या घसरणीला ‘या’ तीन गोष्टी ठरल्या कारणीभूत
Real Madrid and Manchester City draw match
चॅम्पियन्स लीग फुटबॉल : रेयाल-मँचेस्टर सिटीतील रंगतदार लढत बरोबरीत

प्रोफाइल

लिंक्डइनवरची प्रोफाइल म्हणजे एक प्रोफेशनल रेझ्युमे किंवा बायोडेटा असतो. या प्रोफाइलचा उद्देश एकमात्र असतो आणि तो म्हणजे नोकरी किंवा उद्योगसाठीचा संपर्क मिळवणे आणि त्यातूनच रोजगारप्राप्ती. त्यामुळे शैक्षणिक आणि व्यावसायिक माहिती इथे गरजेची असते. छंद, सिनेमे, संगीत वगैरेला इथे थारा नाही. प्रोफाइल बनवत असतात चालू आणि पूर्वीची नोकरी, जॉब टायटल, कंपनी, क्षेत्र, तारखा आणि नोकरीविषयीची थोडक्यात माहिती भरावी लागते. याशिवाय या सर्वाविषयीचा गोषवारा लिहिण्याची सोयही इथे उपलब्ध आहे. तसंच एखाद्या वेबसाइटशी युजर संबंधित असेल तर त्या वेबसाइटची लिंकही या प्रोफाइलमध्ये देता येते. इतर सोशल नेटवर्किंग साइट्सप्रमाणेच प्रोफाइल ठेवण्याची सोयही लिंक्डइनवर आहे. पण फोटो ठेवताना व्यावसायिक जगतातील लोक तो पाहणार आहेत याचे भान असावे.

सामान्यत: प्रोफाइल बनवल्यानंतर लिंक्डइनकडून कनेक्शन्ससाठीची एक यादी दिली जाते. फेसबुकवर ज्याप्रमाणे सजेस्टेड फ्रेंड्सची यादी असते तीच यादी म्हणजे कनेक्शन्स.

कनेक्शन्स

युजरने पाठवलेल्या रिक्वेस्टला (जशी फ्रेंड रिक्वेस्ट असते तशी लिंक्डइनवर कनेक्शन रिक्वेस्ट असते) समोरच्याने होकार दिला की डायरेक्ट कनेक्शन तयार होतं. लिंक्डइनच्या भाषेत अशा कनेक्शनला किंवा संपर्काला वन डिग्री अवे कनेक्शन म्हणतात. या प्रकारच्या कनेक्शन्सना तुम्ही थेट ईमेल पाठवू शकता. जसं फेसबुकवर फ्रेंडलिस्टमध्ये असणाऱ्या मित्रांना थेट मेसेज पाठवता येतो तसाच हा प्रकार आहे. डायरेक्ट कनेक्शनचे जे कनेक्शन्स आहेत (म्हणजे मित्रांचे मित्र) त्यांना टू डिग्री अवे कनेक्शन म्हणतात. आणि त्यांचे जे कनेक्शन्स आहेत (म्हणजे मित्रांच्या मित्रांचे मित्र) त्यांना थ्रीडिग्री अवे कनेक्शन म्हणतात. लिंक्डइनच्या म्हणण्याप्रमाणे थ्री अवे कनेक्शनपर्यंत असणारी मंडळी ही तुमच्या नेटवर्कमध्ये असतात. मात्र वन डिग्री अवे व्यतिरिक्त इतरांना थेट ईमेल पाठवता येत नाही. त्यासाठी खास लिंक्डइन टूल्स आहेत. ज्याला इन्ट्रॉडक्शन्स, इनमेल आणि ओपनमेल (ओपनलिंक) म्हणतात.

मोफत अकाऊंटधारकांसाठी पाच इन्ट्रॉडक्शन्स लिंक्डइनने उपलब्ध करून दिली आहेत. त्यापेक्षा अधिक हवी असतील तर त्यासाठी प्रीमियम अकाऊंट बनवून पैसे भरावे लागतात (उद्योग तसेच व्यावसायिक जगतात अनेकांचे प्रीमियम अकाऊंट्स असतात. ज्याचे अनेक फायदेही आहेत. ते पुढल्या भागात बघू.) इन्ट्रॉडक्शन्सचं काम कसं चालतं ते बघू या

*  सर्वप्रथम ज्या व्यक्तीला (टू किंवा थ्री डिग्री अवे कनेक्शनच्या) इन्ट्रॉडक्शन पाठवायची आहे त्याच्या डायरेक्ट कनेक्शनचा शोध घ्या (म्हणजे ज्या मैत्रिणीशी मैत्री करायची आहे तिच्याशी मैत्री असणाऱ्या आपल्या एखाद्या मैत्रिणीची शोध घेणे).

* त्यानंतर इन्ट्रॉडक्शन मेसेज आपल्या आणि त्या व्यक्तीच्या डायरेक्ट कनेक्शनला पाठवणे (म्हणजे सामाईक मित्राला किंवा मैत्रिणीला मेसेज देणे).

* आता चेंडू तुमच्या मित्राच्या कोर्टात आहे. तुमचा मेसेज पुढे पाठवायचा की नाही हे त्याच्या हातात आहे. फॉरवर्ड न करण्याचा पर्यायही लिंक्डइनने दिलेला आहे.

* पुढची गोम अशी की जरी मित्राने फॉरवर्ड केला तरी त्या व्यक्तीला तो स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा पर्याय असतो.

*  जर का त्याने मेसेज स्वीकारला तरी त्याचा अर्थ असा नाही की त्या व्यक्तीने तुमच्याशी डायरेक्ट कनेक्शन केलं आहे. त्या व्यक्तीचा ईमेल आयडी घेऊन त्याला अधिकृत निमंत्रण पाठवावं लागतं. ते त्याने स्वीकारल्यानंतरच डायरेक्ट कनेक्शन तयार होतं.

इनमेल आणि ओपनलिंक या सुविधा प्रीमियम अकाऊंटधारकांनाच आहेत. मासिक किंवा वार्षिक फी भरून जे युजर स्वत:ची प्रोफाइल बनवतात त्यांनाच या सुविधांचा वापर करता येतो.

pushkar.samant@gmail.com