समाजमाध्यमांचा सर्वच स्तरांतील लोकांकडून होणारा वापर स्वागतार्ह आहे. मात्र ‘डेटा थेफ्ट’च्या वाढत्या घटनांमुळे योग्य काळजी घेण्याची गरज आहे. मुळात इंटरनेटला सीमा नसल्याने अशा घटना वाढल्या आहेत.

समाजमाध्यमांचा वापर

Government Initiatives For Women's Safety
महिलांनो, तुमच्या सुरक्षेसाठी सरकारचे ‘हे’ उपक्रम ठरतात फायदेशीर; आपत्कालीन परिस्थितीत ही यादी जवळ ठेवाच!
revised dates of mpsc exam declared soon
‘एमपीएससी’ परीक्षांच्या सुधारित तारखा लवकरच; मागासवर्गाकरिता नव्याने आरक्षणनिश्चिती
mpsc mantra environment question analysis career
mpsc मंत्र: पर्यावरण प्रश्न विश्लेषण
JNU The fight for democracy Elections in JNU left organizationIndian politics
जेएनयू : लोकशाहीसाठीचा लढा!

संवाद वाढविण्यासाठी समाजमाध्यमांचा वापर अवश्य केला पाहिजे. मात्र त्यावर फोटो किंवा अन्य खासगी माहिती ठेवणे पूर्णपणे योग्य राहणार नाही. विशेषत: फोटो अपलोड करताना हात जरा आखडता घेतला पाहिजे. तसे न झाल्यास झळकण्याची हौस भविष्यात अडचणीत आणण्याची शक्यता आहे.

समाजमाध्यमांचा वापर करताना सुरक्षिततेसाठी काळजी 

समाजमाध्यम त्यात फेसबुकवरील काही अकाऊंट बनावट असतात. अशा बनावट अकाऊंटच्या माध्यमातून इतरांचे फोटो आणि अन्य काही माहिती उचलली जाण्याची भीती असते. त्यामुळे फोटो शेअर करताना समाजमाध्यमवरील पर्यायांचा आधी विचार करावा. विश्वासार्हता असलेल्या लोकांशी ते शेअर करावेत. आपले फोटो सर्वासाठी उपलब्ध होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. त्यासाठी योग्य पर्यायाची निवड करावी.

 फोटो आणि अन्य माहितीचा समाजमाध्यम संकेतस्थळांचा गैरवापर

घरातील मुला-मुलींची माहिती समाजमाध्यम संकेतस्थळ अपलोड करण्याची बाब सर्वत्र दिसून येते. ही बाब घातक आहे. या साइटच्या माध्यमातून माहिती उपलब्ध झाल्याने अनेक ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांचे अपहरण झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे लहान मुलांचे, पिकनिक, हॉटेलिंग आणि शॉपिंगचे फोटो शेअर करू नयेत.

सायबर गुन्हे कसे होतात आणि त्यांचे धोके काय आहेत 

क्रेडिट कार्डचा ‘पिन’ क्रमांक समाजमाध्यम साइट किंवा ई-मेलचे पासवर्ड. अशा प्रकारची ‘वैयक्तिक संवेदनशील माहिती’ चोरी करून किंवा त्याचा परस्पर गैरवापर करून बहुतांश सायबर गुन्हे घडतात. अशा प्रकरणांमध्ये लॉटरी लागल्याचे एसएमएस, ई-मेल किंवा नोकरी मिळाल्याचे फसवे ई-मेल व्यक्तींना पाठविण्यात येतात आणि त्याद्वारे संबंधित व्यक्तीची महत्त्वाची माहिती चोरी केली जाते.

सायबर गुन्हे म्हणजे काय?

संगणक, मोबाइल किंवा इंटरनेटसह इलेक्ट्रॉनिक व टेलिकम्युनिकेशन नेटवर्क्‍सचा गैरवापर करून एखाद्या व्यक्ती किंवा समूहाला शारीरिक, मानसिक हानी पोचविण्यासाठी किंवा त्यांची बदनामी करण्यासाठी गुन्हेगारी उद्देशाने केलेले कृत्य म्हणजे सायबर गुन्हा. अशा गुन्ह्य़ांमध्ये प्रामुख्याने संगणकाचा साधन म्हणून गैरवापर होतो.

सायबर गुन्ह्य़ांचे प्रकार

वैयक्तिक स्वरूपातील संवेदनशील माहितीची चोरी किंवा परस्पर देवाण-घेवाण, आर्थिक फसवणूक (फिशिंग, स्पूफिंग), हॅकिंग (डिनायल ऑफ सव्‍‌र्हिस), अश्लील मजकूर म्हणजे सायबर गुन्हेगारीच्या भाषेत ‘पोर्नोग्राफी’, कॉपीराइट व बौद्धिक संपदा हक्कांचे उल्लंघन, असे सायबर गुन्ह्य़ांचे प्रकार आहेत.

सायबर गुन्हेगारी टाळण्याचे प्रतिबंधक उपाय : सुरक्षित ब्राऊझिंगसाठी महत्त्वाचे नियम

* मोबाइलच्या ‘स्क्रिन लॉक’चा वापर करा.

* मोबाइल बँकिंगचा वापर करताना स्क्रिन अनलॉकचे ऑप्शन वापरा.

* सर्वात महत्त्वाचे म्हणचे आपल्या बँक खात्यासंदर्भातील कोणतीही माहिती मोबाइल डिव्हाइसमध्ये स्टोअर करू नका. जसे खाते क्रमांक, डेबिट आणि क्रेडिट कार्ड पिन आपल्या फोनमध्ये स्टोअर करू नका

* समाजमाध्यमच वापर करताना सावधान  समाजमाध्यमचा वापर करतानाही विशेष काळजी घेण्याची गरज आहे. मालवेअर अ‍ॅटॅकसाठी सर्वात घातक प्लॅटफॉर्म समाजमाध्यम आहे. समाजमाध्यममध्ये बरेच युजर अशा काही माहिती शेअर करतात त्यामुळे मालवेअर अ‍ॅटॅक होण्याची शक्यता आहे

* तुमच्या कुटुंबीयांच्या नावाने किंवा सहज ओळखता येईल, अशा नावाचा पासवर्ड ठेवू नका तसेच अक्षरांबरोबर आकडय़ांचाही वापर पासवर्डमध्ये करा.

* लॉग-इन करताना ‘रिमेम्बर पासवर्ड’ हे ऑप्शन अनचेक करा.

* सार्वजनिक ठिकाणी किंवा कॉमन कॉम्प्युटरवरून तुमचे ई-मेल किंवा अन्य संकेतस्थळांना भेट दिल्यानंतर ‘ब्राऊझिंग हिस्ट्री’ आणि कुकीज डीलीट करण्यास विसरू नका.

* विण्डोज इंटरनेट एक्सप्लोरर ब्राऊझर वापरत असल्यास ‘इनप्रायव्हेट ब्राऊझिंग’सारख्या सुविधेचा वापर करा.

* सध्या स्पाय वेअरचा प्रसार प्रचंड वाढलाय काही ई-मेल उघडल्यावर लगेचच तुमच्या कॉम्प्युटरमध्ये स्पाय वेअर शिरू शकते. तसेच काही गेम्स व प्रोग्रॅम्स् डाऊनलोड करताना पण स्पाय वेअर शिरू शकते. अशा विविध प्रकारांनी स्पाय वेअर तुमच्या नकळत तुमच्या कॉम्प्युटरमध्ये शिरतात आणि तुम्ही कॉम्प्युटरवर काय करता याची पूर्ण खबरबात ठेवतात. तुमची खासगी माहिती, काय पासवर्ड टाइप केले, कुठले प्रोग्रॅम वापरले, कुठल्या वेबसाइटना भेटी दिल्या ही माहिती स्पाय वेअरच्या साह्य़ांनी हॅकर्सच्या हाती लागू शकते.

* चॅट करताना कुठलीही महत्त्वाची माहिती टाइप करू नका. वेब कॅमेरा काम झाल्यावर बंद करा किंवा झाकून ठेवा.

* दर २ ते ३  आठवडय़ांनी तुमचे पासवर्ड बदला. पासवर्ड असे ठेवा की जे सहज ओळखायला कठीण राहतील. पासवर्डमध्ये तुमचा, फोन नंबर, जन्मतारीख, घरातल्या लोकांची नावे यांचा वापर टाळा.

* दोन किंवा तीन दिवसांनी कॉम्प्युटरच्या वापरामुळे जमा झालेली तात्पुरती डाऊनलोडेड माहिती व जुनी वेब पेजेस कायमस्वरूपी काढून टाकत चला.

* कॉम्प्युटर आणि इंटरनेटचे फायदे पाहता कॉम्प्युटर न वापरणे हा पर्याय नसून आपण कॉम्प्युटर वापरताना थोडी काळजी घेतली तर ह्य़ा हॅकर्सवर मात करणे अजिबात अवघड नाही.

आक्षेपार्ह ई-मेल येत असल्यास..

आक्षेपार्ह ई-मेल तुमच्या इनबॉक्समधून डीलीट न करता त्या ई-मेलचे ‘एक्स्टेंडेड हेडर’ची माहिती काढून ठेवा आणि मग त्याची कॉपी पोलिसांना द्या

हेडरची माहिती काढण्यासाठी www.cybercellmumbai.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन ‘एफएक्यूक’तील सूचना वाचा.

सायबर कायदा काय

अश्लील व आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याबद्दल भारतीय दंडविधानाच्या २९२ कलमान्वये गुन्हा दाखल होऊ  शकतो. त्याअंतर्गत दोन ते पाच वर्षांचा तुरुंगवास आणि दंड अशी शिक्षेची तरतूद आहे. माहिती तंत्रज्ञानाचे कलम ६६ हे संगणकाशी संबंधित गुन्ह्य़ांसाठी वापरले जाते. आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याबद्दल ६६(ए) कलमान्वये तीन वर्षे तुरुंगवास आणि दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. ‘आयडेंटिटी थेफ्ट’ म्हणजे ‘वैयक्तिक संवेदनशील माहिती’ची चोरी व गैरवापर केल्याबद्दल ६६(सी) कलमान्वये तीन वर्षे तुरुंगवास आणि एक लाख रुपये दंडापर्यंतची शिक्षा होऊ  शकते.

‘प्रायव्हसी’च्या उल्लंघनाबद्दल ६६(इ) कलमान्वये तीन वर्षे तुरुंगवास आणि दोन लाखांपर्यंत दंडाची शिक्षा होऊ  शकते. आक्षेपार्ह लैंगिक कृत्य किंवा मजकूर प्रसारित, प्रकाशित केल्याबद्दल ६७(ए) कलमान्वये पाच ते सात वर्षे तुरुंगवास आणि दहा वर्षे दंडाची शिक्षा होऊ  शकते. अल्पवयीन मुलांचे आक्षेपार्ह लैंगिक कृत्य किंवा मजकूर प्रसारित केल्याबद्दल ६७(बी) कलमान्वये पाच ते सात वर्षे तुरुंगवास आणि दहा लाख रुपये दंडाच्या शिक्षेची तरतूद कायद्यात आहे.

– प्रा. योगेश हांडगे

(लेखक पुणे इन्स्टिटय़ूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कॉम्प्युटर विभागात साहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.)