‘मोटोरोला’च्या बहुप्रतिक्षीत ‘मोटो जी-४’ या अत्याधुनिक स्मार्टफोन लवकरच बाजारात दाखल होणार आहे. पण तो बाजारात दाखल होण्याआधीच मोटो जी-४ चे फिचर्स लिक झाले आहेत. या स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आल्याचे समजते. समोल आलेल्या माहितीनुसार मोटोरोला कंपनी ‘मोटो जी-४’ आणि ‘जी-४ प्लस’ हे दोन अद्ययावत स्मार्टफोन यंदाच्या वर्षात बाजारात दाखल करणार आहे. विबो या चीनी सोशल मीडिया अकाऊंटवर मोटोरोलाच्या नव्या स्मार्टफोनची छायाचित्रे व्हायरल झाली आहेत. मोटो ‘जी-४’ च्या होम बटणालाच फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. मोटोरोलाने आपल्या नव्या मॉडेलमध्ये कॅमेराची पद्धत देखील आपल्या इतर स्मार्टफोनपेक्षा वेगळी ठेवली आहे. ‘मोटो जी-३’ आणि ‘मोटो जी टर्बो’ या स्मार्टफोनच्या कार्यशैलीला ग्राहकांची चांगली पसंती मिळाली होती. पण कॅमेराच्या बाबतीत अनेक तक्रारी पुढे आल्या होत्या. त्यामुळे या नव्या स्मार्टफोनमध्ये कॅमेराच्या गुणवत्तेबाबत विशेष काळजी बाळगण्यात आल्याचे दिसून येते.