स्मार्ट टीव्हीच्या स्पध्रेत आता आणखी एका टीव्हीची भर पडणार आहे. सॅनसुई या जपानी टीव्ही कंपनीने भारतीय बाजारात फोर के अल्ट्रा एचडी एलईडी टीव्ही ग्लोडन बेझेलसह बाजारात आणला आहे. सध्या देशात सुरू असलेल्या आयपीएल मालिकांचे औचित्यसाधून या टीव्हीचे अनावरण कोलकाना नाइट रायडरच्या गौतम गंभीर याच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी कंपनीने कव्‍‌र्ह फोर के अल्ट्रा एचडी, यूएचडी आणि स्मार्ट कनेक्ट मालिकेतील तब्बल १० नवीन मॉडेल्स बाजारात आणले असून भारतीय टीव्ही बाजारातील १० टक्के हिश्शावर कंपनीचे लक्ष्य असणार आहे. या टीव्हीत सामना पाहत असताना आपण स्टेडियमवर बसूनच सामना पाहत असल्याचा अनुभव येईल, असा दावा कंपीनीने केला आहे. कंपनीच्या वैशिष्टय़पूर्ण दहा प्रकारच्या टीव्हींचे अनावरण करताना कंपनीचे सीओओ अमिताभ तिवारी म्हणाले की, सध्याचा ग्राहक हा हुशार आणि तंत्रस्नेही झाला आहे यामुळे त्यांची पसंती स्मार्ट आणि प्रीमियम उत्पादनांना असते. याचआधारे आम्ही भारतीय टीव्हीच्या बाजारात जोर धरू शकणार आहोत. सॅनसुईच्या या टीव्हीमध्ये आपल्याला वाइड व्ह्यूविंग अँगल मिळणार असून कव्‍‌र्ह शेपमुळे सर्व अँगल्स त्रिमितीच्या रूपात पाहणे शक्य होणार आहे. फोर के तंत्रज्ञानामुळे चित्र अधिक स्वच्छ आणि आपल्याशी जवळीक साधणारे दिसते. या टीव्हीमध्ये वाय-फाय जोडणी देण्यात आली आहे. यामुळे टीव्हीवर इंटरनेट ब्राऊझिंग करणेही शक्य होणार आहे.