कॉर्पोरेट जगतात स्वत:ला सादर करण्याला खूप महत्त्व निर्माण झाले आहे. यामुळे तेथे प्रत्येक गोष्टच ही सादरीकरणाद्वारे सांगितली जाते. तेथे काम करणाऱ्या अनेकांना विविध विषयांच्या सादरीकरणासाठी अनेकदा बाहेरही फिरावे लागते. नेहमी लॅपटॉपसोबत घ्यावा लागतो. यामुळे अनेकदा प्रवासात अडचणी निर्माण होतात. पण जर तुमच्या सादरीकरणाची फाइल तुम्ही मोबाइलमध्ये सेव्ह केली आणि त्याद्वारे जर तुम्ही ती सादर करू शकलात तर ते खूपच सोयीचे हाईल. यामुळेच असूस या कंपनीने मोबाइल एलईडी प्रोजेक्टर बाजारात आणला आहे. पाहुयात कसा आहे हा प्रोजेक्टर.

प्रोजेक्टर म्हटलं की अनेक वायर्स संगणकाला किंवा लॅपटॉपला जोडणे हे आलेच. याचबरोबर प्रोजेक्टर सुरू होण्यासाठी प्लगवायरही आवश्यकच असते. अनेकदा या गोष्टी वेळखाऊ ठरतात. अशा वेळी आपण आपल्या बॅगेतील छोटेखाली प्रोजेक्टर बाहेर काढून एकाच वायरने आपल्या मोबाइला जोडला आणि काही क्षणातच आपले सादरीकरण सुरू केले तर.. ही काही केवळ कल्पनाच नाही. हे प्रत्यक्षात आले आहे ते असूसच्या एस१ या मोबाइल एलईडी प्रोजेक्टरमुळे. हा केवळ प्रोजेक्टरच नसून पॉवरबँक म्हणूनही याचा आपण वापर करू शकतो.
असूसचा हा एक पॉकेट प्रोजेक्टर आहे. तो १.३ गुणिले ४.३ इंच इतक्याच आकाराचा आहे. याचे वजनही अवघे ४०० ग्रॅम आहे. हा प्रोजेक्टर आपण चार्ज केला की तो तीन तासांपर्यंत काम करू शकतो. यामध्ये केवळ प्रोजेक्टरच नव्हे तर पॉवर बँकही देण्यात आली आहे. यामुळे आपण मोबाइल चार्जिगही करू शकतो. यामध्ये डीएलपीवर आधारित डीएलपी पिको चिप वापरण्यात आली आहे. याचा ब्राइटनेस २०० लुमेन्स इतका आहे. यामध्ये डब्लूएक्सजीए (८५४ गुणिले ४८०) रिझोल्युशन आहे. ज्यामुळे आस्पेक्ट रेशो १६:९ इतका आहे. यामध्ये देण्यात आलेला एलईडी लाइटची क्षमता तीस हजार तास काम करण्याची आहे. याची रचनाही हाताळण्यास सुलभ अशी करण्यात आली असून चारही बाजू वर्तुळाकार देण्यात आल्या आहेत. यामध्ये मोबाइल हाय डेफिनेशन लिंक (एमएचएल)पेक्षा दुप्पट क्षमता असलेला एक एचडीएमआय पोर्ट आणि चार्जिगसाठी यूएसबी मायक्रो बी-पोर्ट देण्यात आला आहे. प्रोजेक्टरसोबत एचडीएमआय आणि यूएसबी केबल आणि चार्जिग अॅडप्टर देण्यात आले आहे.

Samsung launched on Friday a new variant of its popular budget F15 smartphone Here is all the details
२० हजारांपेक्षा कमी किमतीत सॅमसंगचा ट्रिपल कॅमेरा सेटअपचा स्मार्टफोन; बॅटरी लाईफ बघून म्हणाल ‘डील Done’
sewage treatment plants for residential complexes from thermax
‘थरमॅक्स’कडून निवासी संकुलांसाठीही सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प; पुनर्वापरामुळे पाण्याची ८० टक्के बचत शक्य
Dolly Chaiwala and Bill Gates
Dolly Chaiwala मायक्रोसॉफ्ट विंडोज १२चा ब्रँड अँबॅसेडर? जाणून घ्या सत्य
Amazon Gudi Padwa Sale 2024 going to offer deals and more on online shopping sites Read Everything About Offers
गुढीपाडव्यानिमित्त ॲमेझॉनचा बंपर सेल सुरू; साडी, दागिने अन् इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर भरघोस सूट, तुम्ही कधी करताय खरेदी?

असे दिसते चित्र
सादरीकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या स्क्रीनवर जेव्हा या प्रोजेक्टरच्या माध्यमातून तपासणी करण्यात आली तेव्हा सामान्य डेटा प्रोजेक्टरच्या तुलनेत यातून झळकणाऱ्या छायाचित्रांचा दर्जा कमी जाणवला. आजुबाजूच्या उजेडाचा या प्रोजेक्टरच्या माध्यमातून दिसणाऱ्या चित्रांवर खूप परिणाम होतो. याचबरोबर अनेकदा अंधारातही चित्र तितकेसे स्पष्ट दिसत नाही. यामध्ये अनेक छोटी अक्षरे स्पष्ट दिसत नाहीत.
पण जर आपण थोडय़ा लहान पडद्यावर चित्र पाहिले तर ते सामान्य पडद्याच्या तुलनेत स्पष्ट दिसतात.
एकमेव डीएलपी चिपचा वापर झालेल्या प्रोजेक्टरमध्ये ज्याप्रमाणे सप्तरंगी इफेक्ट दिसतात तशीच काहीशी अडचण या प्रोजेक्टरमध्ये जाणवते. पण ही अडचण जेव्हा आपण व्हिडीओ पाहतो तेव्हा जास्त प्रमाणात जाणवते.
आवाज आणि व्हिडीओ
डीएलपी प्रोजेक्टरमधून व्हिडीओ दिसण्यात जी अडचण असते तीच अडचण या प्रोजेक्टरमध्ये जाणवते. पण सादरीकरणादरम्यान येणाऱ्या छोटय़ा व्हिडीओ क्लिप्स चांगल्या प्रकारे पाहता येऊ शकतात. याचबरोबर लहान आकाराचे छायाचित्रही यामध्ये चांगल्या प्रकारे पाहता येऊ शकते. यामध्ये दोन वॉटचा एक स्पीकर देण्यात आला. यातून आवाज चांगला येतो. मात्र तो तुलनेत कमी आहे. पण यामध्ये देण्यात आलेल्या हेडफोनसाठीच्या ऑडिओ जॅकमधून जर तुम्ही आवाज ऐकला तर तो चांगला ऐकू येतो.
हा प्रोजेक्टर हाताळण्यास अगदी सोपा आणि चांगल्या प्रकारे रचना असलेला आहे. यामध्ये उच्च दर्जाची बॅटरी देण्यात आल्यामुळे वीज जोडणीचा कोणताही प्रश्न पडत नाही. ज्यावेळेस आपल्याला प्रोजेक्टर वापरायचा नसेल तेव्हा आपण हे उपकरण मोबाइल चार्जिगसाठी वापरू शकतो.

चांगल्या गोष्टी
यामध्ये वापरण्यात आलेला एलईडी लाइट चांगल्या दर्जाचा असल्यामुळे चित्रांचा इफेक्ट चांगला येतो. यामध्ये अंतर्गत रिचार्जेबल बॅटरी देण्यात आली आहे. याचबरोबर इतर मोबाइल उपकरण चार्ज करणेही यामध्ये शक्य होणार आहे. यातील एमएचएल अँड्राइडसाठी उपयुक्त ठरते.
काही त्रुटी
मोठय़ा पडद्यावर ब्राइटनेस आणि रिझोल्युशन कमी जाणवते. तसेच लहान अक्षर दिसण्यास त्रास होतो.

थोडक्यात
असूस एस१ या मोबाइल एलईडी प्रोजेक्टर दिसण्यास आणि हाताळण्यास उत्तम आहे. यामध्ये प्राजेक्टर सोबतच चार्जिगची सुविधाही असल्यामुळे याची उपयुक्तताही चांगली आहे. याचबरोबर छोटेखानी सादरीकरणासाठी तो अगदीच फायदेशीर ठरतो.
किंमत : २८,००० रुपये.
नीरज पंडित – niraj.pandit@expressindia.com