सर्वात स्वस्त स्मार्टफोनच्या स्पर्धेत आता एका नव्या नावाची भर पडली आहे. ‘नमोटेल अच्छे दिन’ नावाचा हा फोन जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन असल्याचा दावा फोनचे प्रमोटर माधव रेड्डी यांनी केला. ‘नमोटेल अच्छे दिन’ फोनची किंमत फक्त ९९ रुपये इतकी आहे. त्यांनी केलेल्या दाव्यानुसार यात ४ इंचाचा डिस्प्ले असून, अँड्रॉइड ५.१ लॉलिपॉप प्रणालीवर तो कार्य करतो. १.३ गेगाहर्टस् क्वाडकोर प्रोसेसरने सज्ज असलेल्या या फोनमध्ये १ जीबी रॅम देण्यात आली आहे. ‘नमोटेल अच्छे दिन’ फोनसाठी १७ मे ते २५ मेपर्यंत नोंदणी होईल. फोनची किंमत २९९९ वरून कमी करून ९९ रुपये इतकी करण्यात आल्याची माहिती कंपनीचे संकेतस्थळ ‘नमोटेल डॉट कॉम’वर देण्यात आली आहे. या फोनच्या खरेदीसाठी ‘कॅश ऑन डिलेव्हरी’ सुविधा पुरविण्यात आली असून, नाममात्र डिलेव्हरी चार्जेस लावण्यात येतील. आनंद आणि स्वातंत्र्याने लोकं जोडली आहेत. ९९ रुपये किंमतीच्या शक्तिशाली अँड्रॉइड फोनद्वारे कोट्यवधी भारतीयांच्या मनात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. भारताप्रतीच्या प्रेम भावनेतून आम्ही या उत्पादनाची निर्मिती केली आहे. हा ‘मेक इन इंडिया’ अभियानाचा भाग आहे. मर्यादित संख्येत उपलब्ध असलेले हे मॉडेल केवळ भारतामध्ये आधार कार्ड धारकांनाच मिळणार असल्याचे कंपनीच्या संकेतस्थळावर म्हटले आहे. असे असले तरी सध्या कंपनीचे संकेतस्थळ उघडत नसल्याचे समजते.

namotel-acche-din-phone-price-and-features

Reliance Industries quarterly profit stays flat
रिलायन्सला ६९,६२१ कोटींचा विक्रमी वार्षिक नफा; उलाढालीत १० लाख कोटींचा टप्पा गाठणारी पहिलीच कंपनी
66364 crore collection through new 185 schemes of mutual funds
म्युच्युअल फंडांचे नवीन १८५ योजनांद्वारे ६६,३६४ कोटींचे संकलन
infosys profit rs 7969 crore in fourth quarter
इन्फोसिसचा तिमाही नफा ७,९६९ कोटींवर; मार्चअखेर तिमाहीत ३० टक्क्यांची दमदार वाढ
Equity mutual fund inflows eased in March
मार्चमध्ये इक्विटी म्युच्युअल फंडांतील ओघ आटला